Breaking News
Home / मनोरंजन / ह्या कपलने पार्टीमध्ये आपल्या अप्रतिम डान्सने सर्वानाच केले चकित, बघा हा जबरदस्त परफॉर्मन्स

ह्या कपलने पार्टीमध्ये आपल्या अप्रतिम डान्सने सर्वानाच केले चकित, बघा हा जबरदस्त परफॉर्मन्स

आपल्यापैकी ज्यांना ज्यांना डान्स करायला आवडतो ती मंडळी जेव्हा संधी मिळेल तेव्हा आपली कला सादर करत असतात. किंबहुना जणू डान्स करण्याची संधीच शोधत असतात. अगदी काही नाही तर घरी गाणी लावून डान्स करतात. कारण ही कलाच अशी आहे जी स्वस्थ बसू देत नाही. त्यातही गाणं कानावर पडलं की मग तर बघायलाच नको. एखाद्या प्रेम कवीला चांदणं पाहून जसे शब्द पटापट सुचत जातात तसंच डान्स करणाऱ्यांचं असतं. फक्त गाणं कानावर पडण्याचा अवकाश. त्यांना आपोआप स्टेप्स ही सुचू लागतात.

त्यात अशा कलंदर व्यक्तींना जर डान्स करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळालं की मजाच मजा असते. हे हक्काचं व्यासपीठ अगदी कुठेही असू शकतं. एखाद्या समारंभापासून ते रियालिटी शो पर्यंत. यात लग्नाचा समारंभ ही आलाच की. त्यातही मग साखरपुडा आणि लग्नाच्या विधींचे वेगवेगळे दिवस आले. त्यात जेवढे जास्त दिवस लग्न चालतं तेवढे दिवस मजा मस्ती चालतच राहते. खासकरून आताच्या काळात जेव्हा हा लेख लिहिला जातो आहे तेव्हा तर बघायलाच नको. कारण सगळीकडे लग्नांचे बिगुल वाजताहेत. अनेकांचे दोनाचे चार हात होत आहेत. त्यामुळे सगळीकडे धामधुमीचं वातावरण आहे. या आनंदात भर घालायला अशावेळी मग डान्स तो बनता हैं.

त्यातही डान्स फ्लोअर वगैरे सुविधा असतील तर बघायलाच नको. त्यात हा डान्स बसवायला वेळ मिळाला की अजूनच चांगलं होतं. कारण डान्स आवडणाऱ्या व्यक्तींनी डान्स अचानक केला तरी तो चांगलाच वाटतो. कारण तो मनापासून केलेला असतो. पण हाच डान्स बसवता आला तर अजून मजा येते. त्यात डान्स परफॉर्मन्स हा जोडीने सादर करण्याचा असेल तर तयारी तर होणं महत्वाचं असतं. कारण या जोडीने सुसूत्रपणे डान्स केला तरच तो परफॉर्मन्स बघताना मजा ही येते. याचंच उत्तम उदाहरण म्हणजे आज आपल्या टीमने पाहिलेला वायरल व्हिडियो होय. हा व्हिडियो जवळपास २९ लाख लोकांनी पाहिलेला आहे. यावरून या व्हिडियोची लोकप्रियता लक्षात यावी. हा व्हिडियो वायरल होण्यामागचं कारण म्हणजे यातील डान्सर्स नी केलेला अप्रतिम डान्स परफॉर्मन्स होय. या डान्सर्स मध्ये एका मुलीचा आणि एका मुलाचा समावेश असतो. हा व्हिडियो जवळपास दोन एक मिनिटांचाच आहे. पण त्यातूनही या दोघांचं डान्स वर असलेलं प्रेम अधोरेखित होतं. कारण हे दोघेही अगदी मनापासून डान्स करतात. त्यामुळे या दोघांच्या स्टेप्स अगदी आपलं मन जिंकून जातात. तसेच अशा प्रसंगी जो डान्स होत असतो त्याने आपल्याला प्रसन्न वाटणं महत्वाचं असतं. जी बाब हा व्हिडियो बघून पूर्ण होते. कारण या दोघांमधली तारतम्य राखत दाखवलेली सुसूत्रता आवडून जाते.

तसेच कमी वेळात ही बऱ्याच गाण्यांवर हे दोघे डान्स करतात. त्यात प्रत्येक गाण्यानुसार स्टेप्स ही वेगवेगळे असतात. त्यामुळे ते दोघे जसे या डान्सची मजा लुटत असतात तशीच मजा आपल्याला त्या दोघांचा परफॉर्मन्स बघताना येतो. आपणही जर त्यांचा परफॉर्मन्स पाहिला असेल तर आपल्याला ही हे जाणवलं असेलच. तसेच या दोघांच्या सादरीकरणावर तुम्ही फिदा झाले असणार हे नक्की. आपली टीम ही या व्हिडियो वर बघताचक्षणी फिदा झाली. त्यात या दोघांच्या प्रसन्न व्यक्तिमत्त्वांमुळे हा डान्स वारंवार बघवासा वाटला. म्हंटलं आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल. त्यातूनच मग हा लेख लिहिला गेला आहे.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *