मनोरंजन विश्वात नवनवीन कलाकृती येत असतात. त्यानिमित्ताने नवनवीन कलाकारही आपल्या भेटीस येत असतात. काही जुन्या कलाकारांची नव्याने ओळख होत असते. आपण हे सगळं पाहत असतो. आपल्या आवडी निवडी नोंदवत असतो. कोणती कलाकृती आवडली हे मांडत असतो. कोणता/ती कलाकार कोणत्या भूमिकांतून आवडले, हे ही चर्चेचे विषय असतातच. पण बहुतांश वेळेस हे सगळं नेहमीच्या गप्पा आणि सोशल मीडियावरील पोस्ट्स मधून होत असतं. त्यामुळे ढोबळमानाने एक चित्र आपल्यासमोर उभं राहतं. पण जेव्हा ‘टाइम्स ऑफ इंडिया’ सारखी प्रथितयश वृत्तसंस्था याविषयीचा जनतेचा कौल आपल्यासोबत शेअर करते तेव्हा मात्र याबाबतच चित्र अजून स्पष्ट होतं असं आपण म्हणू शकतो. टाइम्स ऑफ इंडिया तर्फे दरवर्षी काही कलाकारांची यादी तयार केली जाते. या यादीतून प्रेक्षकांना कोणकोणते कलाकार जास्त आवडले हे आपल्याला कळू शकतं. यात ‘मोस्ट डिझायरेबल वूमेन’ ऑन टीव्ही ही यादी असते. यावर्षीही काही काळापूर्वी ही यादी जाहीर झाली. यात मराठीतील १५ अभिनेत्रींची यादी तयार करण्यात आली होती. ती यादी संक्षिप्त स्वरूपात आपण आपल्या प्रेक्षकांसाठी देत आहोत.
क्रमांक ११ ते १५ :
या यादीत ११ व्या क्रमांकावर आहे पूर्वा शिंदे. लागिरं झालं जी या मालिकेतील जयडी ही व्यक्तिरेखा तिने इतक्या उत्तमरीत्या निभावली की अतिशय कमी काळात तिने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची जागा बनवण्यात यश मिळवलं. तसेच ती टोटल हुबलाक,युवा डान्सिंग क्वीन, चला हवा येऊ द्या या टीव्ही कार्यक्रमातुन आपल्याला भेटली आहेच. त्याचप्रमाणे तिने हॉस्टेल डेज या चित्रपटातुन ७० एमएम च्या पडद्यावरही पदार्पण केले आहे. १२ व्या क्रमांकावर आहे ती ईशा केसकर. जय मल्हार मालिकेतील बानू असो, वा माझ्या नवऱ्याची बायको मधील शनया. ईशाने प्रत्येक भूमिका अगदी समरसून साकार केलेली आहे. येत्या काळात ‘लव सुलभ’ या चित्रपटातून ती आपल्या समोर येईल. तसेच नुकतंच तिच्या इंस्टा अकाउंट ला व्हेरिफिकेशनची टिक लाभली आहे. त्याबद्दल तिचे अभिनंदन.
१३ वा क्रमांक पटकवणारी अभिनेत्री आहे पूर्णिमा डे. मालिका, सिनेमा अशा विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप सोडणारी ही अभिनेत्री उत्तम गायिका, नृत्यांगना आणि चित्रकार ही आहे. त्यामुळे या लिस्ट मध्ये ही अष्टपैलू अभिनेत्री असणं हे ओघाने आलंच. ‘जीव झाला वेडा पिसा’ या मालिकेने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्यातही यातील सिद्धी ही व्यक्तिरेखा तर अतिशय लोकप्रिय ठरली होती. ही व्यक्तिरेखा साकार करणारी अभिनेत्री विदुला चौघुले हीने या लिस्ट मध्ये १४ वा क्रमांक पटकावला आहे. जीव झाला येडा पिसा ही मालिका करत असताना अवघी दहावीत असणारी विदुला आता या क्षेत्रात रुळू लागली आहे हे दिसून येतं. या लिस्ट मधील १५ वं स्थान पटकावलं आहे गायत्री दातार हिने. तुला पाहते रे या मालिकेतून टीव्ही वर पदार्पण करणारी ही अभिनेत्री बघता बघता लोकप्रिय झाली ती तिच्या निरागस अभिनयामुळे. पुढे तिने चला हवा येऊ द्या च्या अनेक प्रहसनांतून आपलं मनोरंजन केलेलं आहेच. येत्या काळात बाबू या आगामी चित्रपटातून ती आपल्या भेटीस येईल.
क्रमांक ६ ते १० :
या लिस्ट मध्ये सहाव्या स्थानावर विराजमान होण्याचा मान मिळाला आहे रसिका सुनील हिला. शनाया सारखं खल पात्र जिने घराघरात पोहोचवलं ती रसिका. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती छान गायिका सुदधा आहे. ७ व्या क्रमांकावर आपल्याला भेटते ती तन्वी मुंडळे. सध्या अगदी जोमात चालू असणारी ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेतील ती नायिका आहे. तिच्यासोबतच या मालिकेती असणारे शशांक केतकर आणि आशय कुलकर्णी हे मोस्ट डिझायरेबल मेन च्या यादीत आलेले आपल्याला दिसून येतात. यावरून या मालिकेतील स्टार कास्ट ची लोकप्रियता आपल्याला कळून यावी. तन्वी ही येत्या काळात आपल्याला ‘color फुल’ या चित्रपटातून दिसून येईल. या लिस्टमधील ८वं स्थान पटकावलं आहे पूजा बिरारी हिने. कलाक्षेत्राची असलेली प्रचंड आवड आणि या क्षेत्रात कारकिर्दी घडवावी असं ठरल्याने पूजा ने परदेशात शिक्षण घेण्याचा प्लान या अभिनेत्रीने रद्द केला. आज त्याचा परिपाक म्हणजे ती एक आघाडीची अभिनेत्री म्हणून उदयास येते आहे. तिची सध्या सुरू असलेली स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेतील भूमिका तर वाखाणण्याजोगी. त्याचप्रमाणे तिने अभिनित केलेल्या साजणा आणि ऑमोस्ट सुफळसंपूर्ण मालिकेतील भूमिका ही गाजल्या आहेत.
या यादीतलं ९वं स्थान पटकावलं आहे गौतमी देशपांडे हिने. सुंदर व्यक्तिमत्व, त्याला उत्तम अभिनयाची जोड आणि सोबतीला गाता गळा असलेली गौतमी अगदी अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यासाठी तिने साकार केलेली सई ही ‘माझा होशील ना’ मालिकेतील व्यक्तीरेखा प्रामुख्याने कारणीभूत आहे हे नक्की. तसेच आपण तिला सारे तुझ्याचसाठी या मालिकेतूनही अभिनय करताना पाहिलेलं आहेच. सोबत तिच्या गोड सुरावटींना आपण सोशल मीडिया वर ऐकत असतोच. या लिस्ट मधलं १० वं स्थान मिळवलेली अभिनेत्री आहे रुपाली भोसले. हिंदी, मराठी अशा विविध भाषांतून आणि विविध माध्यमांतून अभिनय करत करत रुपाली यांनी लोकप्रियता मिळवली आहे. आई कुठे काय करते या मालिकेत त्यांनी साकार केलेली संजना ही व्यक्तीरेखाही प्रेक्षक पसंतीस उतरली आहे. तसेच आपण त्यांना नुकतंच एका जाहिरातीतही पाहिलं आहेच. सध्या त्यांनी नववारी साडीत केलेलं फोटोशूट हे नेटिझन्स च्या चर्चेचा विषय ठरलं आहे.
क्रमांक १ ते ५ :
या लिस्ट मधलं पाचवं स्थान पटकावलं आहे नयना मुके हिने. विविध लोकप्रिय मालिकांतील तितक्याच लोकप्रिय व्यक्तीरेखा साकार करणारी ही अभिनेत्री. मग ती गणपती बाप्पा मोरया मालिकेतील लक्ष्मी देवीची भूमिका असो, वा देवयानी मधील भूमिका. मालिकांसोबतच नयना हिने चित्रपटांतूनही उत्तम अभिनय केलेला आहे आणि ती एक यशस्वी मॉडेल सुद्धा आहे. या लिस्ट मध्ये चौथ्या स्थानावर विराजमान झाली आहे मीरा जग्गनाथ ही उदयोन्मुख अभिनेत्री. येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतील मोमो ही तिची व्यक्तिरेखा नजीकच्या काळात खूप गाजली आहे. तसेच ये साजना हा तिचा म्युझिक व्हिडियो ही गाजला आहे. येत्या काळात ती इलुईलु या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येईल. या लिस्ट मधलं तिसरं नाव आहे नेहा खान. देवमाणूस या गाजत असलेल्या मालिकेतील डॉक्टर चा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणारी ए.सी.पी. दिव्या सिंघ ही व्यक्तिरेखा साकारली आहे नेहा हिने. या मालिकेत चित्रित झालेल्या एका स्टंट विषयी सुदधा मध्ये चर्चा रंगली होती. त्यात नेहाचं योगदान होतंच. उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच नेहा ही उत्तम नृत्यांगना आहे.
या लिस्ट मधलं दुसऱ्या क्रमांकाचा मान जातो आहे पल्लवी पाटील हिला. ट्रिपल सीट, बॉइज २, तू तिथे असावे ,जिगरबाज या सारख्या विविध लोकप्रिय कलाकृतींचा ती महत्वपूर्ण भाग राहिली आहे. नजीकच्या काळात तिने अभिनित केलेली कलाकृती म्हणजे अर्जुन नावाची शॉर्ट फिल्म. येत्या काळात तिच्या अजून विविध कलाकृती आपल्या भेटीस येतील हे नक्की. चला, आतापर्यंत आपण मोस्ट डिझायरेबल वुमेन ऑन टीव्ही (मराठी अभिनेत्री) या लिस्ट मधील २-१५ क्रमांक पटकावलेल्या अभिनेत्रींची ओळख करून घेतली. आता या लिस्ट मध्ये सर्वोच्च स्थानी असलेल्या अभिनेत्री विषयी थोडक्यात जाणून घेऊयात.
या लिस्ट मध्ये पहिल्या स्थानावर विराजमान होण्याचा मान मिळाला आहे तेजश्री प्रधान यांना. तेजश्री यांची लोकप्रियता किती आहे हे काही वेगळं सांगायची गरज नाही. होणार सून मी ह्या घरची या मालिकेतील जान्हवी या व्यक्तीरेखेने तेजश्री यांच्या कारकिर्दीला एक छान वळण दिलं. या निमित्ताने एका गुणी अभिनेत्रीची ओळख महाराष्ट्राच्या घराघरात झाली. त्याआधी ही तेजश्री यांनी मालिका आणि सिनेमातून अभिनय केलेला होताच. पुढे ‘अग्गं बाई सुनबाई’ या मालिकेतील शुभ्रा या व्यक्तिरेखेनेही प्रेक्षक पसंती मिळवली होतीच. तेजश्री यांनी काही वेबसिरीज आणि शॉर्ट फिल्म्स मधून सुद्धा अभिनय केलेला आहे. तसेच सूर नवा ध्यास नवा या रियालिटी शो च्या सूत्रसंचालकपदाची सुत्र सुद्धा त्यांनी अगदी समर्थपणे सांभाळली होती. अशा या अष्टपैलू अभिनेत्रीचा वाढदिवस नुकताच झाला. या निमित्ताने आपल्या संपूर्ण टिमकडून तेजश्री यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तर अशी ही मोस्ट डिझायरेबल मराठी अभिनेत्रींची लिस्ट. आपल्या वाचकांपर्यंत यावी आणि प्रत्येक अभिनेत्री विषयी अगदी थोडक्यात माहिती व्हावी, हा आपल्या मराठी गप्पाच्या टीमचा प्रयत्न होता. आपल्या प्रतिक्रिया आम्हाला क’मेंट्स मधून कळू द्या. तसेच आमचे प्रत्येक लेख वाचत राहा, शे’अर करा ! आपल्या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!