Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकांनी भर समारंभात सर्वांसमोर केला अतरंगी डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या काकांनी भर समारंभात सर्वांसमोर केला अतरंगी डान्स, पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

‘Age is just a number’ हे वाक्य आपण अनेकदा ऐकलं किंवा वाचलं असेल. खासकरून अशा व्यक्तींसाठी ज्यांनी वयाच्या मध्यावर किंवा उत्तरार्धात काही चमकदार कामगिरी केली असेल. अर्थात गेल्या काही काळात हे वाक्य वारंवार वापरावं असे बरेच प्रसंग ही आले असतील. कारण सोशल मीडियाचा उदय झाल्यापासून अनेक उदयोन्मुख कलाकारांना एक प्रकारे हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. या उदयोन्मुख कलाकारांमध्ये मध्यमवयीन कलाकार ही येतात.

अशाच एका कलाकाराचा डान्स व्हिडियो बघण्याची संधी आपल्या टीमला मिळाली. त्यांच्या विषयी थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा लक्षात आलं की त्यांचे असे अनेक व्हिडियोज प्रसिद्ध असून त्यांच्या चाहत्यांची संख्या ही वाढते आहे. म्हंटलं चला, आज आपण पाहिलेल्या व्हिडियो विषयी आपल्या वाचकांना सांगू. हा व्हिडियो ज्यांच्यावर चित्रित झालेला आहे त्यांचं नाव बसंत फैजाबादि असं असल्याचं कळून येतं. आडनावात थोडाफार बदल असू शकतो याची कृपया सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी. तर बसंतजींच्या डान्सचा हा व्हिडियो आहे.

एका समारंभाप्रसंगी त्यांनी जो मनमुराद डान्स केला तो यात पाहता येतो. व्हिडियोची सुरुवात होते तेव्हा आपल्याला बसंतजी डान्स फ्लोअर वर उभे असलेले दिसतात. गाणं सुरू होतं तेव्हा सुरुवातीला म्युझिक आणि पैंजणांचा आवाज ऐकू येतो. त्या आवाजावर बसंतजी पायाने एक एक बिट पकडत डान्सला सुरुवात करतात. सुरुवातीला ते जागेवरच छोट्या छोट्या स्टेप्स करत डान्स करत राहतात. मग मात्र हळूहळू ते खुलून डान्स करू लागतात. ते जसजसे खुलून डान्स करू लागतात तसतसे आजूबाजूचे लोक सुद्धा उत्साहित होत जातात. खासकरून बसंतजी यांनी लगावलेले ठुमके तर सगळ्यांचं मन जिंकून जातात. सोशल मीडियावरील कमेंट्स मधूनही हे कळून येतं. एवढंच काय तर या व्हिडियोतही जेव्हा ते कंबर हलवत ठुमके लगावतात तेव्हा आजूबाजूची मंडळी त्यांना प्रोत्साहन देत राहतात. पण म्हणून केवळ ठुमके लगावतच ते डान्स करत राहतात अस नाही. या गाण्यात म्युझिक ही खूप वेळ चालतं. म्हणजे त्यावेळी शब्द कानावर पडत नाहीत. त्या वेळीसुद्धा मस्त मस्त स्टेप्स करत बसंतजी डान्स करत राहतात. तसेच काही स्टेप्स या गाण्यातील शब्दांचा आधार घेत ही केल्या जातात. त्यामुळे साडे चार मिनिटांचा हा व्हिडियो म्हणजे खूप मनोरंजन करून जातो हे नक्की.

तसेच मगासपासून ज्या गाण्याचा उल्लेख झाला त्यामुळे ही रंजकता वाढते हे नक्की. ‘सब लडको की कर दो शादी, बस एक को कवारां रखना’ हे ते मनोरंजक गाणं होय. कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजाने नटलेलं हे गाणं ‘दिवाना मुझसा नहीं’ या चित्रपटातील आहे. १९९० साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात अमीर खान जी, माधुरीजी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ज्यांना ९०च्या दशकातील सिनेमे आणि त्यातील गाणी आवडतात त्यांच्या आठवणी या गाण्यामुळे ताज्या झाल्या असणार हे नक्की. हा व्हिडियो मनोरंजन करतोच आणि आठवणींच्या जगातही घेऊन जातो. त्यामुळे आपण जर हा व्हिडियो बघितला नसेल तर जरूर बघा. बघितला असेलच तर एव्हाना आपण आठवणींच्या हिंदोळ्यात झुलत असाल. आठवणींमध्ये रमण्याची मजाच वेगळी असते नाही. असो.

मंडळी आपल्याला आमच्या टीमने लिहिलेला हा लेख आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम वाचकांसाठी नेहमीच उत्तमोत्तम लेख लिहीत असते. आपणही प्रत्येक वेळी त्यांस उत्तम असा प्रतिसाद देत असता. आम्हाला प्रोत्साहन देत असता. आपलं हे प्रोत्साहन आम्हाला यापुढेही मिळत राहू दे ही आमची सदिच्छा आहे. आमची टीम वाचकांसाठी म्हणून नेहमीच उत्तमोत्तम लेखन करत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन लेखासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे आपल्या डोळ्यांखालून न गेलेले लेख जरूर वाचा. त्यांचा आनंद घ्या. आठवणीने प्रत्येक लेख शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.