Breaking News
Home / बॉलीवुड / ह्या कलाकारांनी घटस्फोटासाठी मोजले होते करोडो रुपये, हृतिक रोशनने सुझेनला बघा किती दिले होते

ह्या कलाकारांनी घटस्फोटासाठी मोजले होते करोडो रुपये, हृतिक रोशनने सुझेनला बघा किती दिले होते

सैफ अली खानपासून ते संजय दत्त-हृतिक रोशनपर्यंत या सेलिब्रिटींना घटस्फोट घ्यावा लागला, अश्या केल्या बायकांनी डिमांड

सेलिब्रिटींच्या झगमगत्या लाईफस्टाइलमध्ये त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित करतात. मोठे सेलेब्स त्यांच्या जोडीदारास घटस्फोट देऊन आपल्या आयुष्यात पुढे गेले आहेत, तर काही अविवाहित पालक बनून मुले वाढवत आहेत. अनेक सेलिब्रिटींमध्ये घटस्फोट घेणे खूप महाग झाले आहे. अश्याच घटस्फोटांबद्दल आज आपण अशा आश्चर्यकारक विवाहांबद्दल जाणून घ्या.

मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करत आहे तर तिचा एक्स पती अरबाज खान ज्योर्जियाशी रिलेशनशिपमध्ये आहे. असे म्हटले जाते की मलायकाने तिची लैविश लाइफस्टाइल सांभाळण्यासाठी घटस्फोटादरम्यान १० ते १५ कोटींच्या पोटगीची मागणी केली होती.

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्यातील संबंधांची माहिती सर्वांना आहे. अमृताशी घटस्फोट घेतल्यानंतर सैफने स्वत: सांगितले कि त्याला अमृताला ५ कोटी रुपये द्यावे लागतात, त्यापैकी त्याने अर्धे पैसे दिले आहेत. यासह, सैफने असेही सांगितले होते की, मुलगा इब्राहिम अली खानला वाढवण्यासाठी तो दरमहा अमृताला पैसे देतो.

अभिनेता फरहान अख्तर ची पहिली पत्नी अधुना भंबानीशी घटस्फोट घेतल्यानंतर आता अभिनेत्री शिबानी दांडेकर ला डेट करीत आहे. २०१७ मध्ये फरहान आणि अधुनाचा १६ वर्षांचा विवाह मोडला आणि घटस्फोट घेतला. असं म्हणतात की घटस्फोटानंतर फरहान अख्तरला अधुनाला मुंबईच्या बॅन्डस्टँडमध्ये १०,००० फूट बंगला द्यावा लागला. हाच तो बंगला आहे ज्यात फरहान आणि अधुना एकत्र राहत होते. यासह फरहान देखील अधुनाला मुले वाढवण्यासाठी मोठी रक्कम देतो.

राणी मुखर्जीशी लग्न होण्यापूर्वी चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा पायल खन्ना हीचा पती होता, आदित्यने पायलला घटस्फोट देण्यासाठी ५० कोटी रुपये दिले होते.

अभिनेता आमिर खान सध्या त्याची दुपारी पत्नी किरण सोबत आनंदाने जगत आहे. किरणच्या आधी आमिर खानने रीना दत्तशी लग्न केले. रीना आणि आमिर यांना दोन मुले आहेत. रीना दत्तापासून घटस्फोट घेतल्यानंतर आमिर खानने तिला ५० कोटी रुपये दिले.

सुपरस्टार संजय दत्तने मान्यता दत्तशी लग्नाआधी रिया पिल्लईशी लग्न केले होते. तथापि, लवकरच या दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. रियापासून घटस्फोट घेतल्यानंतर संजय दत्तने तिला पोटगी म्हणून तिला त्याचे मोठे अपार्टमेंट आणि लक्झरी कार दिली. इतकेच नाही तर बर्‍याच काळासाठी संजय दत्तला रियाचे बिलही भरावे लागले.

असं म्हणतात कि, हृतिक रोशनला पत्नी सुजैनसोबत घटस्फोट खूप महाग पडला होता. हृतिक रोशनने पोटगी म्हणून सुजैनला ३८० कोटी दिले. हृतिक आणि सुजैनने २०१२ मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला होता. या दोघांनाही दोन मुले आहेत.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *