Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकांचा रस्त्यावरचा अफलातून डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल, बघा हा अप्रतिम डान्स

ह्या काकांचा रस्त्यावरचा अफलातून डान्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल, बघा हा अप्रतिम डान्स

आयुष्य हे त्यातला आनंद अनुभवण्यासाठी असतं असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. आपणही आपल्या आयुष्यात आपल्याला जमेल तेव्हा आणि जमतील तेवढे आनंदाचे क्षण अनुभवण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतो. पण आपल्यातले बरेचसे जण मात्र आयुष्यातला प्रत्येक क्षण जणू आनंदाने जगतात असंच वाटतं. अर्थात काही वेळेस ही माणसं अतरंगी सुदधा वाटतात. पण बहुतांश वेळेस ते आयुष्यात मजा मस्ती करत आनंद लुटत असतात असं वाटत राहतं. असंच काहीसं वाटायला लावणारा एक व्हिडियो आपल्या टीमच्या नजरेस पडला. हो नजरेस पडलाच म्हणायला हवं. कारण आपली टीम एक वायरल व्हिडियो बघत असताना नेमका हा व्हिडियो समोर आला. मग आधीचा व्हिडियो राहिला बाजूला ह्याच व्हिडियोविषयी चर्चा झाली आणि आजचा हा लेख लिहिला जातो आहे. चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडियो विषयी. व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक माणूस पांढरा शर्ट, काळी पॅन्ट, काळे बूट अशा अगदी व्यवस्थित म्हणावा अशा पोषाखात असतो.

व्हिडियो बघून कळतं की हा गणेश विसर्जनाचा दिवस असणार. त्यामुळे ट्राफिक काहीसं वळवलेलं असतं आणि अगदी सामान्य माणसं ही रस्त्यावरून बिनधास्त चालत असतात. याचवेळी वर उल्लेख केलेला माणूस रस्त्यावर उभा असतो. गर्दी सांभाळणारा असेल असं वाटतं पण तसं नसतं. जवळच एके ठिकाणी जसं गाणं सुरू होतं ‘स्वीटी स्वीटी तेरा प्यार चाहिदा’ तसे या माणसाचे पाय थिरकायला लागतात. पहिल्या वीस सेकंदात कळतं की या दादांना डान्सची आवड आहे आणि सवय सुद्धा. कारण ज्या सहजगतीने त्यांच्या पायांची हालचाल होत असते ते पाहता एखादा डान्स प्रेमी असा डान्स करु शकतो हे जाणवतं. पण या डान्स मध्ये केवळ पदलालित्य असतं असं नाही. तर त्याला तडका मिळालेला असतो तो विनोदाचा. या दादांनी आपली विनोदबुद्धी वापरत बऱ्याच स्टेप्स केल्या आहेत हे संपूर्ण व्हिडियो भर जाणवतं. अगदी एक स्टेप तर तीनदा होते. ती म्हणजे बाजूने दुचाकी जात असताना त्यावर बसण्याची स्टेप. आजूबाजूला जे बघे आणि आपण ऑनलाईन बघे असतो त्यांना हमखास हसायला लावणारी ही स्टेप.

अजून एक म्हणजे रस्त्यावर काही तरी पडलंय असं दाखवणं. समोरून येणारा दचकलाच पाहिजे. पण तेवढीच मजा पण येते. एकवेळ मात्र खरच रस्त्यात काही तरी पडलंय असंही वाटतं. ही सगळी धमाल मस्ती चालू असताना गाणं बदलतं. म्हणजे काही सेकंद बदलणारं म्युझिक आपण ऐकत असतो. त्यावेळी हा माणूस गालावर हात घेऊन फिरत राहतो आणि जसं दुसरं गाणं वाजतं तसा नव्या दमाने डान्स करायला लागतो. आपल्या सगळ्यांच्या आवडीचं अप्सरा आली हे गाणं सुरू असतं. त्यावरही मस्त डान्स सादर केलेला बघायला मिळतो. मधेच एक छोटे घरगुती बाप्पा समोरून येतात त्यांचं दर्शन घेत हे दादा आपला डान्स सुरू ठेवतात. रिमझिम रिमझिम पाऊस पडत असतो. आजूबाजूने माणसं आणि वाहनं जात असतात. पण डान्सबद्दल अतोनात प्रेम असणारे हे दादा मात्र आपल्याच दुनियेत , मजा करत आणि बाकीच्यांची मजा घेत डान्स करत राहतात. त्यांचं पदलालित्य आणि विनोदबुद्धी यांमुळे हा व्हिडियो अगदी आवडून जातो. यात वर उल्लेख केलेल्या बाबींपेक्षा जास्त गोष्टी आहेत ज्या आपल्याला व्हिडियो बघताना अनुभवता येतात.

आपण हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला काही घटका विरंगुळा म्हणून हा व्हिडियो नक्की आवडला असणार. ज्यांना डान्सची आवड आहे त्यांना तर आवडला असणारच आणि ज्यांना डान्स आवडत नाही किंवा जमत नाही त्यांनाही आवडला असणार. एवढंच कशाला पण हा व्हिडियो बघून आपल्यालाही असं मनमोकळं नाचता आलं तर असे विचार सुरू होतात. असो. एक मात्र नक्की की असा डान्स करताना आपल्या आजूबाजूच्यांना त्रास होणार नाही याची काळजी मात्र नक्कीच घेतली पाहिजे. असो. आपल्याला हा व्हिडियो आणि त्यावरचा आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आवडला असणार हे नक्की. यानिमित्ताने आपली टीम आपल्या वाचकांचे आभार मानू इच्छिते. आपण आपले लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करता त्यामुळे आमचाही उत्साह वाढतो. नवनवीन विषयांवर लेखन करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं. तेव्हा आपलं हे प्रोत्साहन आम्हाला नेहमी मिळत राहू दे. आपली टीमही आपल्यासाठी विविध विषयांवर लेखन करत राहीलच. आपल्या टीमवर आपला लोभ कायम असू द्या. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.