Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजींनी सर्वांसमोर केला कोळी गाण्यावर अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

ह्या आजींनी सर्वांसमोर केला कोळी गाण्यावर अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

सध्या महाराष्ट्रभर पावसाळी वातावरण आहे. कुठे मुसाळधार तर कुठे संततधार. पण पाऊस पाणी अगदी जोरात आहे हे नक्की. अशा या वातावरणात जर पाऊस संततधार असेल तर गरमा गरम चहा आणि भजी यांची फर्माईश होतेच. या दोन गोष्टींमुळे मन प्रसन्न होतं हे नक्की. पण यात अजून एक गोष्ट आहे जी आपलं मन प्रफुल्लित करते. या अशा वातावरणात जुनी गाणी ऐकणं. सुट्टी असेल तर आराम खुर्चीत बसून ही जुनी गाणी ऐकणं म्हणजे स्वर्गीय आनंद. या जुन्या गाण्यातील शब्दन शब्द आपल्याला आनंद देऊन जातो. या गाण्यांच्या सोबतीला एखादा छान असा व्हिडियो असेल तर ?असाच एक व्हिडियो आपल्या टीमने पाहिला. या व्हिडियो विषयी जाणून घ्यायला आपल्या वाचकांना आवडेल असं वाटलं म्हणून आजचा हा लेख लिहीत आहोत.

हा व्हिडियो आहे एका मराठमोळ्या समारंभातला. या समारंभात अनेक जण सामील झाल्याचं दिसून येतं. मस्त असा एक स्टेज तयार केलेला असतो. त्यावर काही जण गिटार घेऊन उभे असतात. खाली काही मंडळी उभी असतात.

यात असतात आपल्या या व्हिडियो च्या केंद्रबिंदू ठरणाऱ्या आजी. छान अशी नऊवारी साडी नेसून आजी डान्स फ्लोअर वर आलेल्या असतात. एव्हाना गाणं सुरू होतं. ‘मी डोलकर, डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ हे ते सुप्रसिद्ध गीत. शांता शेळके यांच्या शब्दांनी संपन्न असं गीत गायलं आहे गानसम्राज्ञी लताजी मंगेशकर आणि हेमंत कुमार यांनी. या गाण्याला संगीतबद्ध केलेलं आहे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. एवढ्या दिग्गज मंडळींनी स्वतःचा परिसस्पर्श केलेलं हे गीत लोकप्रिय आहेच. आजींचं तर हे आवडीचं गाणं असल्याचं जाणवत. गाणं सुरू झाल्यापासून गाण्याच्या गतीनुसार स्वतःचा डान्स करत त्या मस्त आनंद घेत असतात. त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि देहबोली यातून ते जाणवतं. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतः डान्स करताना त्याची मजा घेत असते तेव्हा आपसूक उपस्थित मंडळी ही या डान्सची मजा घेत असतात. या व्हिडियोतही ते दिसून येतं. आजूबाजूला उभी असलेली सगळी मंडळी आजींचा हा उत्साह बघून आनंदित झालेली कळून येतात. पाठी उभे असलेले गिटार वादक पण आपल्या गिटार वर त्याचा ताल धरताना दिसून येतात.

व्हिडियो पुढे सरकत असताना आजींना कोणाची तरी आठवण होते. त्या हाक मारतात आणि मग एक दादा पुढे येतात. आजींसोबत डान्स ची मजा घेत ते पण नाचत असतात. मग एक ताई आणि बाकीची मंडळी पण येतात. स्टेज च्या पाठूनही एक गृहस्थ येऊन या ग्रुप सोबत नाचू लागतात. आपणही या सगळ्यांकडे आणि खासकरून आजींकडे कौतुकाने पाहत असतो. कारण गाण्यातील बोल बदलतात तसे त्यांच्या स्टेप्स सुद्धा बदलतात. त्या पूर्णपणे त्या गाण्यात गुंगून गेलेल्या असतात. एकंदर काय तर आजींची प्रसन्न मुद्रा आणि उत्साही स्वभाव आपल्यालाही सकारात्मक ऊर्जा देऊन जातो. आपल्या टीमला तर हा व्हिडियो प्रचंड आवडला.

आपल्याला याविषयी लिहिलं तर आवडेल असा विचार करून आजचा हा लेख लिहिला गेला आहे. आपण हा व्हिडियो बघितला असेल तर हा व्हिडियो आणि हा लेख कसा वाटला हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. कारण आपण कमेंट्स मधून जेव्हा आपल्या टीमला प्रोत्साहन देता किंवा काही सकारात्मक बदल सुचवता तेव्हा आम्हाला आनंद होतो. आमच्या पाठीवर कौतुकाची थाप पडल्याचा आनंद होतो. त्यामुळे नवनवीन विषयांवर लेखन करायला स्फूर्ती मिळते. तेव्हा आपला हा लोभ आपल्या टीमवर कायम राहू दे ही सदिच्छा. आपल्या पाठींब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *