आता आपण म्हातारे झालो आहोत, आता आपले काय राहिले आहे? असे एका ना अनेक कारणे सांगूनआणि काही लोक वयाची कारणे पुढे करून नेहमी चालणे व महत्त्वाचे काम करण्यास नकार देत असतात. तर दुसऱ्या बाजूला मात्र सत्तरीहून अधिक वयाची असलेली काही मंडळी अतिशय उत्साही आणि उत्स्फूर्त असल्याचे आपल्याला दिसतात. आपल्याला वेगवेगळ्या स्वभावाची माणसं ही सगळीकडेच भेटत असतात. त्यातही गावाकडची माणस ही काही वेगळीच भासतात. कारण ते कोणतंही काम असुदे, ते करायला ते अजिबात लाजत नाहीत अगदीच बिनधास्तपणे ते काम करून ही लोक मोकळी होतात. मात्र आपण शहरातील लोक, आपल्याला बाकी चार लोक काय म्हणतील याचा विचार करत बसतो पण त्याउलट गावची माणस मात्र सगळंच अगदी बिनधास्त आणि हटके करतात.
आणि त्यामधे सुद्धा जी गावाकडची म्हातारी माणसं असतात ते तर एकदमच अतरंगी असतात. मग कोणती जत्रा असो किंवा मग कुणाची वरात… आणि त्या वरातिमधे मग डफड असो किंवा मग हलगी आणि यावर नाचणाऱ्या गावाकडच्या माणसांना तोडच नसतो. अशातच आमच्या हाती एक असाच व्हिडिओ लागला आहे आणि या व्हिडिओ मधे एकदम एक म्हातारा असलेला माणूस फार जोरदार मोमेंट्स घेऊन अतिशय मनोरंजक पणे नाचत असल्याचे बघायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या बाजूला महिलांचा आणि इतर काही जणांचा वेढा पडलेला आहे.
हा व्हिडीओ एका घरगुती कार्यक्रमातला असल्याचा दिसून येत आहे. या गावातील लोकांना आणि विशेषतः महिलांना या आजोबांचा डान्स फारच आवडला असल्याचे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. एवढंच काय तर खास आजोबा डान्स करत आहेत, म्हणून या महिला तिथे आवर्जून थांबल्या आहेत. आता या आजोबांच्या डान्स च एवढ सगळ्यांना कौतुक आहे, म्हणजे या आजोबांनी केलेला डान्स हा किती भारी असेल, याचा तुम्ही अंदाज लावूच शकता.
सर्वसाधारणपणे लोकांनी त्यांच्या वयाचे साठ वर्षे ओलांडले की अनेकजण अंथरुणाला खिळत असतात. परंतु, या व्हिडिओ मधील आजोबांनी त्यांच्या वयाची साठी ओलांडली असली तरीही या आजोबांचा उत्साहच हा काही वेगळाच आणि दांडगा असल्याचे दिसत आहे. डान्स करत असताना या आजोबांच्या अंगातून सळसळून उर्जा वाहत असल्याचे दिसून येत आहे. ते हारे हारे ह्या गाण्यावर चक्क जोरजोरात उड्या मारत गोल फिरत डान्स करत आहेत. आणि त्यांचे अवयव देखील या वयात त्यांना तितक्याच उत्साहाने साथ सुद्धा देत आहे. कारण काही काही लोक हे फक्त शरीराने थकतात पण मनाने मात्र ते कायमच तरुण असतात. पण तरी सुद्धा ते कायम उत्स्फूर्तपणे जे काही काम असेल तर करत असतात. परंतु हे आजोबा मात्र शरीराने आणि मनाने देखील तरुणच म्हणावे लागणार आहेत.
बघा व्हिडीओ :