Breaking News
Home / मनोरंजन / ह्या कलाकाराने नाचता नाचता चक्क गॅसचा बाटलाच लेहेंगामध्ये गायब केला, त्यानंतर पुन्हा नाचू लागला.. बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या कलाकाराने नाचता नाचता चक्क गॅसचा बाटलाच लेहेंगामध्ये गायब केला, त्यानंतर पुन्हा नाचू लागला.. बघा हा अतरंगी व्हिडीओ

आपल्या आजूबाजूला अनेक करामती माणसं असतात. त्यातील काहींच्या करामती आपल्या डोक्याला ताप करून सोडतात तर काहींच्या करामती बघून आपल्याला आपलं हसू आवरत नाही. आता अर्थातच डोक्याला ताप करणारी मंडळी आपल्या आजूबाजूला नको असतात आणि ती तशी लांब राहतील याचीच आपण काळजी घेत असतो. पण याउलट करामती स्वभाव असलेली पण त्यांचा कलात्मक वापर करणाऱ्या माणसांचं आपल्याला कौतुक वाटतं.

अनेक वेळा तर या कलंदर माणसांना अनेक घरगुती समारंभात वगैरे बोलावून त्यांच्या कलेचा ही आस्वाद घेतला जात असतो. आपल्याकडे नाही का, नवरात्रोत्सव आणि गणेशोत्सवात, जादूचे प्रयोग वगैरे होतात. या सांस्कृतिक सणांप्रमाणे अगदी कोणा छोट्या मुलाचा वा मुलीचा वाढदिवस असेल तर त्याप्रसंगी ही असे प्रयोग केले जातात. त्याचप्रमाणे उत्तर भारतात ही जागरण सोहळा होत असताना काही कलाकारांना बोलावलं जातं. गायन आणि नृत्य हा त्यांच्यासाठी मुख्य कार्यक्रम असला तरी सोबतीला करामती करून दाखवणं हा ही एक कार्यक्रम असतो. अर्थात हे एकमेकांत गुंतलेले असे कार्यक्रम असतात. पण त्यामुळे घटकाभर का होईना मनोरंजन ही होतं आणि वेळ ही जातो.

आता हे सगळं सांगायचं कारण काय? तर अर्थातच आपल्या टीमने पाहिलेला एक व्हिडियो होय. हा व्हिडियो एका जागरण समारंभातील आहे. आता समारंभ म्हंटला की त्यात पाहुणे रावळे आलेच. तसेच इथेही असतात. अनेक स्त्रिया, लहान मुलं-मुली हे सगळे गोलाकार आकारात बसलेले असतात. तसेच मध्यभागी एक कलाकार उभे असतात. आता सहसा अशा कार्यक्रमांमध्ये पुरुष हे स्त्रियांचा पेहराव करून कला सादर करत असतात. असो. तर, व्हिडियो सुरू झाल्यापासून हे कलाकार एका परिचित धून वर डान्स करत असतात. ही परिचित धून म्हणजे ‘नागीण डान्स’ची धून असते. त्या धून वर ठेका धरत आणि प्रत्येक बिट पकडत हा डान्स चालू असतो. गोलाकार फिरत फिरत सगळा डान्स होत असतो. एकदा तर जवळच बसलेल्या एका छोट्या मुलाला बाजूला करून हा डान्स सुरु असतो. पण या सगळ्यांत एक निर्जीव वस्तू आपलं लक्ष वेधून घेत असते. ती या डान्सच्या अगदी मध्यभागी ठेवलेली असते. काय असते ती? तर तो असतो गॅसचा बाटला ! होय, आपल्या रोजच्या परिचायाचा तोच लाल रंगाचा बाटला ! फक्त हा बाटला थोडा बटला असतो. इतका बटला की माणूस उभा राहिला तर त्याच्या गुडघ्यापेक्षा कमी उंची भरेल. पण यातच तर मेख असते. कारण वर उल्लेख केलेल्या कलाकाराचं नाचणं एव्हाना होत आलेलं असतं. आता खऱ्या करामतीची वेळ असते. हा कलाकार नाचत नाचत पुढे येतो.

अलगदपणे आपला लेहेंगा त्या बाटल्यावर पसरवतो. त्याची काय ती ऍडजस्टमेंट तो क्षणांत करतो आणि पुन्हा नाचायला लागतो. बरं हे सगळं बऱ्याच चपळाईने यो करतो. पण अस असलं तरी या कारामतीची ट्रिक एव्हाना कळलेली असते. पण एव्हाना बराच वेळ अगदी मख्खपणे सगळं बघणारी आजूबाजूची मंडळी टाळ्या वाजवायला लागलेली असतात. या कलाकाराचं कौतुक करत असतात. आणि खरं सांगायचं तर हे कौतुक करायलाच हवं. कारण छोटा का असेना पण तो गॅस बाटला पायात धरून गिरक्या घेणं हे काही सोप्पं काम नाही. त्यासाठी अर्थातच मेहनत आणि तालीम लागतच असणार यात शंका नाही. त्यामुळे हा व्हिडियो आपल्यासाठी अगदी आश्चर्यकारक नसला तरी आनंद मात्र देऊन जातो. कळत नकळत त्या कलाकाराचं कौतुक वाटून जातं. असो.

आपली टीम नेहमीच नवनवीन आणि उत्तम विषयांच्या शोधात असते. या ‘शोध मोहिमे’त हा वर उल्लेख केलेला व्हिडियो आढळला. यातील वेगळेपणा विषयी लिहावं अस वाटलं आणि त्यातूनच आजचा हा लेख लिहिला जातो आहे. आपल्या टीमचा हा प्रयत्न आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *