Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकांनी भर पब्लिकमध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, काकांच्या स्टेप्स पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल

ह्या काकांनी भर पब्लिकमध्ये सर्वांसमोर केला अप्रतिम डान्स, काकांच्या स्टेप्स पाहून तुम्हीसुद्धा कौतुक कराल

आपण जेव्हा डान्सचे वायरल व्हिडियोज बघतो तेव्हा त्यात किती उत्तम डान्स होतो आहे आणि तो कोण करतो आहे हे महत्त्वाचं असतं. याच कारण, तरुण मुलं मुली डान्स करतात तेव्हा त्यांच्या डान्सच्या कौशल्याचं कौतुक वाटतं. तर, वयाने थोडे मोठे असलेली मंडळी जेव्हा डान्स करतात तेव्हा त्यांच्या डान्स कौशल्यांसोबत त्यांच्या चिरतरुण वृत्तीचं कौतुक वाटतं. आता आज आपल्या टीमने पाहिलेल्या एका व्हिडियोचं उदाहरण घ्या ना.

हा व्हिडियो आहे तसा जुना. पण यात एक काका असे काही डान्स करतात की नकळत आपल्यातही त्यांची प्रसन्न ऊर्जा येते. हा व्हिडियो कदाचित एखाद्या लग्नसमारंभात चित्रित केलेला असावा. पाठीमागे आपल्याला डीजे दिसून येत असतो. सोबतच बाजूला एक छान सजवलेली कमान दिसत असते. पण या गोष्टी काहीशा दुय्यम ठरतात जेव्हा वर उल्लेख केलेले काका डान्स करायला येतात.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा गाणं वाजायला सुरुवात झालेली असते. काका हात जोडुन उभे असतात आणि तेव्हढ्यात त्यांच्या हातून काही तरी पडतं. पण काकांचं त्याकडे लक्ष नसतं. कदाचित वाजत असलेलं गाणं त्यांच्या आवडीचं गाणं असावं. कारण आता ते पूर्णतः गाण्यात मश्गुल झालेले असतात. एकेक मस्त मस्त स्टेप्स करत त्यांचा डान्स सुरू होतो. हे गाणं असतं ‘अपनी तो ऐसें तैसे’ हे लावारीस चित्रपटातलं गाणं. किशोर कुमार यांच्या आवाजाने नटलेलं आणि श्री अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाने लक्षात राहिलेलं हे गाणं. त्यातील शब्द इतके अर्थपूर्ण आहेत की नकळत हे गाणं आपल्या ओठांवर रुळून जातं. त्यात या काकांचा उत्तम डान्स बघून मन अजून खुश होतं. त्यांच्या डान्स मधून अमिताभ यांच्या डान्स स्टाईलच्या थोड्या स्टेप्स केलेल्या दिसून येतात. त्यात एक हात वर करत नाचणं आलं आणि एक हात पुढे करत नाचणं सुद्धा आलं. मध्ये मध्ये स्वतःच्या स्टेप्स ही ते करत असतात. मग ते दुडक्या चालीने पुढे मागे चालणं असो वा अंगात वीज संचारलासारखी स्टेप असो. काका एकदम गंमत आणतात.

आपण या व्हिडियोजची जेवढी मजा घेतो तेवढीच किंबहुना जास्त मजा उपस्थित सगळे घेत असतात. कॅमेऱ्यासमोर उभे असलेले दुसरे काका सुदधा मध्ये मध्ये डुलत असतात. पण त्यांना या काकांसारखा खुलून डान्स करणं जमत नसतं. पण हरकत नाही. त्यांचा प्रयत्न चालू असतो. तसेच समोरून एक व्यक्ती येउन आपल्या काकांवरून पैसे ओवाळून टाकतात. एवढंच काय तर या व्हिडियोचे कॅमेरामन शिट्टी मारण्याचा प्रयत्न करत असतात. यावरून आपल्याला कल्पना यावी की काकांनी किती गजब डान्स केला असेल. या गाण्यात एक वेळ अशी येते जेव्हा काहीशा संवादात्मक ओळी येतात. तेव्हा तर या काकांची मजाच येते. एकंदर हा व्हिडियो आपल्याला खूप सारा आनंद केवळ काही मिनिटांत देऊन जातो. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला.

आपण हा व्हिडियो पाहिला नसल्यास जरूर पाहा. तसेच यावरील आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला हे नक्की कळवा. कारण आपल्या प्रतिक्रियांतून आम्हाला नेहमीच प्रोत्साहन आणि महत्वाच्या सूचना मिळत असतात. दोहोंचा उपयोग उत्तम लेखन करताना होतो. तेव्हा आपल्या या सूचना आणि प्रोत्साहन आम्हाला नेहमी मिळत राहो हीच सदिच्छा. आपला आमच्या टीमवरचा लोभ कायम ठेवा. लेख वाचत राहा, शेअर करत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *