Breaking News
Home / मनोरंजन / ह्या इवल्याश्या मुलीने केलेला इतका सुंदर डान्स पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा व्हिडीओ

ह्या इवल्याश्या मुलीने केलेला इतका सुंदर डान्स पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा व्हिडीओ

आपली मराठी भाषा किती सुंदर आणि समृद्ध आहे हे आपण जाणतोच. या समृद्धीच्या अनेक खुणा आपल्याला मराठी भाषेचा वापर करताना पदोपदी दिसून येतात. यातील एक ठळक खुण म्हणजे आपल्या म्हणी. आपण मराठी भाषेत ज्या ज्या म्हणी वापरतो त्या सगळ्या आपल्या आयुष्यात कुठे ना कुठे अनुभवण्यास मिळत असतात. म्हणजे एखादी गोष्ट किंवा घटना अशी काही घडून जाते की तिचं संपूर्ण वर्णन करणारी एखादी चपखल म्हण आपल्याला अगदी चट्कन आठवून जाते. अगदी ओठावर येते म्हणा ना.

आज येथे हे सांगण्याचं प्रयोजन म्हणजे आजचा हा लेख ज्या व्हिडियोवर आधारलेला आहे तो व्हिडियो पाहून अशीच एक सुप्रसिद्ध म्हण आठवल्या शिवाय राहत नाही. खरं तर हा व्हिडियो म्हणजे या म्हणीचं मूर्तिमंत उदाहरणच म्हणायला हवं. आता तुम्ही म्हणाल काय आहे या व्हिडियोत? तर मंडळी आतापर्यंत आपण जे जे व्हिडियोज बघितले असतील त्यातील सगळ्यांत निरागस असा आणि तेवढाच मनोरंजक असा हा व्हिडियो आहे हे नक्की. मनोरंजक तर एवढा आहे की युट्युब वरील या व्हिडियोने व्ह्यूजच्या बाबतीत कोटींच्या कोटी उड्डाणे घेतलेली आहेत.

आजचा हा लेख लिहीत असताना जवळपास १९ करोड हुन अधिक व्ह्यूज या व्हिडियोला लाभले आहेत. आता तुमची ही उत्सुकता चाळवली गेली असेलच. तर या व्हिडियो विषयी थोडक्यात जाणून घेऊयात. हा व्हिडियो आहे एका चिमुरडीचा. चिमुरडी म्हणजे किती चिमुरडी तर हा व्हिडियो चित्रित झाला तेव्हा दीड दोन वर्षांची असेल असं वाटतं. या चिमुकलीचं नाव आहे त्रिशा आळेकर. आता कदाचित आपण ही हा व्हिडियो बघितल्याचं आपल्याला आठवत असेल. होय हा तोच व्हिडियो आहे ज्यात आपल्याला त्यावेळची दीड दोन वर्षांची त्रिशा ‘ओ पापा, मेरे पापा’ या गाण्यावर डान्स करताना दिसून येते. आता ज्यांनी हा व्हिडियो बघितला नसेल त्यांना वाटत असेल केला असेल डान्स. त्यात काय एवढं. पण मंडळी हा व्हिडियो एकदा बघाच. यात तुम्हाला पहिल्या वीस सेकंदातच कळेल की या मुलीची संगीताची आणि डान्सची आवड किती जबरदस्त आहे ते ! किंबहुना ही आवड उपजत असावी असं वाटतं. कारण लहान मुलांना अनेक गोष्टी शिकवल्या की ते तसं करतात. पण शेवटी एखादी गोष्ट मनापासून करत असताना त्यांचा मूड वेगळ्याच आनंदात असतो. हा आनंद या व्हिडियोत आपल्याला या छोटीच्या चेहऱ्यावर दिसून येतो.

त्यात गाण्यातील शब्दांनुसार तिच्या स्टेप्स होत असल्याने आपल्या ही आनंदात भर पडते. किंबहुना आपण तिचा हा डान्स बघून स्वतःशीच नकळतपणे म्हणतो, ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’. होय, हाच तो क्षण असतो जिथे आपल्याला या चिमुरडीचं प्रचंड कौतुक वाटायला सुरुवात होते. हे कौतुक पुढे पूर्ण व्हिडियोभर प्रत्येक क्षणी वाढतच जातं. कारण इतकं निरागस सादरीकरण आपण कदाचितच कुठे पाहिलं असेल. उगाच नाही व्ह्यूजच्या बाबतीत या व्हिडियोने कोटींच्या कोटी उड्डाणे केली. आपणही हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्याला ही मनापासून आवडला असेलच. तसेच त्या पहिल्या वीस सेकंदातच आपण नक्की म्हणाला असाल, ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’. अर्थात त्या बाबतीत काळानुसार बदल करायचा झाला तर ‘बाळाचे पाय सोशल मीडियावर दिसताहेत बरं का’ अस म्हणायला लागेल. गंमतीचा भाग सोडा पण या मुलीच्या डान्स व्हिडियोजने खरंच सोशल मीडियावर आपला असा प्रेक्षकवर्ग तयार केलेला आहे. बरं हे करत असताना ती अवघ्या काही वर्षांची आहे.

त्यामुळे येत्या काळात तिच्या कडून अजून उत्तमोत्तम डान्स परफॉर्मन्स बघता येतील हे नक्की. या चिमुरडीचा डान्स परफॉर्मन्स आमच्या टीमला खूप भावाला. आमच्या टीमकडून त्रिशा हिला पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा आणि खूप शुभाशीर्वाद.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.