Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजोबांनी धोतर पकडून केला अतरंगी डान्स, आजोबांचा उत्साह पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या आजोबांनी धोतर पकडून केला अतरंगी डान्स, आजोबांचा उत्साह पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

आयुष्यात बाकी काही पुढे जावो न जावो, वय हमखास पुढे जात असत. बरं, हे वाढतं वय थांबवण्यासाठी आपण काही करू शकतो का? तर तसही नाही. पण म्हणून आपलं वय लपवण्यापासून आपल्याला कोणी अडवू शकतं का? तर अजिबात नाही. काय एकेक तऱ्हा असतात आपल्या, आपलंच वय लपवण्यासाठी !आता त्यांच्याविषयी काही वेगळं सांगायला नको. पण तरीही जे वय दिसायचं ते दिसतंच. पण म्हणून हिरमसून जायचं कारण नाही.

कारण जी मंडळी वयाने मोठी पण मनाने तरुण राहतात ती कोणत्याही वयात चिरतरुण दिसतात. कारण जे विचार तुमच्या मनात असतात तेच शेवटी तुमच्या वागण्या बोलण्यातून दिसून येतात. परिणामी तुमचं मन अगदी तरुण असेल तर आपसूक ते ही कळून येतं. तसेच आपण जे आयुष्य जगतोय, त्यावर आपलं नितांत प्रेम असायला हवं. त्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आपल्याला आनंद घेता यायला हवा. ज्यांना ही बाब जमते ते ही अगदी वृत्तीने चिरतरुण राहतात. अनेकवेळा त्यांचं वागणं हे त्यांच्या वयाच्या मानाने बरचसं तरुण वयाचं असतं. अगदी जोशपूर्ण असतं.

आता आज आम्ही पाहिलेल्या एका व्हिडियोतील आजोबांचं उदाहरण घ्या ना ! हा व्हिडियो तसा काही काळापूर्वीचा असावा असा अंदाज आहे. पण आजही यातील आजोबांचा जो उत्साह आहे तो एखाद्या तरुणाला ही लाजवेल असा आहे. होतं काय, तर व्हिडियो सुरू होतो आणि आपल्याला हे आजोबा समोर दिसायला लागतात. पांढरी टोपी, त्याला पांढरा रुमाल गुंडाळलेला, तसेच अंगात पांढरा सदरा आणि पांढरे धोतर असा त्यांचा पेहराव असतो. तसेच पाठीमागे काही जण वादन करत असतात. डीजे ही असतोच. पण गंमत म्हणजे एरवी आजोबांच्या वयाची माणसं या अशा गोष्टींना नाकं मुरडत असतात. काय तो आवाज, काय तो गोंगाट आणि बरंच काही बोलत असतात. काही बाबतीत त्यांचं बरोबर ही असतं, पण।अनेक बाबतीत केवळ विरोधाला विरोध होतोय की काय असंही वाटतं. असो. पण वर उल्लेख केलेले आजोबा मात्र एकदम जबरदस्त असतात. कारण व्हिडियो सुरू झाल्यापासून संगीत आणि आजोबा जे काही सुरू होतात की थांबायचं नाव घेत नाहीत. बरं कौतुकाची बाब अशी की आजोबा खरंच चांगला डान्स करत असतात.

आपण हा व्हिडियो नीट बघितलात, तर लक्षात येतं की आजोबा संगीतातले बिट्स पकडून बरोबर नाचत असतात. डान्स मनापासून आवडतो याचं हे उत्तम उदाहरण म्हणायला हवं. म्हणजे या आजोबांमध्ये आधीपासूनच डान्सविषयी आवड असावी असा अंदाज बांधता येतो. या पूर्ण व्हिडियोत आजोबा जसे बिट्स पकडून नाचतात तसेच बिट्स बदलले की स्वतःचा डान्स ही बदलतात. त्यांच्या स्टेप्स आणि डान्सची गती ही बदलते. हे अगदी सहजपणे ते करतात. हे एवढं सगळं आम्हाला सांगता येतंय कारण आमच्या टीमने हा व्हिडियो अनेकवेळा बघितला आहे. याची कारणं दोन ! एक तर या लेखाच्या निमित्ताने हा व्हिडियो वारंवार बघितला. दुसरं कारण असं की आजोबांचा उत्साह आणि त्यांनी केलेलं मनोरंजन आवडून गेलं. कारण खरंच त्यांच्या वयाच्या मानाने त्यांचा जो उत्साह यात दिसून येतो तो वाखाणण्याजोगा होता आणि आहे. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला हे पटलं असेल. पण आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर एकदा जरूर बघा. आपल्याला नक्की आवडून जाईल. आपल्या वाचकांसाठी खास म्हणून, आपली टीम हा व्हिडियो लेखाच्या शेवटी शेअर करते आहे.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *