Breaking News
Home / बॉलीवुड / ह्या आहेत बॉलिवूडच्या सर्वात ६ महागड्या आयटम गर्ल्स, फक्त एका गाण्यासाठी घेतात इतके करोड रुपये

ह्या आहेत बॉलिवूडच्या सर्वात ६ महागड्या आयटम गर्ल्स, फक्त एका गाण्यासाठी घेतात इतके करोड रुपये

आताच्या बॉलिवूड चित्रपटांत जोपर्यंत आयटम नंबर नसेल तोपर्यंत चित्रपट काही पूर्ण होत नाही. चित्रपटनिर्माते आपल्या प्रत्येक चित्रपटांत कमीत कमी एक आयटम नंबर तर नक्कीच टाकतात. ह्या आयटम नंबरमध्ये जेव्हा एक सुंदर मुलगी खतरनाक डान्स स्टेप्स सोबत ठेका धरत असते, तेव्हा प्रेक्षकही बघतच राहतात. आयटम गर्ल्स आपल्या लटक्या झटक्यांनी प्रेक्षकांना घायाळ करत असतात. काही लोकं तर फक्त आयटम नंबर मुळेच चित्रपट पाहण्यासाठी जातात. ह्या प्रकारे चित्रपटाचे प्रमोशनमध्ये सुद्धा हे आयटम सॉंग महत्वपूर्ण भूमिका निभावतात. आयटम सॉंग हिट झाले कि चित्रपट हिट व्हायला खूप मदत मिळते. ह्या आयटम सॉंग मध्ये नाचणाऱ्या हिरोइन्सना सुद्धा बक्कळ पैसे मिळतात. बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्री सुद्धा आता आयटम सॉंग्स करू लागल्या आहेत. आयटम सॉंग मध्ये अंगप्रदर्शन करून झटपट कमाई करण्याचा फंडा आता रूढ होत आहे. ह्या अभिनेत्री फक्त एका आयटम सॉंग्स साठी करोडो रुपये घेत आहेत. आजच्या लेखात आपण बॉलिवूडच्या सर्वात महागड्या आयटम गर्लस बद्दल जाणून घेणार आहोत.

दीपिका पदुकोण
दीपिका बॉलिवूडची एक टॉपची अभिनेत्री होण्यासोबतच एक चांगली आयटम गर्लसुद्धा आहे. ह्या गोष्टीचा पुरावा आपण दीपिकाला २०११ मध्ये अभिषेक बच्चनच्या ‘दम मारो दम’ चित्रपटातल्या टायटल सॉंग मध्ये आयटम नंबरच्या रूपात पाहिले आहे. त्या गाण्यासाठी दीपिकाने १.५ कोटी रुपये घेतले होते. सध्याच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास दीपिका बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री बनली आहे. त्यामुळे फक्त आयटम नंबर साठी चित्रपट ती शक्यतो करत नाही.

प्रियांका चोप्रा
बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्हीही ठिकाणी आपल्या अभिनयाची कमाल दाखवणारी देसी गर्ल प्रियांका चोप्रा सुद्धा आयटम नंबर करण्यात मागे नाही आहे. संजय लीला भन्साळीच्या ‘गोलियों की रास लीला – राम लीला’ चित्रपटात प्रियांका चोप्राने ‘राम चाहे लीला’ नावाच्या गाण्यावर जबरदस्त आयटम नंबर केले होते. तिचा हा आयटम नंबर खूप वायरल झाला होता. ह्यामध्ये प्रियांका खूप मादक दिसली होती. ह्या आयटम सॉंग साठी प्रियांकाने तब्बल ६ कोटी रुपये घेतले होते.

करीना कपूर
करीना कपूरने सलमान खानच्या ‘दबंग २’ मध्ये ‘फेविकॉल से’ गाण्यावर अप्रतिम आयटम नंबर केले होते. हे गाणे खूप लोकप्रिय झाले होते. हा चित्रपट २०१२ मध्ये रिलीज झाला होता. तेव्हा करीनाने ह्या आयटम नंबरसाठी पूर्ण ५ कोटी रुपये घेतले होते. ह्या गाण्यात बेबोचे सौंदर्य अप्रतिम होते.

कॅटरिना कैफ
ह्रितिक रोशनच्या ‘अग्निपथ’ चित्रपटात कॅटरिना कैफने ‘चिकणी चमेली’ गाण्यावर आयटम नंबर केला होता, तेव्हा लोकांनी तिचे नाव चिकणी चमेली ठेवले होते. हा आयटम नंबर आजही लोकांचा फेव्हरेट आहे. ह्या मध्ये कॅटरिनाचा जबरदस्त डान्स परफॉर्मन्स पाहायला मिळाला होता. ह्या आयटम सॉंगला लोकांनी खूप पसंत केले होते. माहितीनुसार कॅटरिना कैफने ह्या आयटम सॉंगसाठी ३.५ कोटी रुपये घेतले होते.

सनी लिओन
सनी लिओनने तसे तर बॉलिवूडमध्ये अनेक हिट आयटम नंबर केले आहेत. चित्रपट निर्मात्यांसाठी आयटम गर्ल साठी सनी लिओन पहिली पसंत असते. तिची सुंदरता डान्स करताना खुलून दिसते. सनीने शाहरुख खानच्या ‘रईस’ चित्रपटात ‘लैला में लैला’ गाण्यावर आयटम डान्स केला होता. हा आयटम नंबर सुद्धा खूप लोकप्रिय झाला होता. असं बोललं जातं कि ह्या गाण्यावर नाचण्यासाठी सनी लिओनने पूर्ण ३ कोटी रुपये घेतले होते.

मलाईका अरोरा
आयटम गर्ल्सना यशाच्या शिखरावर जर घेऊन जाण्याचे क्रेडिट कोणाला द्यावे लागले तर हे क्रेडिट निश्चितच मलाईका अरोराला भेटू शकते. मलाईकाला सर्वात अगोदर ‘छैय्या छैय्या’ गाण्याने लोकप्रियता मिळाली होती. ह्यानंतर ‘टरंगीलो मारो ढोलना’, ‘ओंठ रसिले तेरे ओंठ रसिले’, ‘अनारकली डिस्को चली’ ह्यासारखे लोकप्रिय आयटम नंबर मलाईकाने केले आहेत. मलाईका अरोराने दबंग चित्रपटासाठी ‘मुन्नी बदनाम हुई’ हे आयटम नंबर केले होते. आणि हा आयटम नंबर खूपच जास्त लोकप्रिय झाला होता. हे गाणं आज सुद्धा मुलांच्या तोंडपाठ आहे. ह्या गाण्यासाठी मलाईकाला २ कोटी रुपये मिळाले होते.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.