Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजींनी ‘दिलबर दिलबर गाण्यावर केलेल्या अतरंगी स्टेप्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हा मजेदार व्हिडीओ

ह्या आजींनी ‘दिलबर दिलबर गाण्यावर केलेल्या अतरंगी स्टेप्स पाहून हसू आवरणार नाही, बघा हा मजेदार व्हिडीओ

आपल्या सगळ्यांसाठी हक्काचं व्यासपीठ बनलेलं नजीकच्या काळातलं तरुण माध्यम म्हणजे सोशल मीडिया. खरं तर या माध्यमाची गतीच इतकी प्रचंड आहे की अत्यल्प काळात हे माध्यम आलं आणि नकळतपणे आपल्या जीवनाचा एक भाग ही बनून गेलं आहे. येत्या काळात तर यात अजून नवनवीन असे बदल घडून येतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्याविषयी येत्या काळात कळून येईलच. पण सध्याच्या काळातही या सोशल मीडियाने अनेक गोष्टी अशा ही केल्या आहेत ज्या आधी अशक्य वाटल्या असाव्यात.

याच उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या आईवडील आणि आजी आजोबांच्या पिढीने या माध्यमाचा केलेला स्वीकार होय. खरं तर हे माध्यम आपल्याकडे दाखल झालं आणि ‘जळला मेला तो फोन’ च्या नावाखाली बरिच दूषणं ही पडली त्याला. पण म्हणता म्हणता काळ बदलत गेला आणि हे नवमाध्यम आपल्या अगदी अंगवळणी पडलेलं दिसून येतं. इतकं की आधीच्या काळात ज्यांनी यावर टीका केली त्याच दोन्ही पिढ्या याचा वापर करत त्याचा आनंद घ्यायला शिकल्या. इतकंच काय तर काही जण स्वतः ‘कंटेंट क्रिएटर’ बनण्यापर्यंत त्यांचा प्रवास झाला.

आजही नवनवीन असे अनेक जण येत असतातच. त्यात त्यांना नवीन पिढीची मदत होतेच. तरुणाईला तर या जुन्या पिढ्यांचं कौतुक आहेच. त्यामुळे ही नवीन पिढी ही त्यांना मदत करायला तयार असतेच. त्यांच्यातील सुप्त असे कलागुण समोर आणण्यात तर तरुण पिढीच्या या उत्साहात भरच पडते. बरं हे सुप्तगुण अभिनय, नृत्य, गायन आणि इतर अनेक कालागुणांनी बहरलेले असतात. अनेक वेळा तर काही आजी आजोबांकडे बघून एखाद्या मॉडर्न गाण्यावर ते डान्स करतील असं वाटत नाही. पर ये सोशल मीडिया हैं जनाब असं कधीकधी म्हणायची वेळ येते. इथे आश्चर्यकारक अशा काही गोष्टी बघायला मिळतात. याचाच प्रत्यत आज आपल्या टीमने घेतला. हा प्रत्यय आला तो एका व्हिडियोच्या निमित्ताने. हा व्हिडियो आहे एका आजींचा. नऊवारी नेसलेल्या या आजी स्वभावाने एकदम बिनधास्त आणि आयुष्याचा आनंद घेणाऱ्या असाव्यात अस वाटतं. कारण या व्हिडियोत आजी मस्त असा डान्स करताना दिसतात. बरं एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आम्ही पाहिलेल्या व्हिडियोत ऐकायला येणार गाणंच त्या डान्स करताना वाजवलं गेलं असेल किंवा काय याविषयी माहिती उपलब्ध नाही. कदाचित गाणं वेगळं ही असावं. असो. पण काहीही असलं तरी आजींचा या व्हिडियोतील उत्साह आपल्याला बरंच काही शिकवून जातो हे मात्र नक्की. कारण कोरिओग्राफर ने ठरवून दिल्यासारख्या त्यांच्या स्टेप्स नसतात.

उलट, त्यांच्या मनाला जसं वाटेल त्यानुसार त्या नाचत असतात. पण त्यात त्या क्षणांचा आनंद घेण्याची वृत्ती दिसून येते. त्यामुळे आपसूक आपणही या आजींचा उत्साहाने प्रेरित होतो. हा व्हिडियो खरं तर अगदी कमी वेळेचा आहे. पण तसं असलं तरी आजींचा उत्साह इतका दांडगा असतो की व्हिडियो संपल्यावर ही लक्षात राहतो. आपण ही हा व्हिडियो बघितला असल्यास आपल्याला ही हे जाणवलं असेलच. पण आपण हा व्हिडियो नसेल बघितला तर एकदा तरी बघा. कारण आपल्या आयुष्यात आपण कधी कधी इतके तणावाखाली जगत असतो की खुल्या मनाने आयुष्याची मजाच घेता येत नाही. पण असे उत्साहाने भारलेले व्हिडियो बघून मात्र आपल्या मनावरचा ताण कमी होतो हे नक्की. तेव्हा हा व्हिडियो जरूर बघा.

असो. तर मंडळी हा होता आपल्या टीमचा आजचा लेख ! आपली टीम नेहमीच विविध विषयांवर लेख लिहीत असते आणि यापुढेही लिहीत राहील. आजचा हा लेखही याच मांदियाळीतला आहे. आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. येत्या काळातही आपली टीम विविध विषयांवर लेख लिहीत राहीलच. आपणही आम्हास प्रोत्साहन देत राहाल याचा विश्वास वाटतो. असो. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे आपण न वाचलेले अन्य लेख जरूर वाचा. आठवणीने शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *