कला हा असा एक प्रांत आहे ज्यास कोणत्याही मानवी बंधनात बांधणे केवळ अशक्य असते. तसेच कला ही कोणाचीही मक्तेदारी ठरू शकत नाही. ती कोणत्याही व्यक्तीत असू शकते. त्यात सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि इतर कोणीतीही बंधने लागू पडत नाहीत. आज हे सगळं आठवण्याचं कारण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो. आपल्याला आठवत असेल तर काही दिवसांपूर्वीपासून आपल्या टीमने परदेशातील वायरल व्हिडियोज बद्दल लेख लिहिण्यास सुरुवात केली होती. त्यातील नवीन लेख लिहिण्यासाठी आपली टीम नवनवीन व्हिडियोज बघत होती आणि हा व्हिडियो सापडला. हा व्हिडियो आहे एका स्ट्रीट आर्टिस्ट चा. हा स्ट्रीट आर्टिस्ट म्हणजे एक उत्तम चित्रकार आहे. कारण हा कलाकार कॅमेऱ्यासमोर छोटासा कॅनव्हास घेऊन बसलेला असतो.
त्यावर त्याने पिवळ्या रंगाच्या दोन, लाल रंगाची एक आणि गडद निळ्या रंगाची एक अशा चार पट्ट्या ओढलेल्या असतात. त्याचा एकंदर अवतार बघून याला हे जमेल का, असं कुणास वाटून जाऊ शकतं. पण तसं नसतं. हा उत्तम कलाकार म्हणून व्हिडियो संपेपर्यंत आपल्या समोर येतो. त्याने ओढलेल्या त्या तीन रेघोट्यांवर सफाईने हात फिरवत चित्र रेखाटण्यास सुरुवात करतो. पहिल्यांदा पिवळ्या आणि लाल आणि मग निळ्या रंगात तो पूर्ण कॅनव्हास न्हाऊन जातो. काही ठिकाणी तर अतिशय गडद रंग प्राप्त झालेला असतो. पण प्रत्येक कसलेल्या चित्रकाराप्रमाणे तो ही आपल्या बोटांची जादू या कॅनव्हास वर दाखवायला सुरुवात करतो. प्रथमतः आपल्याला सुर्यदेवांच दर्शन होतं. मग निळ्याशार रंगातून नदी येते. पण काहीच क्षणात केवळ निळीशार न राहता विविध छटा असलेली नदी आपल्याला पाहायला मिळते. तिच्यात छटा निर्माण करण्याची त्याची शैली आपल्याला आवडून जाते. मग थोडे नवीन रंग ही वापरले जातात. मग लक्षात येतं की या रंगांचा वापर करून काठाशेजारील झाडं दाखवली आहेत.
पुढे पुढे यातूनच मग नदीचे चढ उतार यातून दाखवले जातात. या नवनवीन गोष्टींमुळे आधी काढलेले पर्वत काहीसे झाकोळून जातात पण हीच तर खऱ्या चित्रांची गंमत असते. मग हलकेच खाली दोन खडकही येतात आणि अवघ्या दोन मिनिटांत एक उत्तम कलाकृती आपण पाहत असतो. प्रत्येक कलाकृती दिसायला जशी वेगळी पण प्रसन्न असते तशीच ती कलाकृती साकार होण्याची प्रक्रिया सुद्धा. या व्हिडियोच्या निमित्ताने केवळ बोटांचा वापर करत उत्तम चित्र कसं रेखाटावं हे आपल्याला अनुभवायला मिळतं यात काही वेगळाच आनंद सामावला आहे. तुम्हाला या चित्रकलेच्या पद्धतीविषयी काय वाटतं आणि या लेखाविषयी सुद्धा काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स सेक्शन मध्ये जरूर कळवा. तसेच एवढं उत्तम चित्र चितारणाऱ्या या कलाकाराला मराठी गप्पाच्या टीम आणि वाचकांच्या वतीने सलाम.
आपण नेहमीप्रमाणे हा लेखही शेअर कराल अशी खात्री आहे. पण सोबतच आपल्या टीमने विविध विषयांवर लेख लिहिले आहेत ते सुद्धा नक्की वाचा आणि शेअर करा. आपल्या वेळेसाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :