जसं संसाराचं वय वाढेल तसा इंटरेस्ट कमी होत जातो, असे म्हणतात. अर्थात एका अर्थी ते बरोबरच आहे. समजा, तुमच्याकडे गाडी नाही आणि काही दिवसांनी तुम्ही कष्ट करून एक अल्टो गाडी विकत घेतली तर सुरुवातीला तुम्हाला गाडी चालवताना एकदम थ्रिल वाटतं. पण नव्याचे नऊ दिवस जसे सरतात मग सगळं काही नॉर्मल होऊन जातं. तसंच अगदी सेम संसाराचं असतं, नव्याचे नऊ दिवस सरले की, सगळं काही नॉर्मल होतं. मात्र तरीही काही लोक असे असतात, ज्यांचा संसाराचा उत्साह काही औरच असतो. जो त्यांच्या वागण्या-बोलण्यात दिसतो. अशाच एक दिलखुलास जोडीचा दिलखेचक व्हिडीओ आमच्या टीमला मिळाला आहे. या व्हिडीओत हे नवतरुण जोडपं लैच भारी डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला आहे. कुठल्यातरी लग्नाचा हा कार्यक्रम आहे. यात अनेक जोडपे आपापल्या पद्धतीने नाच करून एन्जॉय करत आहेत.
अशातच या जोडप्याची एन्ट्री होते. सगळ्यांना वाटतं कुठलंतरी रिसेन्ट किंवा ट्रेंडिंग गाणं लागेल. पण गाणं सुरू होतं आणि सगळे आश्चर्यचकित होतात. गाणं असतं… ज्युली, ज्यूली… सुटाबुटात असणारा नवरा आणि लाल वनपीस घालून नाचणारी नवरी… हे जोडपं एकदम कमाल नाचलं आहे. म्हणूनच तर हा व्हिडीओ अवघ्या सहा महिन्यात लाखो लोकांनी बघितला आहे. एक जोडपं नाच करतं आणि त्याला लाखो लोक बघतात. असं नेमकं काय आहे या व्हिडीओत, ज्यामुळे हा व्हिडिओ व्हायरल झाला.
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे लग्नात नाचताना त्यांनी टिपिकल गाणं निवडलेलं नाही. दुसरी गोष्ट अशी की, काही गाणी मुळातच नाचायला लावणारी असतात. जसे की, झिंगाट, पिंगा, मल्हारी… मात्र ज्यूली ज्यूली हे गाणं फारस एनर्जेटिक नाही. तरीही या दोघांनी मिळून या गाण्यावर जो ताल धरला आहे आणि शेवटपर्यंत लोकांना व्हिडीओ बघण्यास भाग पाडलं आहे, इतका अफलातून डान्स केला आहे.
अजून एक भारी गोष्ट म्हणजे त्यांनी गाण्यात काही जुन्या स्टेप्स केल्या आहेत, त्यामुळे वातावरणात एक जुना आणि हवाहवासा वाटणारा फील येतो आहे. या गाण्यात नाचताना त्यांनी अभिनयाचीही साथ घेतली आहे. तसेच या जोडप्याच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्सही आपल्याला आकर्षक वाटतात. एकूणच वातावरणाचा नूर यांच्या गाण्यामुळे पलटला असावा, असे वाटते. कारण गाणे सुरू झाल्यावर काही सेकंदातच लोक त्यांच्यावर पैसे ओवाळून टाकत आहेत.
लगीनघरी बऱ्याचदा अशा नाचण्या गाण्याच्या कार्यक्रमात जोडप्यातील नवरा नाचत असतो. बायको अधून मधून कम्बर किंवा हात हलवून त्याला साथ देत असते. मात्र या जोडप्याने एकमेकांना पुरेपुर साथ दिली आहे. शेवटपर्यंत दोघांनी मजा घेत डान्स केला आहे. अवघ्या एकाच मिनिटासाठी ते नाचले आहेत पण त्यांनी उपस्थितांचे पुरेपूर मनोरंजन केले आहे. तुम्ही आजवर अनेक जोडप्यांना लग्नात नाचताना बघितलं असेल मात्र या जोडप्याचा डान्स पाहून तुम्हालाही त्यांचं कौतुक नक्कीच वाटलं असणार, हे नक्कीच.
बघा व्हिडीओ :