Breaking News
Home / मनोरंजन / ह्या कपल्सने समारंभात सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीही कौतुक कराल

ह्या कपल्सने समारंभात सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीही कौतुक कराल

कोणत्याही समारंभात रंगत भरते ती उत्साही मंडळींनी. त्यातही हा समारंभ लग्नसमारंभ किंवा साखरपुड्याचा समारंभ असेल तर मग अजूनच मजा. कारण या दोन्ही समारंभांमध्ये नवरा आणि नवरीकडील उत्साही आणि ऊर्जावान मंडळी मस्त मजा करतात. त्यातही डान्स तर अशा मंडळींचा जीव की प्राण असतो. हल्ली तर अशा समारंभांमध्ये खास असे डान्स फ्लोअर्स केलेले असतात. त्यावर जाऊन वर्हाडी मंडळी मस्त नाचू शकतात. त्यांचे पाय थिरकवायला मदत म्हणून आणि समारंभात रंगत आणायची म्हणून डी जे पण असतोच. आज या सर्वांची आठवण झाली ती एका व्हिडियो मुळे. या व्हिडियोत एका जोडप्याने जो मस्त डान्स केलाय ना की विचारू नका. आजचा हा लेख त्याचविषयी आहे. चला तर मग याविषयी अजून जाणून घेऊयात. व्हिडियो सुरू होतो तेव्हा एक मुलगा आणि मुलगी डान्स फ्लोअर वर उपस्थित असतात. सोबत बाकीची मंडळी ही असतातच. तेवढ्यात गाणं सुरू होतं. सुपरस्टार ‘गोविंदा’ यांची अनेक गाणी गाजली. त्या प्रत्येकावरचा त्यांचा डान्स तर अप्रतिमच.

अशाच त्यांच्या एका सुप्रसिद्ध गाण्याची धून आपल्या कानावर पडते. ‘तू मेरा हिरो नंबर वन’. याबरोबर ही जोडी डान्स करायला लागते. पहिली ३५ सेकंद केवळ धून आणि त्यावर या दोघांनी मस्त हावभाव आणि स्टेप्स करत दिलेला डान्स बघायला मिळतो. ही दोघेही या डान्सची मजा लुटत असल्याने आपणही डान्सचा आनंद घेत असतो. पण अजून मजा बाकी असते. गाण्यातील नायिका नायकाला पटवते आहे असे या गाण्याचे शब्द असतात. त्याला अनुसरून या व्हिडियोतील मुलगी त्या मुलाला पटवण्याचा अभिनय करत असते. तो ही भाव खाल्ल्याचा अभिनय उत्तम करत असतो. डान्स फ्लोरच्या जवळपास प्रत्येक कोपऱ्यात तो जाऊन येतो आणि डान्समध्ये ही मुलगी प्रत्येक वेळी त्यास ओढून दुसरीकडे नेते. त्यांच्यातील ही नटखट अदा प्रत्येकाला आवडून जाते. दरम्यान दोन काकू यांच्यावरून पैसे ओवाळूनही गेलेल्या असतात. यावरून कल्पना यावी. गाणं जस जसं पुढे सरकतं तस तसं मुलाचा गाण्यातील सहभाग अजून वाढतो. गाण्यात जेव्हा नायक बोलायला लागतो तेव्हा तर हे साहेब शंभर टक्के त्या डान्स फ्लोअरचा ताबा घेतात.

एकेक धमाल स्टेप्स करत उपस्थितांचं मनोरंजन करण्यात तो यशस्वी ठरतो. दोन मिनिटं आणि दहा सेकंदाच्या वेळी तर त्याने पायाची हवेत केलेली स्टेप खूप भाव खाऊन जाते. आपल्यालाही ती स्टेप आवडतेच. एव्हाना हा डान्स संपत आलेला असतो. डान्सच्या शेवटी हा मुलगा त्या मुलीला उचलून घेतो आणि सगळेच जण जल्लोष करतात. एवढ्या धमाकेदार परफॉर्मन्स नंतर त्याची ही कृती म्हणजे चेरी ऑन द केक ठरते. सगळेच जणं यांचं कौतुक करत असतात. आपणही यात पाठी नसतोच. त्यांनी अतिशय उत्साहाने केलेला हा डान्स आपल्याला आवडतोच. आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्यालाही आवडला असणार. त्याचप्रमाणे आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल हे नक्की. आपण आपल्या टीमने लिहिलेल्या लेखांना पसंत करता आणि प्रोत्साहन देत असता हे आपल्या कमेंट्स मधून कळून येतं. आपल्या या पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद ! तसेच आपण मोठया प्रमावर आपल्या टीमचे लेख शेअर करत असता त्याबद्दल ही आपले आभार. आपला लोभ आपल्या टीमवर कायम असू द्या ही विनंती.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.