Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजींनी मिरवणुकीत केला अप्रतिम डान्स, आजीचा उत्साह तर तरुणांनाही लाजवेल

ह्या आजींनी मिरवणुकीत केला अप्रतिम डान्स, आजीचा उत्साह तर तरुणांनाही लाजवेल

कोणत्याही सणाची किंवा समारंभाची स्वतःची म्हणून एक मजा असते. ही मजा घेणं आपल्या सगळ्यांनाच आवडतं. त्यात जर एखाद्या मिरवणुकीची जोड मिळाली तर मग बघायलाच नको. हा आनंद द्विगुणित झालाच म्हणून समजा. बरं मजेचं, आनंदाच हे समीकरण इथेच थांबत नाही. यात अजून एक घटक असा असतो जो यात उत्साह आणि ऊर्जा ओततो. होय, या मिरवणुकीचा भाग असलेले आपण आणि आपल्या सारखे आयुष्याची मजा घेणारे कलंदर. कारण नुसती मिरवणूक म्हंटली तरी ती एखादया समारंभाशी निगडित असेल तर सहसा वाजत गाजत असते. त्यात काही सणांचा ही समावेश करायला हवा. जसं की गणेशोत्सव आणि दुर्गा उत्सव ही त्याचं उत्तम उदाहरणं होय. आपले लाडके बाप्पा आणि देवीआई यांचं आगमन आणि त्यांच्या प्रतिमांचं विसर्जन यावेळी तर सहसा मिरवणूक असतेच.

काही वेळा एखादं कुटुंब, संस्था किंवा अगदी काही कुटुंब एकत्र येत अशा मिरवणुकांच आयोजन केलं जातं. त्यामुळे मग त्यात बरीच मंडळी असतात आणि वाजंत्री ही असतातच. आता वाजंत्री म्हंटली की वर उल्लेख केलेली कलंदर आणि उत्साही मंडळी असतातच. बरं, यात वयाचा वगैरे काही संबंध नसतो. त्यामुळे लहानथोर सगळेच जण यात सहभागी होताना दिसतात. त्यात वाजंत्री मस्त वाजवत असतील तर सोन्याहून पिवळं म्हणायला हवं. कारण मग डान्स हा जणू आत्मा आहे असं म्हणणाऱ्यांना तेवढीच संधी मिळते. पण मंडळी काही वेळा अनपेक्षित अशा व्यक्तीही या प्रसंगी आपली चमक दाखवून देतात.

याचं अगदी ताजे उदाहरण आज आपल्या टीमने एका व्हिडियोच्या माध्यमातून बघितले आहे. हा व्हिडियो खरं तर तीन वर्षांपूर्वीचा आहे. बरं हा व्हिडियो केवळ तीस सेकंदांचा आहे. पण व्ह्यूज म्हणाल तर तब्बल ३९ लाख व्ह्यूज मिळालेला हा व्हिडियो आहे. याला कारणीभूत आहेत यातील आजीबाई. या आज्जींनी या व्हिडियोत बेंजोच्या तालावर जो काही डान्स केला आहे त्यास तोड नाहीये. कारण त्यांच्या या वयात अनेकांना हा असा जबरदस्त उत्साह आणि डान्स वगैरे करण्याची इच्छा बहुतेकवेळा नसते. त्यांच्या प्रकृतीच्या मानाने ते बरोबर सुद्धा असणार. पण याचमुळे या आज्जी वेगळ्या ठरतात. त्यांचा उत्साह आणि ऊर्जा वाखाणण्याजोगी आहे. याच उत्तम उदाहरण म्हणजे या आजीबाईंना डान्स करताना मिळणारी साथ होय. आता आपल्याला पण या गोष्टीची कल्पना असेल, की जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून डान्स करते तेव्हा आजूबाजूला असलेल्या सगळ्यांना आपसूकच डान्स करावा असं वाटायला लागतं. त्यात ही व्यक्ती वयाने मोठी असेल तर हा उत्साह अजूनच वाढतो. इथेही तसच होताना दिसत. एवढंच काय तर निव्वळ हा व्हिडियो बघूनही आपल्याला मनातल्या मनात का होईना नाचावं असं वाटतंच. असो. आपल्या टीमला आजचा हा व्हिडियो प्रचंड आवडला.

कमी वेळेचा पण नेहमी लक्षात राहणारा असा हा व्हिडियो आहे. अर्थात वर उल्लेख केल्याप्रमाणे कोणत्याही मिरवणुकीत उत्साह वाढवणारी आपल्या सारखी उत्साह आणि कलंदर लोकं पाहिजेच असतात. त्यामुळे हा व्हिडियो अजूनच आवडून गेला. आपण हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला ही आवडला असेलच हे नक्की. पण आपण हा व्हिडियो पाहिला नसेल तर केवळ ३० सेकंद वेळ काढून हा व्हिडियो एकदा पहा. आजींचा उत्साह आपलं मन जिंकून घेईल हे नक्की. असो.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *