Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजोबांनी नवीन प्रकारे खेळलेला दांडिया होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

ह्या आजोबांनी नवीन प्रकारे खेळलेला दांडिया होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

इंग्रजीत ‘Age is just a number’ असं म्हणण्याची पद्धत आहे. वय ही केवळ एक संख्या आहे असा त्याचा शब्दशः अर्थ. पण त्याचा खरा उपयोग अनेक वृद्ध मंडळींना प्रोत्साहन देताना आणि त्यांच्यातील उत्साहाचं कौतुक करताना होतो. असंच मनापासून कौतुक करावं असा एक व्हिडिओ आमच्या टीमने पाहिला. काही वर्षांपूर्वी रेकॉर्ड केलेला हा व्हिडीओ आहे. पण यात सहभागी असलेल्या आजोबांच्या एका चमूने यात ज्या उत्साहाने दांडिया डान्स केला आहे त्यास तोड नाही. आपल्या ग्रामीण भागात सहसा लोककला, लोकगीतं, लोकनृत्यं यांना जास्त महत्व दिलं जातं. पण म्हणून मनोरंजनाचे इतर प्रकार डावलले जातात असं नाही. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे हा व्हिडीओ. या व्हिडियोत आपल्याला सात आजोबांचा एक चमू दिसतो. बॅकग्राउंडला एक मस्त हिंदी गाणं चालू असतं. प्रत्येकाच्या हातात दांडिया असतात. पहिल्या क्षणापासून ते शेवटपर्यंत म्हणजे अगदी ३० सेकंदात ही सगळी मंडळी त्या दांडिया रास गरब्याची मजा घेताना दिसतात.

सुरुवातीस त्यांना हा प्रकार काहीसा नवीन असल्याचं जाणवतं. कारण सगळेच एकमेकांना मदत करत करत दांडिया खेळत असतात. कधी कोणाच्या एका हातात दोन दांडिया असतात तर कधी स्टेप पुढे मागे होत असते. पण मग सुधारणा होते. आपल्या लेझीम खेळाच्या आठवणी हे आजोबा वापरतात हे दिसून येतं. कारण त्यांचे पाय त्याच पद्ध्तीने थिरकत असतात. त्यामुळे एक वेगळीच गंमत निर्माण होताना दिसून येते. मग दुसरं गाणं सुरू होतं आणि एक तरुण ही या गटात सामील होताना दिसून येतो. तर या गटातील दुसरे आजोबा दुसऱ्या एका व्यक्तीस या दांडिया रास मध्ये सामील करून घेण्यासाठी पुढे सरसावतात. हा दांडिया अगदी रंगात आलेला असतो. पण दु’र्दैवाने हा व्हिडीओ तेवढ्यात संपलेला असतो. काही कलाकृती किंवा काही व्हिडियोज असे असतात ना की जे कधी संपू नयेत, असं वाटतं त्यातला हा व्हिडीओ. अवघ्या अर्ध्या मिनिटांत ही जेष्ठ मंडळी दांडिया रास ची एवढी मजा घेतात. त्यांच्यामुळे आपल्यालाही गंमत वाटते.

पण आपली उत्सुकता शिगेला पोहोचली असताना व्हिडियो संपतो याचं वा’ईट वाटतं. असो. या अर्ध्या मिनिटाच्या व्हिडियोने काही क्षण का होईना मन प्रसन्न होतं आणि आपण हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहतो. आपल्या सगळ्यांना हा निखळ आनंद देणाऱ्या सगळ्या आजोबांना मनापासून नमस्कार. तसेच अशा मनाने तरुण आणि उत्साही मंडळींना प्रोत्साहन देणाऱ्या गावकडील मंडळींना मनापासून धन्यवाद ! पण एवढ्यात जाऊ नका बरं. ह्या डान्स करणाऱ्या आजोबांवरचा हा एकच व्हिडियो नाहीये. अजून एक व्हिडिओ आहे. पण त्यातल्या आजोबांना मात्र डान्स करण्यापासून परावृत्त केलं जातंय. कोण करतंय ? अहो खुद्द आज्जी. वाचा या वायरल व्हिडिओ वरील लेख. आपल्या या वे’बसाई’टवर असलेल्या स’र्च ऑप्शन मध्ये जा. त्यात वायरल आजोबा असं लिहून स’र्च करा. आपल्याला तो लेख नक्की वाचायला मिळेल. त्या लेखाचाही आनंद घ्या आणि दोन्ही लेख आठवणीने शेअर करा बरं का. वाचक म्हणून असलेल्या आपल्या नियमित पाठिंब्यासाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.