Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजोबांनी जे केलं ते पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा व्हिडीओ

ह्या आजोबांनी जे केलं ते पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा व्हिडीओ

वाढत्या वयानुसार शारीरिक आणि आरोग्याच्याही समस्या बळावतात. शरीर थकतं, नीट चालणंही होत नाही. अशात कुठे प्रवास करणे तर दूरचीच गोष्ट. अगदी काही लोकांना चालायची पण समस्या वाढत्या वयाने निर्माण होते. कुणाचे गुडघे साथ देत नाहीत तर कुणाला बाकीचे आजार जडलेले असतात. काही लोक तर असे असतात की, वयाच्या चाळीशीतच त्यांना म्हातारे झाल्याचा फील येतो. अगदी इतका की, त्यांचे वजन वाढलेले असते, ढेरी सुटलेली असते. सकाळी व्यायाम करायचा त्यांना कंटाळा असतो. म्हणजे चाळीशीत असूनही सत्तरी ओलांडली असल्यासारखे आयुष्य जगणारे आता अनेक लोक आहेत. खरं पाहिलं तर आधुनिक वैद्यकीय उपचार पध्दतीमुळे माणसाचं आयुष्यमान वाढलं आहे. मात्र त्यामुळे प्रत्येकाला म्हातारपण टळणार आहे असं नाही तर ते येणारच आहे. म्हणूनच वृध्दापकाळात आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. वयाच्या साठीनंतर शारीरिक, मानसिक क्षमता कमी होतात आणि मेंदूचे काम हळुहळू कमी होते.

आयुष्यभर भौतिक सुखासाठी झटलेले लोक आयुष्याच्या शेवटी उत्तम आरोग्य व समाधान शोधत असतात. म्हणूनच की काय साठीच्या उंबरठ्यावर अनेक लोक खूप हैराण झालेले आपल्याला दिसून येतात. मात्र काही असेही आजोबा असतात की वयाच्या सत्तरी, ऐंशी किंवा 85 ओलांडली तरीही ते ठणठणीत असतात. आता आमच्याकडे एका अशा आजोबांचा व्हिडीओ आला आहे, ज्यांचे वय तर खूप आहे पण ज्या पद्धतीचा व्यायाम ते करत आहेत, तो अवघ्या 20-25 वर्षाच्या तरुणालाही करता येणार नाही.

वाढत्या वयासोबत सहसा माणूस दिवसेंदिवस हतबल होत जातो. त्याला विविध आजार आणि शारीरिक समस्यांचा सामना करावा लागतो. चेहऱ्यावर सुरकुत्या येतात, केस पांढरे होतात, तोंडातील दात निरोप घेऊ लागतात. बसणं-उठणं जीवावर येऊ लागते. डॉक्टरची नाईलाजाने का होईना नियमितपणे भेट घ्यावी लागते. परिस्थिती अशी निर्माण होते, की शरीराला सरळ करण्यासाठी काठीचा आधार लागतो. यालाच आपण म्हणतो म्हातारपण.

इथे मात्र एका आजोबांबाबत वेगळेच काही घडले आहे. या आजोबांनी जणू म्हातारपणाची व्याख्याच बदलून टाकली आहे. तर व्हिडीओत आपल्याला दिसून येईल की, एका ग्राउंडवर अनेक लोक व्यायाम करत आहेत. त्यात एक आजोबा पण व्यायाम करत आहेत. डबल बार वर ज्या पद्धतीने ते व्यायाम करत आहेत, ते पाहून तुम्ही 100% शॉक व्हाल. इतकं वय असतानाही हा माणूस इतक्या सहजपणे कसं काय डबल बार वर व्यायाम करू शकतो? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. पण हे आजोबा मात्र या त्यांच्या नेहमीच्या मैदानात खतरनाक व्यायाम करताना दिसले. त्यांचं वय वाढलं होतं, पण त्यांच्यातील जोश तरुणांसारखाच आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहूनच थक्क व्हाल. आता या आजोबांचा व्यायाम पाहून मीही व्यायाम करण्याचे ठरवले आहे. तुमचं काय भावांनो…

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *