Breaking News
Home / मनोरंजन / ह्या इवल्याश्या मुलीची कल्पनाशक्ती पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल, बघा हा व्हिडीओ

ह्या इवल्याश्या मुलीची कल्पनाशक्ती पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल, बघा हा व्हिडीओ

लहान मुलांचं भावविश्व म्हणजे एक रंजक जग असतं. त्या जगात काहीही शक्य असतं आणि तसं असलं तरीही ते तितकंच निरागस ही असतं. त्यास कृत्रिम भावभावनांचा लेप लागलेला नसतो जे मोठं झाल्यावर होतं. त्यामुळे लहान मुलांच्या कल्पक गोष्टी ऐकताना नकळत त्यांच्या या निरागसपणा बद्दल जसं कुतूहल वाटतं, तसंच कौतुक सुद्धा. तसेच आपल्या आजूबाजूला वावरणारी लहान मुलांची नवीन पिढी आधीच्या पिढ्यांपेक्षा जास्त हुशार आहे असं अनेक आजोबा आज्जी सांगताना आपण ऐकलं असेल, स्वतः अनुभवलं असेल. अशाच एका हुशार, कल्पक आणि निरागस मुलीचा वायरल व्हिडियो आमच्या टीमच्या नजरेस पडला. सहसा छोटी मुलं म्हणजे हमखास हसायला लावणाऱ्या गोष्टी असतील असा आमच्या टीमचा कयास होता. तो खराही ठरला.

या व्हिडियोची सुरुवात होते ती समोर बसलेल्या चिमुकली सोबत. तिच्या सोबत तिचे वडील कॅमेऱ्यामागून बोलत असतात. या मुलीला तिच्या काल्पनिक मित्राच्या घरी जो एक डुक्कर आहे त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जायचं असतं. या विषयावरून वडील आणि मुलीमध्ये पुढचा गंमतीशीर संवाद रंगतो. यात ती म्हणते की तिचा हा मित्र, पुण्यात एका ब्रिज खाली असलेल्या घरात राहतो. ती स्वतः दोन वर्षांची असताना त्या घरात तीन करोड कोंबड्या राहत असत असं ती सांगते आणि आपल्याला हसू आवरत नाही. आपलं हसू आवरे पर्यंत तिने त्या कोंबड्या का निघून गेल्या ह्याची छोटीशी गोष्ट सांगितलेली असते. यामुळे आपल्या हसण्यात अजून भर पडते. तिचे वडीलही हसत असतातच अधनं मधनं. मग ते तिला विचारातात, मग केक कोण आणणार आहे तर. त्यावर एका हरिणाने आणि दोन मधमाश्यांनी केकची व्यवस्था केल्याचं कळतं आणि मग मात्र तिच्या वडिलांना हसू आवरतंच नाही. बरं त्या केकवर हॅप्पी बर्थडे डुक्कर आणि सगळ्यांना लिहिलंय हे ऐकून तिच्या निरागसपणाचं कौतूक वाटत राहतं.

मग ते विचारतात की पण मग तिथे जाणार कसं. तर त्यावर उत्तर येतं की ससा त्याची भली मोठ्ठी गाडी आणणार आहे ज्यात मोठ्ठाला असा डॉल्फिन ही माऊ शकेल. त्यावर वडील म्हणतात की त्यापेक्षा मी गाडी घेऊन येतो बरं पडेल पण ती जागा लांब आहे ना असा युक्तिवाद या चिमुकली कडून करण्यात येतो. मग वेळ येते ती बर्थडे पार्टी बद्दल. तर बर्थडे पार्टी मात्र विरार ला करणार असं कळतं. विरारला कोण राहतं तर म्हणे डुक्कराचा मित्र, पांडा. मग तिकडे सगळे पार्टी करणार आणि ही चिमुकली हरिणाच्या घरी आठ दिवस राहायला जाणार असं लक्षात येतं. त्यावर कुठेही जायचं नाही सरळ रात्री घरी यायचं असा काहीसा दम तिचे वडील तिला देतात. त्यावर हरिण ऐकतंच नाही असं ती सांगते आणि मला आता हे सहन करावं लागणार ना असं ती म्हणते. या वाक्यावर तिचे वडील आणि आपणही पोट धरून हसतो. आता झालं तेवढं पुरे झालं म्हणून तिचे वडील चल छबुकल्या असं म्हणतात आणि हा व्हिडीओ संपतो. व्हिडीओ आहे चार मिनिटांचा पण त्यातून मिळणारा निखळ आनंद आपल्याला कोणत्याही परिमाणात मोजता येत नाही.

यातील प्रत्येक प्रसंग, या मुलीच्या चेहऱ्यावरचे निरागस हावभाव आणि तिच्या वडिलांनी विचारलेले मार्मिक प्रश्न आपल्याला हसवतात. या प्रसंगांतुन निरागसपणे होणारी विनोदनिर्मिती हवीहवीशी वाटते. त्यातही या लहान मुलीच्या कल्पकतेचं कौतुक वाटत राहतं. एकामागून एक येणाऱ्या प्रश्नांवर तिची धमाल उत्तर तिच्या बुद्धीची चुणूक दाखवतात. या लहान मुलीला तिच्या पुढील शालेय आयुष्यासाठी आमच्या टिमकडून आशिर्वाद आणि शुभेच्छा. तसेच हा व्हिडीओ तयार करणाऱ्या तिच्या वडिलांचे ही आभार.

आपल्याला हा लेख आवडला असल्यास नेहमीप्रमाणे सगळ्यांसोबत शेअर करायला विसरू नका. सरतेशेवटी आपल्या प्रेमामुळे आमच्या टीमला विविध विषयांवर लेख लिहिण्यास प्रोत्साहन मिळते. आपल्याला वायरल व्हिडियोज वरील लेख विशेषकरून आवडत असतील तर आमच्या वे’बसा’ईटवर असलेल्या स’र्च ऑप्शनचा वापर करा. त्यात जाऊन वायरल असं लिहून स’र्च करा, आपल्याला विविध लेख वाचण्याचा आंनद घेता येईल. धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.