Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकांचा व्हिडीओ पाहिल्यावर कळेल आयुष्याचा खरा आनंद घेणे कशाला म्हणतात, बघा व्हिडीओ

ह्या काकांचा व्हिडीओ पाहिल्यावर कळेल आयुष्याचा खरा आनंद घेणे कशाला म्हणतात, बघा व्हिडीओ

हो नाही हो नाही करता करता शेवटी थंडीबाईने आपलं दर्शन आपल्याला दिलं आहे. आजूबाजूचं वातावरण आता अगदी गार होऊ लागलंय. इतकं की काही जणांना काढ्याची किंवा सूप वगैरेची तलफ भासू लागली असेल. काही जण डॉक्टर कडेही पळू लागले आहेत. तर काही ठिकाणी शेकोटी पार्टी होत असतील. तर काही जण नुसतेच पांघरूण अंगावर घेत रोज सकाळी थंडीत झोपून राहण्याचा आनंद घेत असतील. एकंदर काय तर ऋतू बदलला की आपल्या आजूबाजूची परिस्थिती बदलते. अस असलं तरी काही जणांची वृत्ती मात्र अगदी सुशेगाद असते. त्यामुळे आजूबाजूला वातावरण कसंही असलं तरी त्यातही मजा घेण्याची संधी ही मंडळी सोडत नाहीत.

या अशा आनंदी व्यक्तींकडून आयुष्याची मजा कशी घ्यावी हे आपल्याला बघायला मिळतं. आज आपल्या टीमने अशाच एका मस्त आनंदी काकांचा एक व्हिडियो बघितला. खरं तर हा व्हिडियो काही वर्षांपूर्वी आपल्या पैकी अनेकांनी पाहिलेला असेल. कारण त्यावेळी तो प्रसिद्ध झाला होता आणि सोशल मीडियावर फिरत असल्याच्या पुसटश्या आठवणी आजही आठवतात. असो.

पण हा व्हिडियो प्रसिद्ध का झाला होता? तर या काकांच्या मस्त आनंदी वागण्याने. बरं आनंदी वागणं म्हणजे उठून नाचायला लागले आणि धांगडधिंगाणा केलं असं काही नाही. उलट हे काका एका स्वयंपाकघरात बसलेले दिसून येतात. त्यांच्या समोर काही तरी चार्जिंगला लावलेलं असतं. जवळच चणे असतात. त्यात थोडे शेंगदाणे ही असावेत. एवढंच काय तर त्याच्या बाजूला स्टार्टर म्हणून खाल्लेल्या काकडी पैकी एक फोड काकांनी तोंडी लावण्याची वाट बघत पडलेली असते. इथे काकांना मात्र त्या फोडीची काही पडलेली नसते. कारण काकांचं कदाचित आवडतं असं गाणं लागलेलं असतं. आता हे खरंच आवडतं गाणं असतं की अजून काही कारण असतं माहीत नाही. पण ते महत्वाचं नाही. महत्व आहे ते काकांचा मूड मस्त बनलेला असतो. व्हिडियो सुरू होण्यासोबतच गाणं ही सुरू होतं. हे गाणं म्हणजे खुदगर्ज या हिंदी चित्रपटातलं एक लोकप्रिय गाणं आहे. ‘दिल बहलता हैं मेरा, आपके आ जाने से’ हे त्या गाण्याचे बोल. हे गाणं गोविंदाजी आणि नीलमजींवर चित्रित झालं होतं. आजही सोशल मीडियावर या गाण्याच्या व्हिडियोजवर लाखो व्ह्यूज पाहायला मिळतात. या गाण्यावर काका मस्तपैकी डुलायला लागतात. जागेवर बसूनच त्यांचे हातवारे सुरू होतात.

बरं सुरुवातीला केवळ म्युझिक वाजत असतं. पण काकांचा मूड एकदम मस्त असतो. म्हंटल्यावर गाण्यातील शब्द अवतरण्याअगोदरच काका त्या गाण्यातील बिट्स पकडत मजा घेत असतात. एकदा शब्द कानावर पडायला लागले की मग तर सोने पे सुहागा अशी परिस्थिती असते. काका हळू आवाजात गात असतात. पण लिपसिंक बरोबर होत असत. काकांच्या डान्सने माहोल बनलेला असतो. खरं तर या पूर्ण व्हिडियो विषयी लिहिता येईल. पण मग त्याची मजा निघून जाईल. आपल्या वाचकांचा रसभंग होऊ नये याची आम्ही नेहमीच दक्षता घेत आलो आहोत. त्यामुळे आम्ही इथे सगळा वृत्तांत देत नाही आहोत. पण आपली टीम हा व्हिडियो शेअर करेल. आपण जर हा व्हिडियो बघितला असेल तर केवळ काकांचा चेहरा बघूनच आपण हा व्हिडियो पाहिल्याचं आपल्याला आठवेल. नसेल पाहिला तर एकदा पहाच. त्यातील काकांची मस्त आनंद घेत जगण्याची वृत्ती केवळ काही सेकंदात आपल्याला दिसते आणि आवडून जाते. आमच्या टीमने या व्हिडियोचा आनंद घेतला आहेच. आपणही या व्हिडियोचा आनंद घ्या. तसेच हा लेख शेअर करून आपला हा आनंद इतरांसोबतही शेअर करायला विसरू नका.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *