Breaking News
Home / जरा हटके / ह्या आजीबाईंची तल्लख बुद्धी पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा व्हिडीओ

ह्या आजीबाईंची तल्लख बुद्धी पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा व्हिडीओ

काही गोष्टींचं नाव कधीही एका किंवा वाचा. धडकीच भरते. या यादीतलं सर्वोच्च स्थान अर्थातच गणित या विषयाचं. शाळा सोडून इतके वर्ष झाले तरीही गणिताचा नाद नकोच वाटतो. अर्थात व्यवहारातली आकडेमोड वगळता. पण अशी काही अवलिया माणसं ही असतात ज्यांना या विषयाची गोडी लागलेली असते. अशाच एका तल्लख स्मरणशक्तीच्या आजीबाईंचा वायरल व्हिडियो आमच्या टीम समोर आला आणि त्यावर आजचा हा लेख लिहायचं असं ठरलं. या व्हिडियोत आपल्याला एक आजीबाई आपल्या कुटुंबियांसमवेत बसलेल्या दिसतात. व्हिडियो जुना आहे आणि त्यामुळे व्यवस्थित दिसत नाही. पण एवढं मात्र नक्की जाणवतं की आजूबाजूला बऱ्यापैकी माणसं उपस्थित आहेत. व्हिडियो ची सुरुवात होते तेव्हा आजीबाई ४५ चा पाढा बोलून दाखवत असतात. हे ऐकून आपण जास्तीत जास्त किती पाढे म्हणू शकतो याची नकळत उजळणी आपल्या मनात होते.

उगाच अगदी. असो. पण या आजीबाईंचा पाढे म्हणण्याच्या सपाटा चालूच असतो. ८३ चा पाढा तुम्ही आम्ही कधी ऐकला तरी होता का? म्हणजे पाढा अस्तित्वात होता पण आपला काही संबंध थोडा येतो. त्यामुळे कल्पनाच नाही. पण या आजीबाई हा पाढाही म्हणून दाखवतात. मग ७५ आणि ८९ ह्यांचे पाढेही धडाधड बोलून दाखवतात. आपण केवळ ऐकत राहतो. कारण त्यांच्या या बुद्धिक्षमतेने आपण अवाक् झालेले असतो. पण हा तर पूर्वार्ध असतो फक्त. उत्तरार्धात आजी एक अधिक एक म्हणजे दोन, मग दोन अधिक दोन चार, चार अधिक चार म्हणजे आठ या पद्धतीने आकडेमोड सांगतात. तेव्हा तर आश्चर्याची परिसीमा आपण गाठलेली असते. कारण त्या अगदी काही दश लक्षांपर्यंत आपल्याला आकडेमोड करून दाखवतात. त्यांचं आपल्याला जसं कौतुक असतं, तसंच त्यांच्या कुटुंबियांना आणि उपस्थित व्यक्तींना सुद्धा कौतुक असतं. वेळोवेळी टाळ्या वाजवत आजींना प्रोत्साहन देण्याचं काम चालू असतं. मग कोणी तरी आजींना विचारतं. काय हो आजी हे कसं काय जमतं तुम्हाला ? आजी एक कारण देतात खरं, पण जुन्या व्हिडियो मुळे आपल्याला स्पष्ट असं काही कळत नाही.

पण तेवढ्यात एक ताई बोलायला लागतात. म्हणे, एकदा टीव्ही वर कार्यक्रम चालू असतो. त्यात आकडेमोड दाखवली जात असते. टीव्ही वरील कार्यक्रमात ही आकडेमोड करण्यासाठी कॅलक्यूलेटर वापरत असतात पण आजी मात्र सगळा हिशेब तोंडी करताना आढळतात. हा तो क्षण असतो जेव्हा आजींच्या या कौशल्याची जाणीव त्यांच्या आप्तांना होते. हा किस्सा सांगितला जातो आणि फ्रेम बदलते आणि कॅमेरामन चे पाय दिसायला लागतात. पुढच्या काही क्षणांत हा व्हिडियो संपतो. आत्ता पर्यंत आपण पाहिलेल्या व्हिडियोज मधील आश्चर्य वाटायला लावणाऱ्या व्हिडियोज पैकी हा एक व्हिडियो. या व्हिडियोतील त्या आजीबाईंना त्यांच्या कौशल्याबद्दल सलाम. तर त्यांच्यातील हे गुण ओळखणाऱ्या आणि सगळ्यांना सांगणाऱ्या त्या ताईंचे धन्यवाद. तुमच्या मुळे आम्हाला आजींविषयी थोडक्यात कळलं. आणि अर्थातच धन्यवाद आहेत ते शेवटच्या काही फ्रेम्स मधून पायाने गेस्ट अपिअरन्स देणाऱ्या कॅमेरामन चे. त्याच्यामुळे हा व्हिडियो पाहता आला.

आपल्याला मराठी गप्पावरचे लेख आवडतात आणि आपण ते आठवणीने शेअर ही करता. तसाच हा लेखही आवडल्यास नक्की शेअर करा. तसेच आपल्या टीमने लिहिलेल्या अन्य लेखांचा आनंदही घ्या. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *