Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकांनी आपल्या पत्नीसाठी सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीदेखील कराल कौतुक

ह्या काकांनी आपल्या पत्नीसाठी सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, पाहून तुम्हीदेखील कराल कौतुक

सोशल मीडियाच्या जगात वायरल व्हिडियो बघायला मिळणं हे काही नवीन नाही. किंबहुना या नवं माध्यमाचा तो एक अविभाज्य भाग आहे. पण सोशल मीडियात बदल झाले की त्यातील घटक ही बदलतात. वायरल व्हिडियोजच्या बाबतीत ही काहीसं तसच होतंय की काय अस वाटायला लागलंय. कारण हल्ली शॉर्ट व्हिडियोजच्या स्वरूपात वायरल व्हिडियोज बघायला मिळण्याची संख्या वाढली आहे असं वाटतं. त्यामुळे होतं काय की काही वेळेस व्हिडियो एवढ्या पटकन संपून जातो की त्याची मजा अर्धवट राहते. मग पून्हा बघा. पण अस असलं तरी काही जुने व्हिडियोज पुन्हा बघण्यात आले की मात्र गंमत वाटते.

आता आज आपल्या टीमने बघितलेल्या व्हिडियोचं उदाहरण घेऊयात. हा व्हिडियो खरं तर काही वर्षांपूर्वीचा आहे. जवळपास दोन मिनिटांचा असेल. पण त्यात जी गंमत येते ना, ती आजही मनोरंजन करून जाते. थोड्या वेळात ही खूप सारा आनंद मिळतो. कारण या वेळेत त्या व्हिडियोत घडणारी घटना अवलोकन करण्याचा वेळ मिळतो. सगळंच घाई घाईत होत नाही. बरं अस असलं म्हणजे वायरल होण्यासाठी केवळ व्हिडियो कमी जास्त लांबीचा आहे याचा परिणाम होतो का? ते एक परिमाण असू शकत. पण त्या व्हिडियोतून मनोरंजन व्हायला हवं.

आज आपल्या टीमने पाहिलेल्या व्हिडियोतून हे मनोरंजन तर हमखास होताना दिसत. यात घडणारा किस्सा आपल्या आजूबाजूला किंवा अगदी आपल्या बाबतीत ही घडू शकतो किंवा घडलेला असू शकतो. पण होतं काय ? चला जाणून घेऊया. होतं असं की एक समारंभ चालू असतो. बहुधा लग्न वा तत्सम काही असावं. कोण जाणे. असो. पण डीजे ची व्यवस्था असते. आता डीजे म्हंटला की डान्स करणारे आलेच. तसेच एक डान्स करायला आवडणारे आणि उत्साही असे काका आपल्या समोर येतात. सोबत त्यांच्या सौ असतात. ते दोघे केंद्रस्थानी येतात आणि गाणं सुरू होतं. दो घुंट पिला दे साथीयां हे गाणं लागलेलं असतं. त्यात पहिल्या सतरा ते अठरा सेकंदात हे काका आणि काकू असा काही डान्स करतात की ओ हो जबरदस्त !! काका तर गुढग्यावर बसून वगैरे स्टेप करतात. त्यांच्या वयात अनेकांना सांधेदुखी वगैरे असते. पण काका मात्र दिलसे जवान वाटतात. काकूंना ही याची कल्पना असावी. त्यामुळे त्या ही मस्त मजा घेत डान्स करत असतात. पण तेवढयात कहानी मैं ट्विस्ट अशी परिस्थिती उद्भवते. एक दादा ‘बाटली’ घेऊन येतात. आता सुज्ञांना ती कसली, काय वगैरे कळलं असेलच.

तर हा ट्विस्ट पाहून काकू अशा काही चक्रावतात की बघायला नको. बरं ती बाटली ठेऊन जाणारा निघून जातो पण काकू अगदी शिस्तीत ती बाटली बाजूला नेऊन ठेवतात. पण काका एव्हाना डान्स करता करता रंगात आलेले असतात. स्टेप करता करता कधी पून्हा ती बाटली हातात घेतात कळत नाही. बरं काकू ती बाजूला ठेवायला गेल्या की मध्ये येतात. काकूंची मस्करी करणं काकांनी चालू ठेवलेलं असतं. पण काकू ही खमक्या असतात. त्या पूढे काय करतात हे बघून आपण मात्र खळखळून हसूतो. काका शेर असले तरी काकू ही सव्वाशेरणी असतात याचा प्रत्यय या व्हिडियोत येऊनच जातो. बऱ्याच दिवसांनी असा हा नटखट व्हिडियो पाहून मजा येते. आम्ही हा व्हिडियो बघितला आणि खूप हसलो. काकांच आणि काकुंच ही कौतुक वाटलं. या प्रसंगातून काकांचा तरुण स्वभाव आणि त्यावर अंकुश राहील याची काळजी घेणाऱ्या काकुंचा मिश्किल स्वभाव ही बघता आला. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही आवडला असेल. पण आपण नसेल बघितला तर जरूर बघा. अगदी या व्हिडियोचा शेवटही आपल्याला जाणून घ्यायची उत्सुकता असेलच. एकंदर व्हिडियो आपल्याला नक्की आवडून जाईल.

आज खूप दिवसांनी हा असा थोडासा जास्त वेळेचा व्हिडियो बघून आनंद झाला. काका काकूंचा डान्स आणि मिश्किल स्वभाव ही आवडून गेला. तेव्हाच म्हंटलं आपला हा आनंद आपल्या वाचकांसमवेत शेअर करायला हवा. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *