Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आजोबांनी सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल

ह्या आजोबांनी सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल

आठवणींमध्ये रमणे सगळ्यांनाच आवडते. त्यात आपण सगळेच जण आहोत. पण विचार केलाय का, की आपण आठवणींमध्ये का रमतो? कारण सोपं आहे. त्या त्या वेळी आपण काही तरी सुखाचे क्षण अनुभवलेले असतात. या क्षणांना कदाचित आजच्या काळात आपण पून्हा जगण्याची इच्छा बाळगून होत असतो म्हणून होत असेल. पण मग आता हे क्षण अनुभवता येत नाहीत का?

येऊ शकतात ना. पण वय, हुद्दा, राहणीमान या सगळ्याच गोष्टी आता मोठं झाल्यावर या आनंदाच्या आड येतात. या वरील सगळ्यांमध्ये एक सामायिक मुद्दा असतो तो म्हणजे लोकं काय म्हणतील. पण खरं सांगू का मंडळी, लोकं काही म्हणत नाहीत. मध्यंतरी एक छान विचार वाचला. त्यात लिहिलं होतं की लहानपणापासून ते वृद्धत्वापर्यंत आपण नेहमी विचार करतो की लोकं काय म्हणतील, पण त्या वयात कळतं की खरं तर कोणाचं लक्षच नव्हतं आपल्याकडे. अर्थात याचा अर्थ असा नव्हे की कंबरेचे सोडून डोक्याला बांधावं. अजिबात नाही. तारतम्य बाळगून ही आयुष्याची, त्यातील क्षणांची मजा घेता येतेच ना. ते ही अगदी ओंगळवाणे न वागता. खरं वाटत नाहीये? मग आज आपल्या टीमने बघितलेल्या व्हिडियो विषयी जाणून घ्या.

हा व्हिडियो आहे एका आजोबांचा. बहुतेक हरयाणा येथील आजोबा असावेत असं वाटतं. पण सांगू शकत नाही. असो. मुद्दा तो नाही. मुख्य मुद्दा हा आहे की हे आजोबा खरं तर वयाने मोठे आहेत पण त्याचं मन अजूनही तरुण आहे. किंबहुना त्यांनाही कळलं असावं की तारतम्य बाळगत आनंद घेतला तर कोणाचं काही म्हणणं असण्याच काहीच कारण नाही. किंबहुना सगळे जण आपण आनंदात आहोत बघून स्वतः सुदधा प्रेरित होतात. जशी आमची टीम झाली. होणारच ना हो. त्यांचं एवढं वय असूनही काय सुरेख नाचतात माहितेय आजोबा ! अगदी कडकडीत परफॉर्मन्स असतो त्यांचा ! जबरदस्त !! त्यात सुरुवातीला बँड वाजायला सुरू होतो तेव्हा पतंग उडवल्या सारख्या स्टेप्स करतात. पण नंतर अशी काही कंबर हलवतात की ओ हो मजा येते ! एखादया तरुणाला ही लाजवेल असे हे आजोबा नाचतात. त्यात गिरक्या घेणं ही असतं. त्यामुळे वाजत असलेल्या गाण्याची अजून मस्त अशी बहार येते. हा व्हिडियो खरं तर आहे केवळ ४८ सेकंदांचा, पण यातला आनंद हा त्यापेक्षा ही किती तरी जास्त आहे.

आमच्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. कारण या आजोबांची सुशेगाद वृत्ती आवडून गेली. वय कितीही असलं तरी तारतम्य बाळगत पण आयुष्याचा आनंद घेत ते नाचतात. मन मोकळेपणाने ते क्षण जगतात. आनंद होतो. आपणही हा व्हिडियो जरूर बघा. आपल्याला ही आवडून जाईल. बघितला असेल तर पुन्हा एकदा पहा. आनंद द्विगुणित होईल.

चला तर मंडळी, आपण व्हिडियो बघा. त्याचा आनंद घ्या. आमच्या या लेखाचा ही आपण आनंद घेतला असेलच. अहो घेणारच ना ! आपली टीम आपल्या वाचकांना केंद्रस्थानी ठेवून नेहमी लिखाण करत आलेली आहे. आपल्याला जे आवडेल ते लिहिलं पाहिजे याकडे आमचा कटाक्ष असतो आणि राहील. पण आपल्या प्रोत्साहना शिवाय हे शक्य नसतं. आपण हे प्रोत्साहन आम्हाला नेहमीच देत आलेले आहात. येत्या काळात ही त्यात खंड पडू देऊ नका. उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस येत राहतील याची खात्री बाळगा. ती जबाबदारी आमची आहे. आपण आपला वेळ आनंदात घालवा. एक मात्र करा. अगदी आठवणीने आमचे लेख जरूर शेअर करा आणि हा आनंद इतरांना ही वाटा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपली काळजी घ्या. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *