Breaking News
Home / मनोरंजन / ह्या ऍम्ब्युलन्स चालकाने प्रसंगावधान दाखवत जे केले ते पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

ह्या ऍम्ब्युलन्स चालकाने प्रसंगावधान दाखवत जे केले ते पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल, बघा व्हिडीओ

आरोग्य सेवेत काम करणं म्हणजे ‘रात्रंदिन आम्हां समर प्रसंग’ अशीच अवस्था असते. कोणती व्यक्ती कधी किती बिकट अवस्थेत आपल्या समोर येईल हे सांगता येत नाही. बरं हे केवळ डॉक्टरांनाच लागू होतं असं नाही. तर सगळ्याच घटकांना अचानक येणाऱ्या प्रसंगांना सामोरं जाण्याची तयारी ठेवावी लागते. याप्रसंगी कामी येते ती समयसुचकता. या समयसूचक वागण्यासोबतच वेळ प्रसंगी नियम काहीसे वाकवुन काम करण्याची ही तयारी दाखवावी लागते. अर्थात निवडक वेळीच. कारण, काही वेळेस प्रश्न हा कोणाच्या तरी जीवन मरणाचा असु शकतो. त्यामुळे सहसा आरोग्य सेवेतील कर्मचारी हे नेहमीच काही ना काही प्रसंगावधान दाखवत त्यांच्या समोरील आव्हानांना सामोरं जाताना दिसत असतात.

याचंच उत्तम उदाहरण देणारा एक वायरल व्हिडियो आपल्या टीमच्या पाहण्यात आला. व्हिडियोत असलेला कंटेंट अगदी काही सेकंदांचा आहे. पण एखादा जीव वाचवायचा असेल तर प्रत्येक क्षणंक्षण महत्वाचा असतो हे आपण जाणतोच. त्यामुळे या व्हिडियोच्या शेवटी आपण नकळतपणे यात सहभागी असलेल्या व्यक्तीचं खूप कौतुक करतो. पण कौतुक करावं अस काय होतं या व्हिडियोत ? चला जाणून घेऊयात.

या व्हिडियोत आपल्याला सुरुवातीला जबरदस्त असा ट्राफिक जाम दिसून येतो. आपल्या देशात आणि खासकरून शहरांत ट्राफिक असणं हे काही अप्रुप नाहीये. पण या ट्राफिक जाम असतानाही जेव्हा आपल्याला एखादी रुग्णवाहिका दिसली की आपण आपसूक जायला जागा देतोच. कारण शेवटी प्रश्न हा कोणत्या तरी व्यक्तीच्या जीवाचा असतो. पण या व्हिडियोत मात्र आपल्याला एवढं जबरदस्त ट्राफिक दिसतं. एवढं की त्यात फसलेली रुग्णवाहिका ही आपल्याला चट्कन दिसत नाही. पण हे सगळं एका मार्गिकेवर असतं. दुसरी बाजू रिकामीच असते. कदाचित आपण रश अवर म्हणतो तशी वेळ असावी. तेवढ्यात मग जेव्हा जवळच असलेल्या दुभाजकाजवळ ही रुग्णवाहिका येते तेव्हा तिचं दर्शन होतं. समोर पसरलेल्या ट्राफिक ला बघून यातील चालक असलेल्या दादांनी एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला असतो. बाजूने जाणारा रोड पूर्ण रिकामी असल्याने त्यावरून रुग्णवाहिका घेऊन जाण्याचा धाडसी निर्णय ते घेतात. त्यासाठी जवळच असणाऱ्या एका दगडाचा वापर करत ते बाजूच्या रस्त्यावर येतात. ती एक कसरतच ठरते. पण शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश मिळतं. बाजूच्या रिकामी रस्त्यावर आपली रुग्णवाहिका आणण्यास त्यांना यश येतं.

मग मात्र ते थांबत नाहीत आणि रुग्णालयाच्या दिशेने ते आपली रुग्णवाहिका जोमात घेऊन जातात. पुढे काय घडतं याविषयी सध्या माहिती उपलब्ध नाहीये. पण या प्रसंगाचा व्हिडियो मात्र खूप प्रसिद्ध झाला आहे आणि या दादांच्या प्रसंगावधनाचं कौतुक होताना दिसतं आहे. त्यांचं नाव शिवकुमार अस असून, पुदुच्चेरी येथील शासकीय रुग्णालयात चालक पदावर कार्यरत आहेत असं कळतं. त्यांनी दाखवलेलं धाडस हे कौतुकास्पद आहेच यात शंका नाही. त्यांच्या धाडसी कृतीबद्दल आमच्या टीमकडून त्यांना मानाचा मुजरा. आपणही हा व्हिडियो बघितला असल्यास आपण ही त्यांच्या प्रसंगावधानाचं कौतुक केलं असेलच. जर हा व्हिडियो बघितला नसेल तर आवर्जून बघा.

तसेच मंडळी, आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम सातत्याने विविध विषयांवर लेखन करत असते. आपणही प्रत्येक वेळी आम्हाला प्रोत्साहन देत असता, आमचं कौतुक करत असता. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आपलं हे प्रेम यापुढेही आम्हाला मिळत राहील हे नक्की. आम्हीही आपल्यासाठी सर्वोत्तम लेख घेऊन येत राहू याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयावरील लेखासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य लेख वाचा. आठवणीने सगळे लेख शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.