Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजोबांचा आवाज ऐकून तुम्हीदेखील मंत्रमुग्ध व्हाल, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

ह्या आजोबांचा आवाज ऐकून तुम्हीदेखील मंत्रमुग्ध व्हाल, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

आपण अनेक वायरल व्हिडियोज बघत असतो. त्यातील डान्सच्या वायरल व्हिडियोज ची संख्या जास्त असते. त्यातही लहान मुलांचे डान्सचे व्हिडियोज म्हणजे सगळ्यांत जास्त लोकप्रिय ठरतात. पण नजीकच्या काळात आपण बघितलं असेल तर अनेक आजी आजोबांचे डान्सचे व्हिडियोज ही वायरल झालेले आपण पाहिले असतीलच. हे व्हिडियो बघून त्या आजी आजोबांचं कौतुक वाटतं. तसेच या वयातही त्यांना स्वतःची आवड जोपासावी वाटली आणि त्यावर त्यांनी अंमल केला आहे हे बघून विशेष आनंद होतो. पण काही वेळेस अशी संधी प्रत्येक व्यक्तीला मिळतेच असं नाही. किंबहुना या अशा आजोबा आजींची संख्याही जास्त आहेच. पण सोशल मीडियाच्या काळात हे आजी आजोबा सुद्धा सगळ्यांच्या समोर येतात.

आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो हा अशाच एका आजोबांचा आहे. त्यांचं एकंदर व्यक्तिमत्त्व पाहता त्यांची आर्थिक परिस्थिती तो व्हिडियो रेकॉर्ड करताना व्यवस्थित नसावी असं वाटतं. त्यांच्या जुन्या चष्म्यावरून हे जाणवतं. पण आजोबां मध्ये असलेली एक कला मात्र हा व्हिडियो रेकॉर्ड करणाऱ्याला माहिती झालेली असते. ती कला सगळ्यांसमोर यावी यासाठी त्याचा प्रयत्न असतो.

व्हिडियोच्या सुरुवातीलाच तो आजोबांना गाणं गायला सांगतो. पण आजोबा मात्र त्यास नकार देतात. पण या भावाचा आग्रह काही सुटत नाही, तेव्हा ते गाणं सुरू करतात. त्यांच्या स्वरातील आर्तता ही अगदी पहिल्यापासून लक्षात येत असते. ते गात असलेलं गाणं असतं – अपराध चित्रपटातलं ‘सांग कधी कळणार तुला, भाव माझ्या मनातला’. सीमा देव आणि रमेश देव या लोकप्रिय जोडीवर चित्रित झालेलं हे गीत. हे गीतही तेवढंच लोकप्रिय आहे. जुन्या गाण्यातील शब्द ऐकत राहावेसे वाटतात. त्यातील अर्थ समजून घ्यायला आपल्या प्रत्येकाला आवडतो. त्यात या आजोबांच्या स्वरांनी या गाण्याला एक वेगळाच परिणाम प्राप्त होतो. एकप्रकारची भावनिक खोली आपण या आजोबांच्या गायकीतून अनुभवतो. आजोबा जवळपास दीड मिनिटांतून जास्त वेळ गाणं गातात. या संपूर्ण वेळेत आपलं लक्ष त्यांच्या गाण्यावर असतं. प्रत्येक शब्दातील अर्थ समजून घेत जेव्हा गायक गाणं गातात तेव्हा ते आपसूक प्रभावी होतंच. हे आजोबा म्हणजे याचं मूर्तिमंत उदाहरण ठरतात. त्यांच्या मुळे हे गाणं पुन्हा आपल्याला भावविश्वात घेऊन जातं.

प्रत्येकाच्या मनात एखादी तरी अशी व्यक्ती असते की जिला उद्देशून असं म्हणावसं वाटत असतं – की कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला. पण प्रत्येक वेळी त्या समोरील व्यक्तीला आपल्या मनातील भाव कळतोच असा नाही. तर काही वेळेस तो भाव कळेपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं असतं. असो. शेवटी आठवणी त्या आठवणी. ही अशी जुनी गाणी ऐकली की नकळत डोकावतात, काही क्षण रेंगाळतात आणि मग पुन्हा लुप्त होऊन जातात आणि आपणही आपल्या दैनंदिन जीवनात व्यस्त होतो. मग पुन्हा कधी एखादं जुनं गाणं कानावर पडतं आणि पुन्हा हे चक्र सुरू होतं. असो. या आजोबांच्या गायकीने आजही आपण प्रत्येक जण त्या आठवणीत काही काळ गुंग होऊन गेलो असणार, हे नक्की.

आपल्या टीमला हा व्हिडियो आणि त्यातील या आजोबांचा आवाज खूप आवडला. त्यातील आर्तता मनाला स्पर्शून गेली. तुम्हाला ही असाच काहीसा अनुभव आला असेलच ना. तेव्हा आपला अनुभव कमेंट्स मध्ये लिहून शेअर करा. तसेच आपल्या सकारात्मक सूचना आणि अभिप्राय आम्हाला कळवत राहा. आपल्या टीमच्या लेखांचे नियमित वाचक असण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *