Breaking News
Home / मनोरंजन / ह्या इवल्याश्या मुलाचे जनरल नॉलेज पाहून तुम्हीही थ’क्क व्हाल, क्षणभरात देतो अवघड प्रश्नांची उत्तरे

ह्या इवल्याश्या मुलाचे जनरल नॉलेज पाहून तुम्हीही थ’क्क व्हाल, क्षणभरात देतो अवघड प्रश्नांची उत्तरे

मराठी गप्पावरून आपण अनेक नवनवीन वायरल व्हिडियोज विषयी माहिती घेत असता. अनेक उदयोन्मुख कलाकार, अनेक अतर्क्य, आश्चर्यकारक घटना, तसेच मन हेलावून टाकणारे अनुभव आपण वाचत असता. तसेच मजेशीर अशा व्हिडियोज बद्दल आमची टीम वेळोवेळी लिहीत असतेच. या गंमतीदार व्हिडियोज मध्ये मुख्यतः लहान मुलांच्या व्हिडियोजचा समावेश असतो, असं दिसून येतं. पण केवळ गंमतीदार व्हिडियोतच नव्हे तर अनेक अचंबित करणाऱ्या व्हिडियोज मध्येही मुलांचा सहभाग असतोच. आमच्या टीमने बघितलेल्या एका व्हिडियोतुन तर हे सहज स्पष्ट होतंच. हा व्हिडीओ आहे नांदेड मधील एका चिमुकल्याचा. चिमुकला म्हणावा असंच वय आहे त्याचं. हा व्हिडीओ रेकॉर्ड करत असताना अवघ्या काही वर्षांचं हे लेकरू अंगणवाडीत जातं. आता या वयात मुलांना किती अशा गोष्टी माहिती असू शकतात किंवा त्यांची स्मरणशक्ती किती असू शकते?

पण हा पठ्ठ्या मात्र अगदी हुशार दिसून येतो. व्हिडियो सुरू होतो आणि कॅमेऱ्यामागील व्यक्ती या मुलाला त्याच्याविषयी जुजबी माहिती विचारते. बोबड्या बोलांनी हा मुलगा आपली ही सगळी माहिती सांगतो. मग त्यात नाव, गाव, तालुका ही माहिती असते. पण यादरम्यान लहानसुलभ वयानुसार त्याचं वागणं ही असतं. जे बघताना गंमतीशीर वाटतं. मग उत्तरं देताना इतरत्र बघणं असू दे की हातांचा खेळ. त्याचा हा निरागसपणा बघून नकळत आपल्या चेहऱ्यावर हास्य उमटतं. तिथे त्याच्यावर कॅमेऱ्यामागून प्रश्नांची सरबत्ती चालू असते. पण त्याचंही उत्तर देणे थांबत नाही. अर्थात लहान वयामुळे काही प्रश्नांच्या बाबतीत त्याचा गोंधळ उडतो खरा, पण तो समजून घेण्यासारखा आहे. कॅमेऱ्यामागून होणाऱ्या सरबत्तीला तोंड देताना त्याच्या वयाच्या कोणाचंही तसंच झालं असतं. त्याला विचारण्यात आलेली प्रश्नमालिक ही गाव गाड्यापासून ते अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत असते. त्यात मध्ये असाही भाग येतो जिथे देशातील बहुतांश राज्याच्या राजधान्यांची नावं हा चिमुकला अगदी पट्टदिशी सांगून मोकळा होतो. पुढे पूढे मग त्याच्या वर्गशिक्षिका आणि शाळेतील शिक्षकांची नावं विचारली जातात, बहुतेक योग्य उत्तर येतात असं दिसतं आणि हा व्हिडीओ संपतो.

या व्हिडियोतील हा बाळगोपाळ त्याच्या उत्तरांसाराखच त्याच्या वागण्यामुळे लक्षात राहतो. त्याच्या एवढ्या कमी वयात, कदाचित त्याला कळतंही नसेल की त्याच्या स्मरणशक्तीची चुणूक कशी दिसून येते आहे ते. तसंच त्याचा अल्लडपणा आणि निरागसपणा आपल्याला भावतो. अशा आपल्या या गोड छोट्या दोस्ताला त्याच्या शालेय आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आमच्या टिमकडून शुभ आशिर्वाद. आपल्याला हा लेख आवडला असल्यास आमच्या वे’बसा’ईटला बु’कमार्क करून ठेवायला विसरू नका. तसेच आवडलेले सगळे लेख शे’अर सुद्धा करा. आपल्याला अन्य वायरल व्हिडियोज वर आमच्या टीमने लिहिलेले उपलब्ध लेख वाचायचे असल्यास वे’बसाई’टवरील सर्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून सर्च करा. आपल्याला वैविध्यपूर्ण लेख वाचावयास मिळतील. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *