Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजीचा व्हिडीओ पाहून तुम्ही पण थक्क व्हाल, बघा व्हिडीओ

ह्या आजीचा व्हिडीओ पाहून तुम्ही पण थक्क व्हाल, बघा व्हिडीओ

मराठी गप्पाच्या माध्यमातून आपण वायरल व्हिडियोज वरील अनेक लेख वाचले आहेत. या लेखांतून काही वेळेस आपलं मनोरंजन होतं, तर कधी कधी आपल्या डोळ्याच्या कडा पाणावतात. तर कधी कधी समोरच्या व्हिडियोतील व्यक्तीच्या अंगचं कसब पाहून आपण अचंबित होतो. तुम्हालाही पटतंय ना? वाचा तर मग हा लेख. आमच्या टीमला एक वायरल व्हिडीओ सापडला. हा व्हिडियो आहे एका आज्जींचा आणि त्यांनी या व्हिडियोत पेटी हे वाद्य अगदी उत्तमरीतीने वाजवत सगळ्यांना अचंबित केलं आहे. Age is just a number का म्हणत असावेत याचा प्रत्यय या आज्जींना पाहताना येतो. या व्हिडियोच्या सुरवातीस आजी कॅमेऱ्यापाठीमागून पेटी वाजवण्यास सुरू करा असे सांगितले जाते का हे ते पाहत असतात.

होकार मिळताच आजींची उजव्या हाताची बोटे त्या पेटीवर सवयीने फिरताना आपल्याला दिसतात, तर डावा हात पेटीच्या भात्याला पुढे मागे करत असतो. आजी आपलं गाणं सुरू करतात. ‘ऐ मालिक तेरे बंदे हम, ऐसें हो हमारे कदम’ ह्या गाण्याच्या ओळी आपल्या कानावर पडतात आणि कित्येक दिवसांत हे गाणं आपण ऐकलं नाहीये हे जाणवतं. आजींचं लक्ष पेटीवर असतंच सोबत मधेच कधी तरी कॅमेऱ्यातही त्या बघत असतात. पहिल्या कडव्यानंतर त्यांचा आवाज काहीसा कातर झाल्यासारखा वाटतो. एक ते दीड मिनिटाच्या या व्हिडियोत आजी अखंड गात असतात. सोबत त्यांची बोटे पेटीवर फिरत असतात. त्यांचं हे गाण्यावरचं प्रेम आणि पेटी वाजवतानाचं कौशल्य अगदीच स्पृहणीय ठरतं. व्हिडियोच्या शेवटी गाणं संपता संपता आजींच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य अगदी काही सेकंद दिसतं. आपल्याही चेहऱ्यावर असंच स्मित हास्य या वेळी असतं.

व्हिडियो संपतो आणि आजींच्या या कालाप्रेमाला आपण मनोमन दाद देतो. आज्जी, तुम्हाला आमच्या संपूर्ण टिमकडून मनापासून नमस्कार. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, नक्की प्रतिक्रिया द्या. आपल्याला असे वायरल व्हिडियोज वरील लेख वाचायला आवडत असतील तर आपण आमच्या वेबसाईट वर विविध लेख वाचू शकता. तसेच मनोरंजन विश्वातील बातम्याही आपल्याला आमच्या वेबसाईटवर वाचायला मिळतील. आमच्या वेबसाईटला शेअर करायला आणि बुकमार्क करायला विसरू नका.

बघा व्हिडीओ:

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.