Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजीबाईंनी गायलेलं गाणं होत आहे खूप वायरल, बघा व्हिडीओ

ह्या आजीबाईंनी गायलेलं गाणं होत आहे खूप वायरल, बघा व्हिडीओ

गाणं उत्तम होण्यासाठी गोड गळ्याची आणि सुरेल स्वरांची गरज असतेच. पण हे गाणं प्रेक्षकांच्या काळजात पोहोचण्यासाठी गायकाने / गायिकेने ते अतिशय आर्ततेने म्हणावं लागतं. अनेक वेळेस आपल्या आजूबाजूची माणसं याचमुळे आपली मनं जिंकून घेतील, अशी गाणी सादर करतात. अगदी गाण्याची कोणतीही विशेष पार्श्वभूमी नसताना. आज हे सगळं मांडण्याचं कारण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेले काही व्हिडियोज. अर्थात ही व्हिडियोज पाहण्याची मालिका सुद्धा एका व्हिडियो मधून सुरू झाली. या सगळ्या व्हिडियोतील एक सामायिक घटक म्हणजे त्यातील गायिका.

ही गायिका आहे सत्तरीची. त्यांचं नाव आहे जिजाबाई भगत. यवतमाळ तालुक्यातील दिग्रस जिल्ह्यातील हरसूल गावात त्यांचं वास्तव्य असतं. त्या एका वृ’द्धाश्रमात राहतात. त्यांच्या आवाजातील आर्त स्वरांनी सोशल मीडियावरील अनेकांचं लक्ष वेधून घेतलं ते मागील वर्षी. त्यांनी गायलेली आदमी मुसाफिर है, आता है जाता है हे गाणं खूप गाजलं. १९७७ साली आलेल्या अपनापन चित्रपटातलं मोहम्मद रफी आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं हे गाजलेलं गीत. जिजाबाई आपल्या आर्त स्वरांनी या गाण्याला चार चांद लावतात. त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या अनेक व्हिडियोज मध्ये हे गाणं आपल्याला त्यांच्या तोंडून ऐकायला मिळतं.

आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो सुद्धा असाच. यातही तेच गाणं जिजाबाई गात असतात. या गाण्याची भुरळ अनेकांना पडली तशीच ती विनोदाचा शिरोमणी अंशुमन विचारे यांनाही पडली. त्यांनी ११ एप्रिल रोजी आपल्या सोशल मीडियावर जिजाबाईंचा हा व्हिडीयो शेअर करत त्यांचं कौतुक केलं होतं. व्हिडियो च्या कॅपशन मध्ये लिहिलं होतं की हा एका को’विड सेंटर मधील व्हिडियो आहे आणि या आजींना मानाचा मुजरा. पण त्यांच्या अनेक चाहत्यांनी कमेंट्स मध्ये हा व्हिडियो वृद्धाश्रमातील असल्याचं म्हंटलं आहे. या व्हिडियोतील आजूबाजूला दिसणारी परिस्थिती बघता हा व्हिडियो कुठला हे म्हणणं थोडं संदिग्ध वाटतं, तसेच आमच्या टीमजवळ त्याविषयी ठोस माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे आपली टीम याबाबत काहीही भाष्य करू इच्छित नाही. पण एक मात्र खरं की जिजाबाईंच्या आवाजाने आपण जसे मंत्रमुग्ध होऊन जातो, तसेच तेथील उपस्थितही मंत्रमुग्ध होऊन जातात.

त्यांच्या देहबोलीतून हे जाणवतं. एक काका सुद्धा जिजाबाईंचं हे गाणं मोबाईल मध्ये रेकॉर्ड करत असतात. जिजाबाईंच्या एकंदर उदाहरणा वरून हे लक्षात येतं की कलेला वयाचं बंधन तर नसतंच तसेच सर्वोत्तम कलाकार कधीही लपून राहत नाही. त्यांची कला त्यांना लोकांसमोर आणतेच आणते आणि कौतुकास ही पात्र बनवते. जिजाबाईंना त्यांच्या या सुरेल प्रवासासाठी मराठी गप्पाच्या टिमकडून शुभेच्छा !

आपल्याला जिजाबाईंसारख्या उत्तमोत्तम कालाकारांविषयी असलेले लेख वाचायचे असतील तर मराठी गप्पा हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे आपल्याला हरहुन्नरी, उदयोन्मुख, अनुभवी अशा सगळ्या गुणी कलाकारांविषयीचे लेख वाचायला मिळतात. आपण त्यांचा आनंद नक्की घ्या. तसेच आपल्या टीमने लिहिलेले वायरल व्हिडियोज वरील लेखही वाचा. आपला स्नेह मराठी गप्पाप्रति वृद्धिंगत होत राहू दे ही सदिच्छा !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.