Breaking News
Home / मनोरंजन / ह्या आफ्रिकन युवकाने भारतीय गाणं गात केला सुंदर डान्स, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

ह्या आफ्रिकन युवकाने भारतीय गाणं गात केला सुंदर डान्स, बघा हा अप्रतिम व्हिडीओ

शोमनशिप असलेली माणसं ही चार चौघात उठून दिसतात. पण ही शोमनशीप स्वभावातून आली असेल तर जास्त उठावदार वाटते. कृत्रिमपणे केलेल्या शोमनशीपचा कंटाळा येतो. बरं इथे शोमनशीप याचा अर्थ आपल्यातल्या कलेचं अजून कलात्मकरित्या सादरीकरण करणं असं आहे. आज या विषयाची आठवण का झाली असेल, हे तुम्हाला कळलं असेलच. कारण आपल्या टीमने पाहिलेला एक व्हिडियो. तसा वायरल झालेला पण जास्त लक्षात न आलेला हा व्हिडियो. पण यात समाविष्ट असलेला माणूस आपल्याला पहिल्या फटक्यात आश्चर्यचकित करतो आणि पुढे पुढे त्याचं कौतुक वाटायला लागतं. चला तर मग या मानासाविषयी आणि या व्हिडियो विषयी जाणून घेऊयात. हा व्हिडियो आहे एका आफ्रिकन माणसाचा. या माणसाचं खरं नाव माहीत नाही, पण त्याला मिस्टर बटरफ्लाय म्हणून ओळखलं जातं. आफ्रिकेतील टांझानिया देशातील झंझीबार येथील हा रहिवासी.

या ठिकाणी हा माणूस झाडावरून नारळ काढण्याचं काम करत असे. इथे येणाऱ्या पर्यटकांसाठी मिस्टर बटरफ्लाय नारळ काढून दाखवण्याचं प्रात्यक्षिक करून दाखवत असत. हे त्यांनी बरीच वर्षे केलेलं काम आहे. पण जेव्हा पर्यटक एखाद्या ठिकाणी भेट द्यायला आलेले असतात तेव्हा स्थानिकांकडून त्यांच्या लक्षात राहील असं काही केलं जातं. या ठिकाणी मिस्टर बटरफ्लाय हीच भूमिका बजावतात. ते पर्यटकांना नारळ काढून तर देतात, वर त्यांचं मनोरंजन ही करतात. यात माडाच्या झाडावर अगदी उंचावर जाऊन गाणं म्हणणं आणि अगदी जमलं तर त्यावर डान्स करणं असं करून दाखवणं हे काम मिस्टर बटरफ्लाय करत आले आहेत. त्यामुळे परदेशी पर्यटकांसाठी ते नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिले आहेत. त्यांनी म्हंटलेलं ‘हकुना मटाटा’ हे गाणं तर विशेष लोकप्रिय ठरत आलेलं आहे. पण यात काही वर्षांपासून अजून एका गाण्याची भर पडली. हे गाणं आहे आपल्याकडील एका सुप्रसिद्ध हिंदी सिनेमातील गाणं. अंधा कानून या चित्रपटातलं ‘रोते रोते हसना सिखो, हसते हसते रोना…’ हे गाणं मिस्टर बटरफ्लाय गाऊन दाखवतात.

त्यांच्या आफ्रिकन उच्चारांमुळे त्यात अजून गंमत निर्माण होते. त्यांच्या या गाण्याचा व्हिडियो म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो. मिस्टर बटरफ्लाय नेहमी माडाच्या झाडावर उंचावर जात गाणं गातात. पण हे गाणं मात्र आपल्याला ते जमिनीवर येताना ऐकायला मिळतं. झाडावरून उतरणार एवढ्यात ते गाणं म्हणायला घेतात. त्यांच्या गाण्यातून त्यांनी चांगलाच ठेका धरलेला दिसून येतो. मग जसे ते खाली उतरतात तसे मग डान्स ही करायला लागतात. टाळ्या वाजवत एव्हाना ठेका धरलेला असतोच. हा व्हिडियो तसा दोन मिनिटांच्या आतला. पण तरीही मिस्टर बटरफ्लाय यांच्या शोमनशीपमुळे पाहणेलायक होतो. किंबहुना तो लोकप्रिय सुद्धा ठरला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडियो बऱ्याच प्रमाणात वायरल झाला होता. पण म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नव्हती. मग म्हंटलं उत्तम टॅलेंट आहे आणि त्यात भारतीय गाणं गायलं जातं आहे तर आपण याविषयी का लिहू नये? तसंही आपल्या वाचकांना नवनवीन आणि हटके विषय आवडतातच. त्यामुळे हा सगळा लेखप्रपंच मांडला. आपल्याला आमच्या टीमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. तसेच हा व्हिडियो सुदधा आपल्याला आवडला असणार यात शंका नाही.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *