Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजोबांनी भर रस्त्यात केलेला डान्स पाहून हसू आवरणार नाही, आजोबांचा उत्साह तर तरुणांनाही लाजवेल

ह्या आजोबांनी भर रस्त्यात केलेला डान्स पाहून हसू आवरणार नाही, आजोबांचा उत्साह तर तरुणांनाही लाजवेल

डान्स ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर हसू उमटवते. आपले आवडते म्युझिक लागावं आणि आपण डान्स करावं याचा आनंद काही वेगळाच असतो. कधी कधी म्युझिक न लावताही लोक डान्स करत असतात. स्वत:च्या आतलं म्युझिक ऐकून डान्स करणं ही पण एक वेगळीच अनुभूती असते. त्यातही गावाकडचे लोक जर ढोल, ताशा, ढोलकी आणि संबळ यातलं काहीही वाजायला लागलं की लगेच त्यांची पावलं थिरकायला लागतात. शहरातील पोरं मात्र डीजेकडे आकर्षित झालेली असतात. गावाकडच्या लोकांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते नाचायला कुठेही लाजत नाहीत. दणकून मनसोक्तपणे डान्स करणं हे फक्त गावाकडच्या म्हाताऱ्यांनाच जमतं. कारण त्यांना स्वतःसाठी डान्स करायचा असतो. अशा कित्येक लोकांच्या डान्स क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल होतात. खरं तर सोशल मीडियावर रोजच लाखो व्हिडीओ क्लिप्स व्हायरल होतात. मात्र, त्यातील काही मोजक्या क्लिप्स अतिशय चकित करणाऱ्या असतात. या जगात एकापेक्षा एक कलाकार आणि करामती लोक आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या याच कलाकारीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता आमच्या हाती अशाच एका वयस्कर आजोबांचा व्हिडीओ हाती लागलेला आहे.

जशी जशी लोकं म्हातारी होत जातात, तशी तशी ती अचाट साहस दाखवू लागतात. असेच अचाट साहस दाखवणाऱ्या एका आजोबांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता त्यांनी साहस वगैरे काही दाखवलेलं नाही. पण त्याचं वय बघता इतक्या उत्साहात नाचणे, हे खरोखरच साहस म्हणावं लागेल.

गावाकडे एका लग्नाचा कार्यक्रम सुरू आहे. नवरदेवाची वरात निघणार आहे. पण त्यापूर्वी वाजंत्री आपली कला दाखवत आहेत. हे वाजंत्री एकदम उस्फुर्तपणे ढोल वाजवत आहेत. आणि हे ऐकून कित्येकांचे पाय थिरकायला लागले तसेच अनेक लोक मनातल्या मनात डान्स करायला लागले. एकदम पंजाबी स्टाईल ढोल वाजत आहेत. हे ढोल ऐकून कुणी नाचायला यायच्या आधी एक वयस्कर आजोबा नाचायला आले. आता हे म्हातारं 2-4 वेळा कमरेत वाकडं तिकडं होऊन एखादा मिनिट नाचले आणि गप बाजूला जाऊन बसेल असे ढोलवाल्यांना वाटले. म्हणून त्यांनी अजून जोरात ढोल बडवायला सुरू केला. आजोबा पण काही कमी नव्हता. कुणीही जोडीदार नसताना आजोबांनी एकट्यानेच दणक्यात नाचायला सुरू केलं.

तोंडात एक दात नाही, शरीर थोडंसं झुकलेलं, पांढऱ्या मिशांचा झुबका आणि डोक्यावर फेटा अशी अवस्था असलेले आजोबा जोरदार उत्साहात नाचत होते. त्यांची नाचण्याची स्टाईल पण एकदम हटके होती, जी व्हिडीओत तुम्हाला दिसेलच. या सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे या आजोबांचे वय झालेले असले तरी त्यांच्या मनातील तारुण्य अजूनही टिकून आहे. ते त्यांच्या उत्साहाने दिसून येते. स्वतःच्याच धुंदीत ढोलच्या तालावर ते मजेत डान्स करत आहेत. कशाचाही संकोच न करता ते डान्स करून जगण्याचा आनंद लुटत आहेत.

जगण्याचा आंनद कसा घ्यावा, हे या आजोबांकडून आपण शिकण्यासारखे आहे. सेल्फी आणि मोबाईलमध्ये बुडालेल्या या पिढीला खऱ्या आनंदाचा झरा काय असतो, खरं आयुष्य एन्जॉय करणं काय असत, हे या व्हिडिओत दिसून येईल. आता हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *