Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजी आजोबांनी सर्वांसमोर केला जबरदस्त डान्स, बघा हा व्हिडीओ

ह्या आजी आजोबांनी सर्वांसमोर केला जबरदस्त डान्स, बघा हा व्हिडीओ

सोशल मीडियावर रोज अक्षरशः व्हायरल व्हिडीओचा धुमाकूळ चालू असतो. भारी गोष्ट म्हणजे सेलेब्रिटी सोडता सगळ्या लोकांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत, गाण्या-नाचण्यापासून तर अपघातापर्यंत, भांडणापासून तर चोऱ्यापर्यंत… सगळे सगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. या व्हायरल व्हिडीओला कोणतेही बंधन नसते. यातले काही व्हिडिओ आपलं तेवढ्यापुरतं मनोरंजन करतात. तर काही व्हिडिओ आपल्याला अवाक करून विचार करायला भाग पाडतात. पण सोशल मीडियावर एखादाच व्हिडिओ असा असतो, जो आपलं मन कायमचं जिंकतो. जो कायमस्वरूपी लक्षात राहतो. असे खूप मोजके व्हिडिओ असतात. अशातच आता एक भन्नाट असा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ यापूर्वी एकदा जबरदस्त व्हायरल झाला होता. या व्हिडीओत खूप काही वेगळं नाही, जे आहे ते सर्वसामान्य आहे मात्र तरीही हा व्हिडीओ का व्हायरल होतोय?, हे जाणून घ्यायलाच पाहिजे.

आजच्या या आमच्या टीमकडे आलेल्या व्हायरल व्हिडीओत 2 व्यक्ती नाचत आहेत. आता तुम्ही म्हणाल, त्यात काय नवीन? आता नाचणं ही काही फार अवघड गोष्ट नाही. कुणीही नाचू शकतं. डान्स रिऍलिटी शो मध्ये तर अगदी 3-4 वर्षाची पोरं सुद्धा दणकून नाचतात. मग आम्ही तुम्हाला सांगू की, या व्हिडीओत नाचणारे कुणी तरुण नाही तर अक्षरशः म्हातारी व्यक्ती आहेत. तर तुम्ही म्हणाल… लोक जुन्या काळातही नाचायचे आजही नाचतात. म्हातारी माणसं आजही लेझीम खेळताना, ढोल बडवून नाचतात. तुमच्या व्हिडीओत नवीन काय?

तर आमच्या टीमकडे आलेल्या व्हायरल व्हिडीओत एक आजी आणि आजोबा नाचत आहेत. तेही जोडीने…ही जोडी स्वतःमध्ये हरवून मनमुराद डान्स करत आहेत. निखळ मनानं डान्स करणाऱ्या या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अनेकांच्या पसंतीस उतरत आहे आणि म्हणूनच व्हायरल पण होत आहे. आता या दोघांनी पण साठी ओलांडलेली असून ते नाचताना प्रचंड ऊर्जा घेऊन नाचत आहेत.

खरं बघता या वयात आता शहरातली आणि नीट आयुष्यभर नोकरी केलेली लोक धड फास्ट चालू सुद्धा शकत नाहीत. पण या आजी आजोबाचा हा तुफान डान्स बघून तरुण मंडळी सुद्धा चाट पडली असतील. अगदी तरुण युवकाने आणि मुलीनं डान्स करावं, अशी लचक आणि अदा या दोघांच्या पण नाचण्यात दिसत आहे. त्यांच्या नृत्यात दिसत आहे. खरंतर ग्रामीण भागातल्या लोकांसाठी असं काही करणं आणि जोडीनं या वयात सोबत नाचणं म्हणजे वेडेपणा ठरेल. मात्र दुनिया गेली तेल लावत आपण आपल्याच धुंदीत जगायचं.असा भाव घेऊन हे दोघे नाचत आहेत. या जोडप्याचा कॉमेडी आणि मनमोकळा डान्स व्हिडिओ अनेकांना सुखावणारा आणि निखळ आनंद देणारा ठरत आहे.

हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *