Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजोबांनी पार्टीमध्ये एका कोपऱ्यात केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या आजोबांनी पार्टीमध्ये एका कोपऱ्यात केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

लग्न म्हंटलं की अपेक्षित आणि अनपेक्षित किस्से घडणं हे आलंच. पण हे किस्से घडतात कोणामुळे ? अर्थातच विविध वृत्ती, स्वभावाच्या माणसांमुळे. त्यात लग्न म्हंटलं की नवरा नवरीचे नातेवाईक, मित्रमंडळी आणि ओळखिपाळखीचे असे कित्येक जण येतात. त्यामुळे किस्से घडणं हे होतंच. पण किस्से म्हंटलं की आपोआप आपल्या मनात विनोदी काही तरी घडलं असणार असेच विचार येतात. पण तसंच काही असण्याची गरज नाही. किस्से हे विविध प्रकारचे असतात. त्यातही काही किस्से हे न विसरावेत असेच असतात.

याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला एक व्हिडियो. खरं तर आपल्या टीमने आजपर्यंत बहुतांश वेळा वायरल व्हिडियोजवर लेखन केलं आहे. पण काही व्हिडियोज हे वायरल नसतात पण बघताच क्षणी मनात ठसतात. त्याविषयी आपल्या वाचकांना सांगावं अस वाटून जातं. आज पाहिलेला हा व्हिडियो अगदी तसाच आहे. असं काय आहे या व्हिडियोत ? तर या व्हिडियोत आपल्याला भेटतात एक काका. या काकांकडे बघितलं तर त्यांचं व्यक्तिमत्त्व एकदम रुबाबदार असल्याचं दिसून येतं. अगदी टापटीप सूट घालून काका लग्नाला आलेले असतात. खरं तर असं व्यक्तिमत्व कधी लग्नात वा समारंभात दिसलं की हे स्वभावाने शिष्ट असणार असा आपला नेहमीचा कयास असतो.

आता ही तसाच कयास झाला असता. पण काकांचा दिलखुलास आणि आयुष्याचा आनंद घेणारा स्वभाव आपल्याला वेगळंच चित्र दाखवतो. व्हिडियो सुरू झाल्यापासूनच आपल्या कानावर एक गाणं पडत असतं. ‘ये जवानी हें दिवानी’ चित्रपटातलं ‘हाय रे मेरा घागरा’ हे ते गाणं. यावर चित्रपटात रणबीर कपूर आणि माधुरी दिक्षीत या लोकप्रिय कलाकारांनी डान्स परफॉर्मन्स दिला आहे. आज या व्हिडियोत हे काका या गाण्यावर डान्स करताना दिसून येतात. सुरुवातीपासूनच त्यांनी जागी थिरकायला सुरुवात केलेली असते. या संपूर्ण व्हिडियोभर त्यांचं हात उंचावून नाचणं आपण बघत असतो. पण सगळ्यांत महत्वाचे असतात ते त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव. एकदम मस्त. या गाण्याचा ते मनोमन आनंद घेत असतात. इतका की आपसूक त्यांचा डान्स आणि गाणं यांची सांगड घातली गेल्याच जाणवतं. त्यामुळे आपसूक आपल्याला ही त्यांचा हा डान्स बघणं म्हणजे आनंद देणारी बाब ठरते. त्यात हा व्हिडियो तसा एका मिनिटापेक्षा कमी वेळेचा आहे. त्यामुळे चट्कन काही छान बघायला मिळाल्याचा आपल्याला आनंद ही होतोच. पण तेवढ्यावर आपलं भागत नाही.

कारण या काकांच्या वयाचे अनेक जण आपण आजूबाजूला पाहतो. त्यांची डान्स करण्याची आणि आयुष्यात आनंद घेण्याची इच्छा असते. पण स्वभाव म्हणा, अनुभव म्हणा वा विचारसरणी, त्यांना हा आनंद घेता येत नाही. पण वर उल्लेख केलेले काका मात्र कसलाही अभिनिवेश न बाळगता डान्स करतात. त्यामुळे त्यांचं सदाबहार व्यक्तिमत्व अधोरेखित ही होतं आणि आवडून ही जातं. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आमचं म्हणणं पटेल. पण आपण हा व्हिडियो बघितलेला नसेल तर जरूर बघा. आपल्याला हा व्हिडियो आवडून जाईल आणि खूप आनंद देईल. असो.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.