Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकांनी रस्त्यावर दाखवलेली जा’दू पाहून तुम्हीदेखील दंग राहाल, बघा हा वायरल व्हिडीओ

ह्या काकांनी रस्त्यावर दाखवलेली जा’दू पाहून तुम्हीदेखील दंग राहाल, बघा हा वायरल व्हिडीओ

कला ही अशी गोष्ट आहे जी ग’रीब, मध्यमवर्गीय, श्रीमंत असा भेद करत नाही. ज्याने त्या कलेवर प्रेम केलं, मेहनत घेतली त्याच्यासोबत ती कला जीवनभर राहते, मग परिस्थिती कशीही असो. त्यामुळे काही वेळेस अगदी गरीब वाटणारे पण कलाकार वृत्तीची माणसं आपल्या समोर येतात आणि आपण क्षणभर चकित होऊन जातो. जेव्हा या ध’क्क्यातून सावरतो तेव्हा आपल्या मनात या कलंदर वृत्तीच्या पण परिस्थितीने ग’रीब असणाऱ्या कलाकारांविषयी कौतुक आणि कीव दोन्ही दाटून येतात. आमच्या टीमला सापडलेल्या एका वायरल व्हिडियोतून हे अगदी प्रकर्षाने जाणवतं. हा व्हिडीओ दक्षिण भारतातील असावा. तिथे काही माणसं आणि एक ग’रीब यांच्यात संवाद चालू होतो. तो ग’रीब दिसत असला तरीही त्याच्याकडे जा’दू दाखवण्याची कला आहे, हे ओळखतात आणि त्याचा व्हिडियो बनवतात.

या व्हिडियोत हा ग’रीब माणूस जा’दूचे दोन खेळ दाखवतो. पहिला खेळ म्हणजे चेंडूचा. नारिंगी रंगाचा चेंडू हातचलाखीने गायब करत नंतर तोंडातून तीन चेंडू काढणे असा हा पहिला खेळ. या खेळादरम्यान त्या जा’दूगाराच्या चेहऱ्यावर दिसणारे मजेशीर भाव आपल्याला खिळवून ठेवतात. हा खेळ संपतो आणि हा माणूस आपले हात जोडतो. म्हणजे एका अर्थाने निरोप. पण उपस्थितांना मध्येही त्याच्या या जा’दू दाखवण्याच्या कलेचं अप्रूप तोपर्यंत निर्माण झालेलं असतं. ते त्याला अजून एखादा जा’दूचा खेळ करून दाखवायला सांगतात. सच्चा कलाकार. नाही म्हणत नाही. यावेळी तो शर्टच्या खिशातून एक नाणं काढतो. ते उपस्थितांना दाखवतो. एका डोळ्यातून हे नाणं काढून दुसऱ्या डोळ्यातून ते बाहेर काढलं आहे, असं हातचलाखीने दाखवतो. पण तेवढ्यावरच थांबत नाही. समोर उभ्या असलेल्या एका मुलाच्या शर्टात हे नाणं टाकल्यासारखं करतो. मग आपल्या हातांनी ते नाणं जणू हवेतून त्याने आपल्या हातात घेतलं आहे आणि गिळलं आहे असं दाखवतो. नाणं पोटात गेलंय असा अभिनय करत आपल्या शर्टाचं मधलं बटन उघडतो आणि ते नाणं बाहेर काढतो.

उपस्थित त्याचं कौतुक करत असतात तेव्हा हा कलंदर माणूस त्यांच्या पुढ्यात हात पसरतो आणि व्हिडियो संपतो. त्याच्या झोकून देत जा’दू दाखवण्याच्या वृत्तीचं कौतुक वाटतं. काही अवधीचा हा व्हिडियो आपल्याला आनंदित करून जातो आणि त्यांचं कौतुकही वाटतं. त्या माणसाच्या कपड्यावरून त्याच्या आर्थिक स्थितीचा अंदाज येतो म्हणून कीवही येते. या कलंदर माणसाला त्याच्या आ’र्थिक परिस्थितीवर मात करण्याचं बळ मिळो आणि पुढील वाटचाल सुखकर होवो याच मराठी गप्पाच्या टीमच्या वतीने शुभेच्छा ! आपल्याला आमच्या टीमने केलेले वायरल व्हिडियोज वरील लेख आवडत असतील तर त्यांना नक्की शे’अर करा. वर उपलब्ध असलेल्या स’र्च ऑप्शनचा वापर करत वायरल असं लिहून सर्च करा. आपल्याला विविध लेख वाचावयास मिळतील. मराठी गप्पाचे नियमित वाचक असण्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !

बघा व्हिडीओ :

 

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *