Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल

ह्या काकांनी घरातील हॉलमध्ये केला अप्रतिम डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल

आपल्यापैकी प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या कलेची आवड असते वा छंद असतो. त्यात मग कोणी छान चित्र काढतो, तर कोणी उत्तम लिहितो. पण त्यातही गाणं आणि डान्स यांची विशेष आवड असणारी बरीच मंडळी असतात. पण कामाच्या आणि संसाराच्या रहाटगाडग्यात बऱ्याच वेळेस ही केवळ एक आवड म्हणून राहते. पण जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा मात्र ही आवड उचल खाते आणि आपण एक छान सादरीकरण करतो. आज आपल्या टीमने एक व्हिडियो पाहिला. त्यातील काका आणि त्यांनी सादर केलेली कला म्हणजे याचा उत्तम नमुना वाटतो. म्हंटलं आपल्या वाचकांनाही या व्हिडियो विषयी कळू द्या. त्यातूनच हा लेख लिहिला जातो आहे.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला समोर एक काका दिसून येतात. एका घराच्या हॉल मध्ये ते उभे असतात. समोर घरातील काही व्यक्ती बसलेल्या असतात. तसेच व्हिडियोच्या सुरुवातीपासून जितेंद्रजींचे एक प्रसिद्ध गाणं वाजत असतं. ‘इतना प्यारा वादा हैं, इन मतवाली आंखों का…’ हे ते गाणं. आपल्यापैकी अनेकांच्या आवडीचं अस हे गाणं असणार. हा व्हिडियो बघून कदाचित या काकांचा डान्सही आपल्याला आवडून जाईल.

व्हिडियोच्या सुरुवातीपासूनच काकांचा उत्साह बघण्यासारखा असतो. सुरुवातीस अगदी स्टाईलमध्ये चालत येत ते डान्स स्टेप्स करत असतात. मग एकेक वेगवेगळ्या स्टेप्स करत त्यांना आवडेल त्या पद्धतीने त्यांचा डान्स चालू असतो. तसेच यात नायक आणि नायिका असे दोघेही असतात. या दोन्ही भूमिका इथे काकाच वठवतात. दोन्ही भूमिकांच्या वेळेस, त्यांच्या चेहऱ्यावरचे खट्याळ भाव लपून राहत नसतात. पण त्याचसोबत जेव्हा नायिकेचा डान्स असतो त्यावेळी काकांच्या हातांची हालचाल अगदी नजाकतीने होते. त्यांच्या देहबोलीतला हा फरक वाखाणण्याजोगा नक्कीच आहे. एकूणच काय तर, काका अगदी मजा घेत घेत डान्स करत असतात. गाण्यातील शब्दांवर तर ते स्टेप्स करत असतातच पण सोबतच गाण्यातील केवळ संगीत वाजत असतं, तिथेही त्यांचा डान्स चालू असतो. ४४ व्या सेकंदापासून ते पुढची सोळा सेकंद याचा उत्तम अनुभव येतो. तसेच त्या संगीताच्या गतीनुसार त्यांच्या स्टेप्सची गती सुद्धा बदलत जाते. या सगळ्या परफॉर्मन्स मध्ये त्यांची एकेक पाऊलं हटके अंदाजात टाकत पुढे येण्याची स्टेप भाव खाऊन जाते.

तसेच १ मिनिट ०९ सेकंद झाले असताना एकदा अशी एक स्टेप करतात की मिथुनदांची आठवण व्हावी. एकूणच हा व्हिडियो बघून एक गोष्ट मात्र खरी असावी ती म्हणजे काकांचं जुन्या गाण्यांवर खूप प्रेम असणार. कारण त्याशिवाय एवढा आनंद घेत घेत नाचणं आणि ते ही ,साडे चार मिनिटं हे शक्य नाही. त्यात कौतुक असे की या साडे चार मिनिटांत कुठेही त्यांच्या चेहऱ्यावर किंवा देहबोलीतून त्यांना थकवा आलाय किंवा कंटाळा वाटतो आहे असं वाटत नाही. त्यामुळे आपणही हा व्हिडियो अगदी उत्साहाने पाहत राहतो. आपल्या टीमला तर हा डान्स व्हिडियो खुप आवडला.

आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास, आपल्याही पसंतीस तो उतरला असेल हे नक्की. त्याचप्रमाणे आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम वाचकांसाठी नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर लेखन करत असते. त्यातीलच हा एक विषय आहे. त्यावरील आपल्या प्रतिक्रियांवरून आम्हाला आम्हाला प्रोत्साहन ही मिळतं आणि काही सुधारणा करायची असेल तर त्याही कळतात. तेव्हा आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स द्वारे कळू द्या. तसेच आपल्या टीमचे लेख वाचत राहा आणि शेअर करत राहा !! धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *