Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकांनी केलेला हा जगावेगळा ‘मुर्गा डान्स’ पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

ह्या काकांनी केलेला हा जगावेगळा ‘मुर्गा डान्स’ पाहून हसू आवरणार नाही, बघा हा अतरंगी व्हिडीओ

आयुष्य कसं जगावं ? तर अगदी आनंदात जगावं असं म्हणतात. खरं ही आहे ते ! कारण आयुष्यात अडीअडचणी कोणाला नसतात सांगा? प्रत्येकाला असतात. काहींच्या आयुष्यात तर अगदी पाचवीला पूजल्या सारख्या असतात. पण त्यांचा सामना करताना, आपल्यापैकी काही जणांना कळून येतं, की या अडचणी आणि दुःखांचा पिच्छा काही केल्या सुटणार नाहीये. तेव्हा त्यांच्याशी लढता लढता, आपलं आयुष्य ही आनंदात जगायला हवं.

आता आनंदात कसं जगावं हा प्रश्न ही पडू शकतो. याची वेगवेगळी उत्तरं असू शकतात. पण आनंदाची बाब अशी की ही उत्तरं अनेकवेळा आपल्या आजूबाजूला बघायला मिळू शकतात. त्यातून एक बाब कळते ती म्हणजे एखाद्या लहानश्या गोष्टींतून ही आनंद मिळवता येऊ शकतो. याचा प्रत्यय देणारा एक व्हिडियो आपल्या टीमने आज बघितला. हा व्हिडियो तसा दीड एक वर्षांपूर्वीचा असावा किंवा अगदी त्या पूर्वीचा ही असेल. काहीही असो. पण त्यातील जो आनंद आहे तो मात्र एरवरग्रीन असा आहे असं म्हंटल्यास वावगं ठरू नये.

या व्हिडियोत आपल्याला एक काका भेटतात. हे काका म्हणजे मध्यमवयीन गृहस्थ असल्याचं कळतं आणि एखाद्या गावात राहत असावेत अस वाटतं. त्यांच्या आजूबाजूचा माहोल बघून तसं वाटतं. असो. तर व्हिडियो सुरू होतो आणि आपल्याला एक ओळखीची धून ऐकायला येते. तसेच एव्हाना हे काका काही तरी हावभाव करून नाचायला लागलेले असतात. काही सेकंदानंतर जाणीव होते की ही तर कोंबड्याचा आवाज असलेली धून आहे. बरं एव्हाना काकांनी ही रंगत भरण्यास सुरुवात केलेली असते. सहसा कोणत्याही कार्यक्रमात रंग भरण्यास हळूहळू सुरुवात होते. पण काका एकदम तेज तर्रार असतात. त्यामुळे त्यांचा डान्स अगदी जोरात सुरू असतो आणि आपल्या मनाची पकड घेतो. आपल्याच काय तर त्यांच्या पाठी असणाऱ्या प्रत्येकाला काकांचा डान्स बघून हसायला येत असत. काका नाचतच असे असतात. आधीच काटक शरीरयष्टी असल्याने पटकन इथून तिथे जात असतात. त्यामुळे इतक्या वेगाने काय काय हातवारे करत असतात की विचारू नका. त्याला साजेसे असे अतरंगी हावभाव यांमुळे या व्हिडियोत अजून मजा येते असते.

हसून हसून आपली ही वाट लागलेली असते. तेवढ्यात अजून एक गोष्ट आपल्या नजरेस पडते. किंबहुना ते काकाच असं काही वागतात की होणाऱ्या धमाल मस्तीत अजून भर पडते. कोंबड्याच्या आवाजाची धून म्हंटल्यावर त्यात कोंबड्याच्या आवाज असणारच ना ! तो तसा असतोही ! आणि प्रत्येकवेळी जेव्हा तो आवाज येतो तेव्हा हे काका स्वतः त्या कोंबड्याचा आवाज करत असतात. इतकंच काय तर स्वतः उचकल्यासारखे नाचत असतात. आवाज करणं आणि असा डान्स यांमुळे जी गंमत निर्माण होते ती आपल्याला खदखदून हसवते. इतकी की आपण नकळतपणे डोळ्यांवर हात ठेवून हसायला लागतो. हसून हसून, ‘अग आईग’ म्हणायची वेळ येते. अर्थात काहींना वाटेल की एवढं काय त्यात !मंडळी आपण हा व्हिडियो जरूर बघा. आपल्याला ही आवडून जाईल असा जबरदस्त व्हिडियो आहे. कारण हे काका जो अतरंगीपणा दाखवतात त्यास तोड नाही. पण ते अस का करतात? त्याचं उत्तर व्हिडियोतच आहे. जवळच एक स्पीकर असतो आणि त्यावर हे गाणं वाजत असतं.

आता बघायला गेलं तर स्पीकर वर गाणं वाजण यात नवीन काही नाही. पण त्या क्षणांचा आनंद घेण्याचं बहुधा या काकांनी ठरवलं असावं. त्यामुळे जी काही धून वाजत असते त्यावर हे काका नाचत असतात. आता त्यावेळी आपल्याला कोणी काही म्हणतंय वगैरे विचार करण्याच्या फंदात ते पडताना दिसत नाहीत. बहुधा आजूबाजूला ओळखीची मंडळी असावीत म्हणून असेल. असो. पण त्या काकांकडे बघून छोट्या छोट्या क्षणातून ही आनंद कसा घेता येतो हे कळतं.

असो. बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *