Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकांनी पार्टीमध्ये केला अतरंगी डान्स, काकांचा हा अनोखा डान्स पाहून तुम्हीदेखील कराल कौतुक

ह्या काकांनी पार्टीमध्ये केला अतरंगी डान्स, काकांचा हा अनोखा डान्स पाहून तुम्हीदेखील कराल कौतुक

‘नवरा नवरी करतायत लग्न, आणि काका इथे जबरदस्त डान्समध्ये मग्न’ आज आपल्या टीमने पाहिलेल्या व्हिडियोचं वर्णन करायचं झालं तर या वाक्यांमध्ये करता येईल. कारण आज आपण पाहिलेला व्हिडियो एका जबरदस्त अशा काकांचा आणि त्यांनी त्याहून जबरदस्त पद्धतीने केलेल्या डान्स परफॉर्मन्सचा आहे. आता आपली टीम वायरल व्हिडियोज विषयी लिहित असते हे आपल्याला माहिती आहेच. आपणही त्यास उत्तम प्रतिसाद देत आलेले आहात. सर्वप्रथम त्यासाठी आपले आभार. तर अशाच काही वायरल व्हिडियोज ना आपली टीम बघत होती. म्हंटलं यापैकी कोणत्याही एका वर आज लेख लिहावा. आता व्हिडियोज बघून कशावर लेख लिहायचा हे ठरवणार इतक्यात अजून एक व्हिडियो दिसला. १९ लाख व्ह्यूज असलेला. म्हंटलं असेल काही चांगलं. बघुयात तरी, म्हणून बघायला गेलो आणि हा व्हिडियो आवडून गेला. तोच आजच्या लेखाच्या केंद्रस्थानी असेल.

हा व्हिडियो एका लग्नातला आहे. आता लग्न म्हंटलं की डान्स हा आलाच आणि डान्स म्हंटलं की डान्सर्स आले आणि अर्थात डीजे वाले आलेच. तर व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा आपल्याला या दोघांचं ही दर्शन होतं. अर्थात काकाच डान्सर असतात.

डीजे ने ही मस्त गाणं लावलेलं असतं. लावारीस या लोकप्रिय चित्रपटातलं ‘अपनी तो ऐसें तैसे’ हे ते गाणं. आधीच उत्साह असतो. त्यात हे काका दाखल झालेले असतात. त्यांनी कदाचित या गाण्याअगोदर सुद्धा एका गाण्यावर डान्स केला असावा. कारण पाठी उभा असलेला डीजे त्यांच्या या उत्साहाने चकित झालेला दिसून येतो. आता त्यांच्या या उत्साहाने चकित होण्याची आपली वेळ असते. कारण गाण्याची धून ऐकू येते आणि काका ताल धरतात. सुरुवातीपासून त्यांनी बिट्स पकडत डान्स करायला सुरुवात केलेली असते. एकदम रंगात येऊन त्यांचा डान्स चालू असतो. त्यांचा उत्साह हा जसा चकित करून जातो तसाच आनंद ही देऊन जातो. कारण सहसा त्यांच्या वयात अनेक जण आपण वयाने मोठे आहोत असं मानून डान्स करायला बघत नाहीत. खरं तर मनात इच्छा तर असते पण लोकं काय म्हणतील याचा विचार करत थांबतात. पण खरं सांगायचं तर लोकं अशाच व्यक्तींना जास्त पसंत करतात जे बिनधास्तपणे स्वतःच्या आवडत्या गोष्टी करतात आणि त्यांचा आनंद घेत असतात. आपल्या कडे सोशल मीडियावर असे अनेक मध्यमवयीन गृहस्थ दिसून येतात जे स्थळ काळाच भान ठेवून देखील जीवनाचा आनंद घेत असतात. त्यात या काकांचा ही समावेश करायला हवा. आपल्या टीमला तर या काकांचा हा दिलखुलास आणि बिनधास्त स्वभाव आवडला.

बरं हा डान्स करताना त्या डान्सचा आनंद घेण्याची त्यांची वृत्ती ही आवडून गेली. कारण वर उल्लेख केल्याप्रमाणे जेव्हा माणसं त्यांचा आवडता छंद आनंद घेत साजरा करतात तेव्हा आपसूक इतरांना ही त्यातून आनंद मिळतो. हा व्हिडियो याचं उत्तम उदाहरण म्हणायला हवा. आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्याला ही जाणवलं असेल. पण आपण हा व्हिडियो पाहिला नसेल तर जरूर पहा. आपल्याला काकांचा डान्स आवडून जाईल हे नक्की. तसेच त्यांचा उत्साह बघून तुम्हाला सुद्धा स्वतःला वयाचा विचार न करता स्वतःची आवड निवड आणि छंद जपण्यासाठी प्रेरणा मिळेल हे नक्की. असो.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *