Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजींनी सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, असं दिलखुलास आयुष्य जगता आलं पाहिजे

ह्या आजींनी सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, असं दिलखुलास आयुष्य जगता आलं पाहिजे

वय आणि उत्साह यांचं सहसा व्यस्त नातं असतं असं वाटतं. म्हणजे वय जस जसं वाढत जाईल तस तसा उत्साह कमी होत जातो वगैरे. पण आपल्या आजूबाजूला अशी काही उदाहरण असतात की ज्यांच्या कडे बघून नकळत आपल्या मनातून शब्द बाहेर पडतात – Age is just a number. अर्थात वय हा केवळ एक आकडा आहे. ही उदाहरणं म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारी वयाने मोठी पण मनाने तरुण असणारी मंडळी. अर्थात ती बेभान होऊन जगत नसतात. पण जे काही करायचं त्यात आनंद लुटायाचा हे मात्र त्यांचं ठरलेलं असतं. त्यामुळे इतरांपेक्षा एक पाऊल पुढे टाकत त्यांचा प्रवास चालू असतो. हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला एक व्हिडियो. हा व्हिडियो आहे एका समारंभातला. या समारंभात आपल्याला एक काकू अगदी मस्त पैकी आनंद घेत डान्स करताना दिसतात.

हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा ‘रंगीलो मारो ढोलना’ हे सुप्रसिद्ध गाणं वाजायला सुरुवात झालेली असते. व्हिडियो रेकॉर्ड करणारा आपला कॅमेरा फिरवत असतो. या दरम्यान काकूंनी त्यांचा डान्स सुरू केलेला असतो. या गाण्यातील बोलांप्रमाणे त्यांचा डान्स सूरु असतो. डान्सच्या सुरुवातीस त्या दोन चक्कर मारतात. मग वेगळी एक स्टेप करतात. या सगळ्यात आपण टिपतो तो त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद. अगदी मनापासून डान्स करत असतात त्या. आपणच काय तर तिथे उपस्थित असलेले सगळे त्यांच्या या गाण्याचा आनंद घेत असतात. एक ताई तर पुढे येत त्यांच्या या आनंदात सहभागी होतात. त्या स्वतः एक स्टेप करतात. काकू सुद्धा त्यांना फॉलो करतात. मग त्या ताई पुन्हा एकदा नवीन स्टेप करतात. काकू ती स्टेप सुद्धा करतात. एकूणच काय तर काकुंचं ठरलेलं असतं, दिलखुलासपणे नाचायच. एक क्षण असा येतो की या काकू, त्या ताई आणि एक छोटी मुलगी कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये दिसत असतात. तिघींचा उत्साह ही सारखाच भासतो.

पुढे अजून एक ताई येतात. त्या सुद्धा मस्त स्टेप्स करत काकूंना सोबत म्हणून डान्स करत असतात. काकू पण एकदम जोशात आलेल्या असतात. कोणीही येवो, काकूंच्या डान्स मुळे त्यांच्यात ही तीच ऊर्जा समाविष्ट झालेली असते कदाचित. आपणही त्यास अपवाद ठरत नाही. कारण त्या काकूंचा उत्साह बघून आपला बुजरेपणा आपल्याला स्वतः वर हसायला लावतो. या काकूंसारखं मस्त जगता यायला हवं असं नकळतपणे वाटून जातं.

आपल्या टीमला हा व्हिडियो आवडला. त्याहून महत्वाचं म्हणजे आपल्या वाचकांना यावर लेख वाचायला आवडेल असं वाटलं म्हणून हा लेखप्रपंच घडून आला. आपल्या टीमचा हा प्रयत्न यशस्वी झाला असेल अशी अपेक्षा आहे. कारण आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम लेख लिहिण्याचा प्रयत्न करते. आपणही ह्या लेखांवर कमेंट्स करत आपल्या टीमला प्रोत्साहन देत असता. तसेच मोठ्या प्रमाणावर लेख शेअर करत जणू काही आपल्या पसंतीची मोहोर उमटवत असता. येत्या काळातही आपलं हे प्रेम आपल्या टीमला मिळत राहील हे नक्की. आपल्या टीमवरचा लोभ कायम असावा ही विनंती. आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

 

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *