Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकांनी भर पब्लिक मध्ये फॉरेनर्स सोबत केला अतरंगी नागीण डान्स, बघा व्हिडीओ

ह्या काकांनी भर पब्लिक मध्ये फॉरेनर्स सोबत केला अतरंगी नागीण डान्स, बघा व्हिडीओ

लेखन करणं हे आपल्या टीमचं सगळ्यांत आवडतं काम आहे. त्यामुळेच की काय पण प्रत्येक वेळी एकापेक्षा एक असे लेख लिहिले जात असतात. अर्थात हे काही आम्ही म्हणतोय असं नाही. आम्ही तर केवळ या लिखाणाचा आनंद घेत असतो. वर उल्लेख केलेली प्रशंसा येते ती आपल्याकडून. त्याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. पण मंडळी एखादी गोष्ट कितीही आवडत असली तरी त्याचा कंटाळा हा येतोच. मानवी स्वभावच आहे तो. पण मग कंटाळा आल्यावर याच आवडीचा फायदा ही झालेला बघायला मिळतो. कसा ? चला जाणून घेऊयात.

आमच्या सुदैवाने आपल्या वाचकांना वायरल व्हिडियोज विषयी वाचायला आवडतं. त्यामुळे जेव्हा आम्हाला कंटाळा येतो तेव्हा आम्ही अतरंगी असे वायरल व्हिडियोज बघतो. म्हणजे नेहमीपेक्षा वेगळा विषय हाताळणारे हे व्हिडियोज असतात. त्यामूळे लग्न, लहान मुलांच्या करामती या नेहमीच्या विषयांपेक्षा काही तरी वेगळं असं पाहत असतो. आवडलं तर लेखही लिहितो. आजचा लेखही खरं तर असाच आहे. आज आपल्या टीमने काहीही न ठरवता एक व्हिडियो पाहिला. नेहमीच्या विषयांपेक्षा काहीसा वेगळा. पण हा व्हिडियो मनावर छाप पाडून गेला. म्हंटलं याविषयी आपल्या वाचकांना वाचायला आवडेल. सोबत आपल्याला ही थोडं वेगळं लेखन करता येईल.

तर मंडळी आजचा हा व्हिडियो आहे लय झ्याक. यात आपल्याला एवढे (चांगल्या अर्थी) नमुने भेटतात की काही विचारु नका. त्यातील काही तर परदेशी असतात. किंबहुना त्यांच्या या व्हिडियोत असण्यामुळे रंगत भरली जाते. हा व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला दोन ते तीन परदेशी पोरी समोर उभ्या असलेल्या दिसतात. सोबत एक भारतीय काका असतात. बहुधा राजस्थानी असावेत. सोबत काही लोककलाकार वाटावेत अशी ही मंडळी असतात. एक वाद्य ही वाजत असतं. त्या वाद्याच्या तालावर ही मंडळी ताल धरून नाचत असतात. सुरुवात होते ती या काकांपासून. समोरच्या दोन परदेशी मुलींना स्वतः सारखा डान्स करावा असा चंगच काकांनी बांधलेला असतो. पण पोरी हुशार असतात. जेवढं योग्य वाटतं तेवढाच डान्स करतात. जिथे योग्य वाटत नाही तिथे नाचत नाचतच नकार देतात. पण इथे काकांना मात्र उत्साहाचं भरतं आलेलं असतं. त्यांच्यातील नागीण डान्स असा क्षणाक्षणाला बाहेर येत असतो. काकांच्या या वयातही असलेल्या उत्साहाचं आणि डान्सचं कौतुक सगळ्यांना वाटून जातं.

त्यातही ज्या पोरीला ते डान्स कर म्हणून सांगत असतात ती तर हसून हसून वेडी झालेली असते. पण हा तर केवळ ट्रेलर असतो. वर उल्लेख केल्याप्रमाणे अजूनही पोरी असतातच. त्यांनाही डान्सची हौस भागवावी असं वाटत असतं. तसेच सोबत इतर डान्स कलाकार ही असतात. त्यांनाही या फॉरेन मड्डम बरोबर डान्स करावासा वाटत असावा. अर्थात तिथे आपण सदेह उपस्थित नसल्याने आपण फक्त तर्क वितर्क लावू शकतो. पण एक मात्र नक्की की या संपूर्ण व्हिडियोत आपल्याला या परदेशी मुलींचा उत्साह आणि त्यांचं कुतूहल हे दिसून येतं. सोबतच आपल्या देश बांधवांचा उत्साह ही असतोच. त्यामुळे काही क्षणी हा व्हिडियो खूप आनंद देऊन जातो. कारण त्या क्षणांमध्ये ही सगळी मंडळी आपण कोण कुठले हे विसरून केवळ नाच गाण्याचा आनंद घेत असतात. या आनंदापाई हा व्हिडियो निदान एकदा तरी बघावा असाच आहे. असो.

काही तरी वेगळं म्हणून या व्हिडियो विषयी लिहायचं ठरलं. आपल्याच टीमचा एक वेगळा प्रयत्न आहे हा. आपल्याला आमचा हा प्रयत्न आवडला असेल अशी अपेक्षा आहे. वर उल्लेख केल्याप्रमाणे आपण नेहमीच आम्हाला प्रोत्साहन देत आलेले आहात. हा लेखही त्यास अपवाद नसेल असा विश्वास आहे. सध्या निरोप घेतोय. पण लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे आपण न वाचलेले अन्य लेखही वाचा. आठवणीने सगळे लेख शेअर ही करा आणि आपल्याला झालेला आनंद इतरांना ही वाटा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *