Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजींनी केलेला हा जबरदस्त डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा आजीच्या थक्क करणाऱ्या स्टेप्स

ह्या आजींनी केलेला हा जबरदस्त डान्स पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा आजीच्या थक्क करणाऱ्या स्टेप्स

सोशल मीडिया आपल्याकडे येऊन आता बराच काळ लोटला आहे. किंबहुना या सोशल मीडियात येत्या काळात अनेक बदल संभवतात आणि त्यामुळे याचा चेहरामोहरा बदलून जाईल अशी शक्यता आहे. ते जेव्हा होईल तेव्हा होईल. पण एक मात्र खरं की या नवीन माध्यमाने दाखल झाल्यापासून आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात अनेक बदल केले आहेत.

अगदीच लक्षणीय बदल म्हणजे अनेकांनी या सोशल मीडियाचा वापर करत स्वतःची कलाकार म्हणून कारकीर्द घडवली आहे आणि घडवत आहेत. बरं काहींचा प्रवास अजूनही चालू असला तरी सोशल मीडिया जर नसता तर हा प्रवास बराच कठीण होऊ शकला असता अस म्हणण्यास वाव आहे. किंबहुना काहींचा प्रवास तर सोशल मीडियामुळे आपल्या समोर आल्याची अनेक उदाहरणे आपल्या आजूबाजूला पहावयास मिळतील. आता आज आपल्या टीमने बघितलेला एक व्हिडियो याचं उत्तम उदाहरण म्हणता येईल. हा व्हिडियो आहे एका आजीबाईंचा. यांचं नाव लक्ष्मी चाचोडकर असून त्या मोर्शी येथील रहिवासी आहेत. त्यांना नृत्याची आवड अगदी लहानपणापासून होती व आजही आहे. त्यांचं वय वर्षे ७५ च्या आसपास. त्यामुळे त्यांच्या लहानपणी कदाचित त्यांच्या या आवडीला म्हणावं तसं प्रोत्साहन मिळालं नसावं. पण गेल्या दोन वर्षात मात्र त्यांच्या या आवडीला सोशल मीडियाच्या माध्यमातून एक हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे.

झालं असं की त्यांचे जावई श्री. संकेत पाटील हे त्यांच्या सासुरवाडीस गेले होते. लॉकडाऊनमूळे तिथेच राहिले अस कळतं. या काळात त्यांना आपल्या सासूबाईंच्या डान्सच्या आवडीविषयी कल्पना आली. त्यांची ही आवड जोपासली जावी आणि सगळ्यांना कळावी असं त्यांना वाटलं. मग काय त्यांच्या नृत्याचा व्हिडियो त्यांनी चित्रीत केला आणि तो सोशल मीडियावर पोस्ट केला. मुळातच लक्ष्मी आजींना नृत्याची आवड असल्यामुळे त्यांचं नृत्य अगदी पहिल्याच फटक्यात सगळ्यांना आवडून गेलं. व्हिडियो वायरल झाला. खरं तर इतक्या वर्षांनी एक प्रयत्न केला आणि तो इतका वायरल झाला म्हणजे यशच म्हणयाल हवं. पण म्हणतात ना, उपरवाला देता हैं, तो छप्पर फाडके देता हैं ! असाच अनुभव आजींना आणि त्यांच्या कुटुंबियांना आला. त्यांचा हा व्हिडियो लोकप्रिय अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्यापर्यंत ही पोहोचला. त्यांना तो खूप आवडला. तसेच आपल्या मराठमोळ्या सोनाली कुलकर्णी यांनीही या व्हिडियोची प्रशंसा केलेली आहे. बरं याच्यावर सगळं थांबत नाही. तर या आजींचा डान्स व्हिडियो एका लोकप्रिय कार्यक्रमात ही दाखवला गेला. हा लोकप्रिय कार्यक्रम म्हणजे ‘लाव रे तो व्हिडियो’. होय, निलेश साबळे यांच्या गाजलेल्या कार्यक्रमात हा व्हिडियो इतका गाजला की त्यातही क्रमांक एक वर राहिला.

खरंच मंडळी, केवळ एका व्हिडियोने या आजींना हवं असलेलं प्रोत्साहन मिळवून दिलं. याच आजींचा एक व्हिडियो आज आपल्या टीमने पाहिला. त्यात त्या ‘मन मोहना राजा तू स्वप्नातला’ या गाण्यावर डान्स करताना दिसल्या. खरं तर अनेक आजी आजोबा त्यांच्या अनेक सुप्त कलागुणांना वाव देताना आपण पाहत असतो. त्यांचं आपण वेळोवेळी कौतुक केलं आहेच. पण या आजींचा पदन्यास, त्यांच्या स्टेप्स इतक्या मस्त असतात की आवडून जातात. किंबहुना लक्षात राहतात. कारण या वयात असा डान्स आपण कोणाकडूनही अपेक्षा करत नाही. पण आवड असेल आणि स्वास्थ्य ही असेल तर काही अशक्य नाही हेच या आजींकडून आज आपली टीम शिकली. त्यातूनच मग त्यांच्याविषयी माहिती घेण्याचा निर्णय झाला आणि आजचा हा लेख लिहिला गेला आहे. आपणही या आजींकडून प्रेरणा घेतली असेलच यात शंका नाही. पण कदाचित आपण या आजींचा डान्स व्हिडियो अजूनही पाहिला नसेल तर जरूर पहा. आपली टीम तो खाली शेअर करेलच. असो.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.