Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजोबांच्या डान्सचा प्रकार अजून कोणालाच समजला नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या आजोबांच्या डान्सचा प्रकार अजून कोणालाच समजला नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

गाणं, बजावणे, नाचणं हे सगळं आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे. बहुतांश वेळा हा आपल्या मनोरंजनाचा भाग असतो. पण अनेकवेळा याचा वापर स्वतःच्या मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी केला जातो. जेव्हा एखादा कलाकार या भावना व्यक्त करतो तेव्हा त्यात बऱ्याच अंशी सुसूत्रता, साचेबद्धपणा असतो. जो एका उत्तम सादरीकरणा साठी महत्वाचा असतो. पण जेव्हा एखाद्या सामान्य माणसाला फक्त व्यक्त व्हायचं असतं, त्यातून आनंद घ्यायचा असतो पण प्रेक्षकांना खुश वगैरे करायचं नसतं, तेव्हा यात सुसूत्रता असणं, साचेबद्धपणा असणं हे गरजेचं नसतं.

कारण आपण जे करतोय ते मुळात सादरीकरण म्हणून गणले जावं अशी सामान्य माणसाची इच्छा नसते. फक्त आणि फक्त आनंद मिळवणं एवढीच अपेक्षा असते. हा स्वभाव अनेकवेळा लहान मुलांमध्ये दिसून येतो. कारण इतरांवर आपला प्रभाव पडायला हवा वगैरे भाव त्यांच्या मनात नसतात. इतरांवर आपला प्रभाव पडावा हे सगळे मोठया माणसांचे विचार असतात. परिणामतः जस जसे वय वाढत जातं, तसतसे यातील फोलपणा लक्षात येतो. कलाकार असो वा नसो, पण कलेचा वापर स्वतःच्या आनंदासाठी केला तरी पुरेसा असतो ही समज यायला लागते.

याचाच प्रत्यय म्हणून अनेकजण स्वतः मधेच गुंग असलेले आपण पाहतो. आपल्या दृष्टीने त्यांचं काय चाललेलं असतं हे त्यांनाच ठाऊक !एका अर्थी हे खरं ही आहे. पण त्यातही आनंद असतोच. भले तो आपल्यासाठी नसेल, पण त्या व्यक्तींसाठी नक्कीच असतो. याचंच उत्तम उदाहरण आपल्या टीमच्या पाहण्यात आलं ते एका वायरल व्हिडियोच्या माध्यमातून ! हा व्हिडियो दोन ते तीन वर्षे जुना आहे. बहुधा आपणही त्याला पाहिलं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण नसेल पाहिला किंवा आठवत नसेल तर इथे त्याविषयी जाणून घ्या. व्हिडियो सूरु होतो तेव्हा आपल्याला एक मैदान सदृश्य जागा दिसते. जवळच एक रस्ता असतो आणि त्यावरून वाहतूक होत असते. तसेच मैदान सदृश्य जागेवर एक छोटा मंडप टाकलेला असतो. त्यात काही मंडळी बसलेली असतात. सोबतच कानावर संबळ वाजत असल्याचा आवाज तेवढा पडत असतो. पण वाजंत्री मात्र दिसत नसतात. तेवढ्यात आपली नजर आणि कॅमेरा एका व्यक्तीवर स्थिरावतो. ही व्यक्ती म्हणजे एक आजोबा असतात. पांढऱ्या रंगाचे पण आता धुळीने माखलेले कपडे घालून हे आजोबा त्या जागी उभे असतात. कदाचित त्याच मैदानात सतत वावरल्याने त्यांचे कपडे तसे झाले असावेत.

बरं ते नुसते वावरले नसावेत तर आनंदाने वावरले असावेत असं वाटतं. कारण त्यावेळी जो संबळचा आवाज येत असतो त्यावर ते नाचत असतात. अर्थात वर उल्लेख केल्याप्रमाणे हा नाच फक्त त्यांच्या स्वतःच्या आनंदासाठी असतो. त्यात सुसूत्रता आणि साचेबद्धपणा नसतो. तसेच उपस्थित असलेल्या कोणासाठीच हा डान्स नसतो. तो असतो फक्त स्वतःसाठी ! हे कळून येतं कारण आजोबांना इतर कोण आपल्याकडे बघताहेत वगैरे काही फिकीर नसते. ते आपल्या धुंदीत असतात. पण एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे वाजणारी संबळ एखाद्या गाण्याची धून वाजवत असावी. कारण त्यानुसार आजोबांच्या हालचाली होत असतात. त्या गाण्यात एखाद्या ठिकाणी वाक्य असेल तर कदाचित ते आजोबा त्यावर हातवारे करत असावेत असा अंदाज बांधता येतो. तसेच जेव्हा केवळ संगीत वाजत असेल तेव्हा त्यांचा बाकीचा डान्स म्हणावा असा प्रकार चालू असतो. अर्थात आपलं अवलोकन यापेक्षा ही वेगळं असू शकतं. पण आपलं एका गोष्टीवर मात्र एकमत होईल ते म्हणजे हे आजोबा फक्त स्वतःच्या आनंदासाठी नाचत असतात, परिणामी ते जे काही करतात त्याला कोणतंही ठराविक नाव देता येत नाही. अन्य शब्दांत सांगायचं झालं तर आजोबा कुठच्याही साच्यात अडकत नाहीत. एका अर्थी हे चांगलं ही आहे. कारण एकदा का साचेबद्ध गोष्टींची सवय झाली की त्यातील मजा निघून जाते. नाच, गाणं आणि अन्य कला ही यासाठी अपवाद नसतात हे नक्की.

असो. तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *