Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजीने गायलेलं हे अतरंगी गाणं पाहून हसू आवरणार नाही, बघा हा मजेदार व्हिडीओ

ह्या आजीने गायलेलं हे अतरंगी गाणं पाहून हसू आवरणार नाही, बघा हा मजेदार व्हिडीओ

सोशल मीडिया उदयास आला तिथपासून ते आजतागायत त्यात अनेक बदल झाले आहेत. यातील अनेक बदलांना आपण सगळे सोशल मीडियाचे वापरकर्ते कारणीभूत आहोत हे ही नक्की. कारण आपल्या आवडी निवडी लक्षात घेऊन, आपल्याला रुचेल, पटेल अशा पद्ध्तीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्समध्ये बदल होत गेले आहेत. आता तर असे काही बदल अपेक्षित आहेत की त्यामुळे येत्या काळात डिजिटल युगाच्या एका नवीन पर्वात आपण प्रवेश करू असे संकेत मिळत आहेत. पण म्हणजे केवळ आपलाच काय तो पगडा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पडला अस म्हणायचं का? उत्तर अर्थातच नाही.

कारण सोशल मीडिया आणि आपण हे दुहेरी नातं आहे. त्यामुळे आपल्यामुळे जसे त्यात बदल होत गेले आहेत तसे सोशल मीडियामुळे आपल्यातही होत गेले आहेत. त्याचं अगदी उत्तम उदाहरण म्हणजे आपल्या आधीच्या पिढ्या. मग ती आपल्या आई वडिलांची असेल वा आजी आजोबांची. सोशल मीडियाच्या सुरुवातीच्या काळात आपल्यापेक्षा या माध्यमाने या पिढीकडून चार शब्द ऐकून घेतले आहेत. पण आता बघा. हळूहळू का होईना या दोन्ही पिढ्यांनी सोशल मिडियासोबत जगणं शिकून घेतलं आहे. किंबहुना त्याचा वापर सफाईदारपणे करता येण्या इतपत या पिढ्यांनी मजल मारली आहे. यासाठी त्यांचं कौतुक व्हायलाच पाहिजे.

अर्थात त्यांना यासाठी प्रोत्साहन देण्यात आपल्या सारख्या तरुण पिढीचा ही वाटा आहेच. त्यामुळे हल्ली वर उल्लेख केलेल्या दोन्ही पिढ्यांतील काही जण हे स्वतः तर कधी कधी तरुण पिढीच्या साहाय्याने कंटेंट क्रिएटर म्हणून पुढे येताना दिसतात. त्यामुळे होतं एक की या पिढीतले सुप्त गुण आपल्या समोर येतात. मग हे सुप्त गुण म्हणजे अभिनय, नृत्य, गायन, पाककला आणि इतर अनेक कौशल्य असू शकतात. अर्थात काही वेळा असं ही होतं की कंटेंट क्रिएटर म्हणून कार्यरत होण्याऐवजी त्यांची एखादी कलाकृती दृष्टीस पडते. या माध्यमाची खासियत अशी की वर्षानुवर्षे या कलाकृती आपल्याला बघायला मिळू शकतात. त्यामुळे काही जण कंटेंट क्रिएटरच्या भूमिकेत नसली, तरी त्यांच्यातील सुप्त गुण आपल्याला दिसून येतातच. त्यात या कलाकृती युट्युब सारख्या नावाजलेल्या साईटवर असतील तर अजूनच छान. अशाच एका कलाकृतीचा आज आपल्या टीमने अनुभव घेतला. ही कलाकृती म्हणजे एका आजींनी केलेलं गायन आहे. बहुधा त्यांच्या नातवाने या गायनाचं चित्रीकरण केलेलं दिसतंय. पण सगळ्यांत महत्वाच्या दोन गोष्टी म्हणजे आजींचा छान आवाज आणि त्याला शोभेल असा बिनधास्तपणा. त्यातील बिनधास्तपणा अगदी पहिल्या क्षणापासून दिसून येतो.

आजी गाण्याची तान घ्यायला जातात तेव्हा याची कल्पना येते. अगदी खणखणीत आवाजात त्या गायला सुरुवात करतात. खरं तर भातशेतीची कामं सुरू असतात. त्यात काम करता करता आजींचं गाणं आणि सहकाऱ्यांचं त्याची मजा घेणं सुरू असतं. त्यात आजी गाणं पण मस्त उडत्या चालींचं घेतात. जुनं असलं तरी अस्सल कोळीगीत आहे ते. त्यामुळे आजही त्यावर बसल्या जागी आपले खांदे उडायला लागतात आणि मान डुलायला लागते. आगरी कोळी गीतांची ही एक खासियत आहे. कधीही,कुठेही, केव्हाही ऐका ! अंगात उत्साह संचारला म्हणूनच समजा. तर अशा या लोकप्रिय गाण्याच्या शेवटच्या काही ओळी आजी खणखणीत आवाजात म्हणून दाखवतात. खरं तर असे व्हिडियोज काही वेळेस अगदीच काही सेकंदांचे असतात. पण इथे तसं होत नाही. निदान सवा मिनिटभर आजींचं गाणं चालू असतं.

आपण या व्हिडियोची मनापासून मजा घेतो. आपल्या टीमला तर हा व्हिडियो एकदा बघूनच आवडला. त्याची आणि इतर व्हिडियोज बद्दल चर्चाच केली नाही. सरळ त्याविषयी लिहायला घ्यावं अस ठरलं आणि त्यातून आजचा हा लेख लिहिला गेला आहे. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही तो आवडला असेलच. पण आपण तो नसेल बघितला तर जरूर बघा. हा लेख संपल्यावर आपली टीम हा व्हिडियो शेअर करेल.

तसेच मंडळी आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम लेख लिहीत असते. आपल्यासोबत शेअर करत असते. आपणही त्यास उत्तम असा प्रतिसाद देत असता. त्यातून नवनवीन विषयांवर लिखाण करावं यासाठी प्रोत्साहन मिळत असतं. हे प्रोत्साहन आम्हाला यापुढेही मिळत राहील अशी खात्री आहे. आम्हीही आपल्यासाठी विविध विषयांवर लेख घेऊन येत राहू हे नक्की. असो. तर लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेख जरूर वाचा. आठवणीने ते शेअर करा आणि आनंद वाटत रहा. धन्यवाद !!!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.