Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकांनी भर समारंभात केला लाजवाब डान्स, काकांचा उत्साह तर तरुणांनाही लाजवेल

ह्या काकांनी भर समारंभात केला लाजवाब डान्स, काकांचा उत्साह तर तरुणांनाही लाजवेल

काळानुसार माध्यमांमध्ये बदल होत जात असतात. त्यानुसार आपल्या आजूबाजूला असणारी माहिती, मनोरंजन हे विविध स्वरूपात आपल्या पर्यंत येऊन पोहोचत असतं. सोशल मीडिया हे गेल्या काळातलं मोठ्ठं उदाहरण आहे. याआधी आलेल्या टीव्ही, रेडिओ यांनीही बदल केले होतेच. पण सोशल मीडियाने मात्र या सगळ्यांवर कडी केली आहे हे नक्की.

याचं सगळ्यांत महत्वाचं कारण म्हणजे या माध्यमातून अगदी समान्यातल्या सामान्य व्यक्तीला स्वतःचे विचार मांडण्यासाठी हक्काचं व्यासपीठ मिळालं. आधी केवळ लिहून आणि फोटोज पोस्ट करून स्वतःला व्यक्त करता येत असे. हळूहळू त्यात व्हिडियोजचा ही समावेश झाला आणि म्हणता म्हणता हे माध्यम एक वेगळ्याच उंचीवर गेलं. कारण अनेकांना स्वतःतील कला, छंद व्यक्त करण्यासाठी एक हक्काचं साधन उपलब्ध झालं होतं. यातूनच मग अनेक जण पुढे आले आणि म्हणता म्हणता लोकप्रिय झाले. यात तरुणांचा भरणा जबरदस्त होता आणि आहे. पण वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तीही यात सामील झाल्याच आणि यथावकाश प्रसिद्ध सुद्धा झाल्या. यात आजही खंड पडलेला नाहीये. किंबहुना यात वाढच होत जाते आहे. यातलं एक उत्तम उदाहरण म्हणजे बसंत फैझाबादि होय.

वयाने मध्यमवयीन गृहस्थ. दिसायला ही अगदी साधे. पण एकदा का गाणं सुरू झालं की हे दादा असे काही नाचतात की आजूबाजूचे सगळे त्यांच्यासोबत नाचलेच पाहिजेत. त्यावेळी त्यांच्याकडे पहिलं की एखादा तरुण पोरगा सुद्धा उत्साहाला कमी पडेल अस वाटतं. बरं ते डान्स करतात तेव्हा त्यांना रंगमंचच हवा असही काही नाही. लग्नात, नदीकिनारी जिथे त्यांना जागा मिळेल तिथे त्यांचा डान्स चालू असतो. खरं तर एवढ्या मनसोक्तपणे डान्स करणं प्रत्येकालाच जमतं असं नाही. पण बसंत हे करून दाखवतात. त्यांच्या युट्युब चॅनेल वरिल डान्स बघून त्यांची डान्स विषयी असलेली आवड कळून येते. तसेच त्यात सातत्य ही दिसून येतं. त्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरच्या आसपास त्यांचे डान्स व्हिडियोज शेअर करायला सुरुवात केली. मग त्यांचा एक डान्स व्हिडियो खूप प्रसिद्ध झाला. ‘इश्क द गली विच नो एन्ट्री’ या गाण्यावरच्या परफॉर्मन्सला अनेकांनी पाहिलं. त्यांचं कौतुक ही केलं. मग काय, अजून स्फूर्ती घेऊन त्यांनी डान्स करणं सुरू केलं. आजही त्यांचं डान्स करणं सुरू आहे. यातीलच एक डान्स आमच्या टीमने आज बघितला. खरं तर हा एक शॉर्ट व्हिडियो आहे. त्यामुळे पूर्ण गाण्यावरील डान्स आपल्याला बघता येत नाही. पण जो काही व्हिडियो आपण पाहतो तो बघून आनंद होतोच.

बसंत हे कदाचित एखाद्या लग्नात किंवा एखाद्या समारंभात गेले असताना त्यांनी हा डान्स केला होता हे दिसून येतं. या डान्सच्यावेळी आपल्याला एक जून लोकप्रिय गाणं ऐकायला येतं. जय विक्रांता चित्रपटातलं हे गाणं असतं. या उडत्या चालीच्या गाण्यावर नेहमीप्रमाणे बसंत हे मस्त डान्स करतात. एवढंच काय तर इतरांनाही डान्स करण्यास प्रोत्साहन देत असतात. आपणही हा व्हिडियो बघितला असेल तर आपल्याला ही हे जाणवलं असेलच. तसेच आपण या व्हिडियोची मजा ही घेतली असेलच. पण आपण जर हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. त्यातील डान्सचा आनंद घ्या, मजा करा.

तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.