एखाद्यानं डान्स करत आपलं मन जिंकून घेणं फार क्वचितच घडतं. सध्या इन्स्टाग्रामवर सुरू असलेल्या धांगडधिंगा पाहता नृत्याविष्कार, कला किंवा तत्सम बाब राहिलेली नाही. कच्चा बदामच्या ट्रेंडवर रिल करुन करुन पोरींचं कंबरडं मोडलं पण ट्रेंड काही खतम होईना. असलं काहीबाही लोक चविनं बघतात. सोशल मीडिया कंपन्यांनीही त्यांना डोक्यावर घेतलं. कुणीही येतं कुठलं गाणं व्हायरल करतं आणि त्यावर सर्वांना नाचायला भाग पाडतं. पण या आपल्या व्हीडिओतल्या आज्जींनी आजोबांची आठवण काढत जो काही धम्माल डान्स केलायं ना त्याला ना अजिबात तोड आहे ना कसली दाद आहे. कुणी मैफिलीत बसल्यावर फर्माइश करतं. पण समोरचा गायला नकार देतो. पण एखाद्या वेळेस असली दाद देण्याजोगी कलाकृती सादर करतो ना त्याला तोड बिलकुल नाही. अशीच कमाल या आज्जींनी केलीयं.
त्यांच्या वयावर बिलकूल जाऊ नका. ज्या काळात तरणी दांगडी पोरं कंबर लचकली म्हणून रडत बसतील त्यात आज्जींनी एकदम पल्लाच गाठला आहे. आज्जींनी एकतर जो परफॉर्मन्स दिलाय त्याला तोड नाही. ‘हंसता हुआ नूरानी चेहरा… काली जुल्फें रंग सुनहरा… तेरी जवानी तौबा तौबा… रे दिलरुबा दिलरुबा… दिलरुबा.. दिलरुबा…’ अशा ठसकेबाज गाण्यावर ताल धरत साऱ्यांना खिळवून ठेवलं आणि मैफिलीत रंग भरला. आज्जींनी सुनेला पण मागे टाकलं. तर झालं काय, लग्नमंडपात सगळी लगबग सुरू होती. मेहदींचा कार्यक्रम ऐन रंगात आला होता. पुरुष मंडळी सगळी एकदम माहौल बनवून बसली होती. बायकांनीही आपल्या मैत्रीणींचा गोतावळा जमवत धमाल सुरू केली होती. एक एक करत गाण्यावर डान्स करण्याची वेळ प्रत्येकावर येत होती. आज्जींवर वेळ येईल, असं काहीसं वाटलं नव्हतं. पण कुणाला तरी ठावूक होतं की आपली आज्जी एकदम कम्मालीची डान्सर आहे.
आज्जींच्या डान्स परफॉर्मन्स यापूर्वी त्यांनी कधीतरी पाहिला असला पाहिजे. आज्जींना हेरुन बरोबर गाण्यावर फर्माइश सुरू केली. अचानक आज्जींनी बर्रोबर गाणं लावलं आणि तिथल्या वातावरणात एक उर्जा संचारुन दिली. आज्जींनीच असा परफॉर्मन्स दिल्यानं अख्ख मार्केट खाऊन टाकलं. आता लग्नात तुम्ही तोडीचा पर्फॉर्मन्स करुन घ्या पण आज्जींच्या पर्फॉर्मन्सला तेवढा तोड नाही. अगदी गाण्याच्या शब्दांवर आज्जींनी ठेका धरत अगदी तंतोतंत हावभाव आणून अगदी स्वतःला झोकून दिलं. तुम्हाला या आज्जींचा परफॉर्मन्स कसा वाटला ते आम्हालाही कळला. आज्जींच्या या एनर्जेटीक डान्सला १० पैकी किती गुण द्याल तेही आम्हाला सांगा.
बघा व्हिडीओ :