कलाकार हा प्रत्येक कलाकृती घडवत असताना ती सर्वोत्तम कलाकृतीच व्हावी या उद्देशाने घडवत असतो. प्रयत्नांची पराकाष्ठा करत आपलं सगळं कौशल्य पणाला लावत असतो. पुढे ही कलाकृती लोकांच्या समोर येते आणि मग त्यांनी दिलेल्या प्रतिसादावर अनेक वेळेस कलाकृती यशस्वी ठरली की नाही हे ठरवलं जातं. यासोबतच प्रत्येक कलाकृतीला जोखण्याचं अजून एक परिमाण असतं. हे परिमाण म्हणजे काळ. कलाकृती जेवढी उत्तम तितकी ती दीर्घकाळ टिकते आणि लोकांच्या मनावर राज्य करते. अशीच एक कलाकृती आपण पाच एक वर्षांपूर्वी अनुभवली. आजही त्या कलाकृतीची आठवण काढली की आपल्या पैकी बहुतेकांकडून त्या कलाकृतीविषयी प्रशंसाच निघते. ह्या कलाकृतीचं नाव म्हणजे सैराट. या सिनेमाची जादू काय आहे हे आम्ही पुन्हा सांगायला नको. या सिनेमातील गाण्यांनी प्रेक्षक मनावर जी छाप सोडली आहे ती तर विचारता सोय नाही. आजही या सिनेमातील प्रत्येक गाणं तेवढंच श्रवणीय आणि डान्स करण्यास उद्युक्त करणारं भावतं.
एवढंच कशाला या गाण्याचं रिमिक्स व्हर्जन करण्याचा मोह अनेकांना आवरलेला नाही. मग या अशा उडत्या गाण्यांवर नाचण्याचा मोह तरी कसा आवरावा. बरं डान्स करण्याला वयाचं बंधन नसतं. त्यामुळे अनेकजण आजही या गाण्यावर मस्त डान्स करताना दिसतात. तर काही वर्षांपूर्वी तर विचारायलाच नको. हे सिद्ध करणारा एक व्हिडियो नुकताच आपल्या टीमने पाहिला. हा व्हिडियो तसा जुना आहे. पण यात सैराट गाण्याच्या रिमिक्स व्हर्जन वर एक आजी अशा काही मस्त नाचल्या आहेत की ज्याचं नाव ते. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला काही महिलांचा घोळका डान्स करत असलेला दिसतो. पण आपलं लक्ष मात्र या व्हिडियोतल्या आजींकडे असतं. कारण ग्रुप मध्ये न नाचता त्यांचा त्यांचा स्वतःचा डान्स चाललेला असतो. बरं आजी डान्स पण मस्त करत असतात. रिमिक्स असल्यामुळे सैराट मधील एक डायलॉग ऐकायला येतो. आर्ची चा ‘शेतात चालले मी’ हा डायलॉग आपल्याला ऐकायला येतो आणि पुन्हा गाणं सुरू होतं. आजी एकदम डान्स पोझिशन घेत पाठीमागे वळण्याची स्टेप करतात.
आपण सगळे आनंदाने आणि आश्चर्याने चकित होऊन पाहत असतो. आपल्यातले काही जण तर अगदी टाळ्याच वाजवतील. आजी मात्र एकदम कुल असतात. त्यांचा मस्त डान्स चाललेला असतो. तेव्हा त्यांनी ग्रुप मध्येही डान्स करावा असं एक दादा खुणेने सुचवतात. आजींचा मोर्चा ही मग तिथे वळतो. काही क्षणांनी मग व्हिडियो ही संपतो. अगदी काही सेकंदांचा असा हा व्हिडियो आहे. बरं आजूबाजूला फार काही व्यवस्था केली आहे, मंच उभारून सजावट वगैरे केली आहे असेही नाही. आपल्या गावच्या मातीत ही सगळी मंडळी नाचत असतात. पण काय नाचतात. धमाल. आजीने तो दिल जित लिया. कमाल. याच आजींचा अजून एक व्हिडियो बघण्यात आला होता. त्यातही आजी मस्त डान्स करतात. पण सैराट वरील डान्स म्हणजे टांगा पलटी घोडे फरार. आपल्या टीमला तर हा डान्स अतिशय आवडला. आपणही हा डान्स पाहिला असेल तर आपल्यालाही आवडला असणार यात शंका नाही.
यानिमित्ताने आपल्या टीमने लिहिलेले लेखही आपण आवडीने वाचता आणि शेअर करता हे विशेष करून नमूद करावयास हवं. आपल्या या कृतीमुळे आपल्या टीमला नवनवीन विषय शोधून त्यावर लेखन करण्याचं प्रोत्साहन मिळतं, ऊर्जा मिळते. तेव्हा आपला पाठिंबा आपल्या टीमच्या पाठी सदैव असू द्या आणि एक बाब लक्षात ठेवा. ‘लेख वाचत राहा, शेअर करत राहा’. आपल्या पाठींब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !! लोभ असावा.
बघा व्हिडीओ :