आपल्या टीमकडून वाचकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम लेख लिहिले जात असतात. त्यांचं प्रमाण ही तसं जास्त असतं. खरं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर लेख लिहितो आम्ही की काही वेळा ओळखीची माणसं विचारतात आम्हाला- तुम्हाला कंटाळा येत नाही का रे. त्यावर आमचं उत्तर असतं – कंटाळा कशाला येईल? उलट आमच्या टीम मधल्या सगळ्यांसाठी हे लेखन एखाद्या टॉनिक सारखं काम करतं. खरंच आहे ते. कारण इतर कामांमधून थकून भागून आल्यावर काम करताना तर एखाद्या टॉनिकचच काम हे लेख करतात.
बरं विषय ही विविध असतात. त्यामुळे अजून गंमत येते. कारण काही ना काही नवीन शिकायला मिळतंच मिळतं. त्यात आजच्या सारखा विषय असेल तर बघायलाच नको. आजचा विषय आहे एक वायरल व्हिडियो. अहं ! कंटाळून जाऊ नका. आज बघितलेला व्हिडियो हा काही नेहमी सारखा वायरल व्हिडियो नाहीये. किंबहुना त्यापेक्षा ही झकास असा हा व्हिडियो आहे. कारण हा व्हिडियो आहे एका आजी आजोबांचा. होय, एका वयाने जास्त पण मनाने तरुण असणाऱ्या जोडीचा. काही वर्षांपूर्वी एक जाहिरातीची सिरीज आली होती बघा. त्यात एक आजी आजोबा आणि त्यांचं विविध ठिकाणी फिरणं, आयुष्याची मजा घेणं यास केंद्रस्थानी ठेवलं होतं. या सिरीज ने आपल्या सगळ्यांची मनं जिंकली होती.
हा व्हिडियो म्हणजे या जाहिरातीचं खऱ्या आयुष्यातील उदाहरण आहे की काय अस वाटत राहतं. या व्हिडियोत आपल्याला जे आजी आजोबा भेटतात ते उत्साहाचं आणि आयुष्य मस्त रित्या जगण्याची उमेद देऊन जातात. बरं हे सगळं त्यांच्या नकळत होत असावं. कारण हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा जाणवतं की समोर एक डान्स फ्लोअर तयार केलेला आहे. तसेच डीजे गाणं वाजवतो आहे. त्यावर काही इतर जोड्या नाचताहेत. तर काही लहान मुलं ही आहेत. पण या सगळ्यांचं आणि आजूबाजुंच्याच्या आकर्षणाचा विषय आहे ते वर उल्लेख केलेले आजी आजोबा. बरं हे दोघे मात्र इतरत्र कोठेही न बघता फक्त डान्सवर लक्ष केंद्रित करून असतात. या संपूर्ण व्हिडियो भर हे दोघेही मस्तपैकी डान्स करत असतात. बरं इथे लांबून कोणी तरी त्यांचा हा डान्स चित्रित करत असतात. हे कोणी केलं आहे माहीत नाही. पण ज्यांनी कोणी केलं आहे त्यांना मनःपूर्वक धन्यवाद. कारण त्यांच्या मुळे या मनाने तरुण जोडीचा डान्स आपल्याला बघायला मिळतो. एरवी खरं तर डान्स फ्लोअर वर जाऊन काय नाचायचं असा प्रश्न अनेक जोडयांना पडलेला असतो. तसा तो नेहमीच पडतो. त्यावर उतारा म्हणून अनेक जोड्या नुसत्याच डुलत राहतात. मग ह्यांच्या कडे बघ त्यांच्या कडे बघ हे चालू असतं.
इथेही ते थोडंसं दिसून येतं. पण हे आजी आजोबा मात्र यातलं काही करत नाहीत. त्यांच्या डोळ्यासमोर एकच उद्दिष्ट असतं, ते म्हणजे त्या क्षणी उत्तमपैकी डान्स करणं आणि त्या क्षणांचा आनंद घेणं. बरं ते ही बाब कोणा इतरांसाठी करत नसतात हे कळून येतं. यात फक्त त्या दोघांचा आनंद सामावलेला असतो. त्यामुळे ते आजूबाजूचं भान ठेवून वागत असले तरी स्वतःच्या आनंदासाठी नाचताना दिसतात. इतरांनी आपल्याकडे बघावं म्हणून त्यांची चढाओढ नसते. किंबहुना इतरांनी आपल्याकडे बघावं वगैरे बाबी त्यांच्या खिजगणतीतही नसतात. त्यात मंडळी या दोघांचा डान्स एवढा लयबद्ध, शिस्तीचा असतो की भल्याभल्यांनी शिकावं. ते करत असलेल्या प्रत्येक स्टेपची त्यांना जाण असते. त्यामुळे डान्स करताना कुठेही घाई गर्दी दिसत नाही. तसेच अवघडलेपण ही नसतं. तसेच आपण करतोय ते वावगं वा जगावेगळं काही आहे असंही त्यांच्या वागण्यातून दिसून येत नाही. त्यामुळे आपसूकच त्यांच्या प्रत्येक डान्स मुव्ह्ज या इतक्या सहजगतीने होतात की विचारू नका. या सगळ्या गोष्टींमुळे आपलं लक्ष या जोडीवरून हटत नाही. आपणही जर हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला ही हा व्हिडियो पाहतच रहावा आणि संपूच नये असं वाटलं असणार आहे हे नक्की. पण आपण हा व्हिडियो पाहिला नसेल तर जेव्हा हा व्हिडियो पाहाल तेव्हा जरूर वाटेल.
आमची टीमही एरवी काही व्हिडियोतील ठराविक क्षणांबद्दल बोलत असते. ते कोणत्या वेळेस होतात हे सांगत असते. पण आज मात्र आम्ही अस करणार नाही. कारण हा अख्खा व्हिडियोच पाहण्यासारखा आहे, त्यामुळे आपण हा सगळा व्हिडियोच पहावा. त्यात व्हिडियो अवघ्या सवा मिनिटांचा आहे. त्यामुळे जास्त वेळही जाईल असं नाही. पण एकदा का आपण हा व्हिडियो बघितला की पुन्हा पुन्हा पाहाल आणि त्याचा आनंद घ्याल हे नक्की. कारण कोणत्याही वयात तारुण्य कसं जपावं याचं उत्तम उदाहरण या व्हिडियो सारखं क्वचितच दुसरं कोणतं असेल. तसेच इतरही बऱ्याच गोष्टी आपण या जोडीकडून शिकण्यासारख्या आहेतच. आपल्या टीमने तर काही गोष्टी नक्किच शिकून घेतल्या आहेत. असो.
तर मंडळी हा होता आजचा लेख. या जोडीच्या मस्त डान्स परफॉर्मन्स ने मनापासून आनंद झाला. म्हंटलं आपल्या वाचकांना याविषयी काळायलाच हवं. त्यातूनच हा लेख घडला. आपल्या आमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :