Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकांनी रस्त्यावर सादर केलेली कला पाहून तुम्हीसुद्धा मंत्रमुग्ध व्हाल, बघा हा सुंदर व्हिडीओ

ह्या काकांनी रस्त्यावर सादर केलेली कला पाहून तुम्हीसुद्धा मंत्रमुग्ध व्हाल, बघा हा सुंदर व्हिडीओ

सोशल मीडिया. हे नवमाध्यम आपल्या आयुष्यात एक दीड दशकांपूर्वी मोठ्या प्रमाणावर आलं काय आणि म्हणता म्हणता आपल्या आयुष्याचा अविभाज्य असा घटक झालं काय. सगळंच अकल्पित आणि अगदी गतीने झालेलं. पण आपल्या पिढीनेही त्याच्याशी जुळवून घेतलं आहेच. किंबहुना आपण या माध्यमातून शिक्षण, आनंद, समाधान अशा कितीतरी गोष्टी मिळवल्या आहेत. यातीलच एक म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात लपलेल्या उत्तम कलाकारांची आपल्याला झालेली ओळख. जगच कशाला आपल्या देशासारख्या अवाढव्य आणि वैविध्याने नटलेल्या देशात असलेल्या पण प्रसिद्ध न पावलेले अनेक कलाकार आपल्या समोर आले आहेत. अशाच एका कलाकाराचा व्हिडियो बघण्यात आला आणि त्यावर लेख लिहावा असं ठरलं. हा व्हिडियो आहे एका राजस्थानी कलाकाराचा. राजस्थानात ‘रावण हट्टा’ नावाचं तंतुवाद्य मोठ्या प्रमाणावर वाजवलं जातं. अनेक लोककलाकारांच्या पिढ्यानपिढ्यात हे वाद्य वाजवण्याची परंपरा आहे.

असं म्हणतात की लंकेचा राजा रावण याने हे वाद्य तयार केले होते. एकंदर या वाद्याचा इतिहास अतिशय जुनं आहे यात शंका नाही. असं हे वाद्य अगदी श्रवणीय आहे. याचीच प्रचिती येते ती या काकांना हे वाद्य या व्हिडियोत वाजवताना बघून. व्हिडियो सुरू होतो तेव्हा काका आपल्या रावण हट्टा सकट उभे असतात. त्यात दोन तरुण या काकांच्या या कलेचं चित्रीकरण करावं म्हणून कॅमेरा घेऊन उभे असतात. कॅमेरा सेट झाल्यावर ते काकांना हे वाद्य वाजवायला सांगतात. काकांचा या वाद्यावर हात अगदी बसलेला दिसून येतो. कारण ते वाजवायला सुरुवात करतात आणि त्या मधुर आवाजाने आपले कान तृप्त होतात. ते वाजवत असलेलं गाणं असतं, गदर या चित्रपटातलं. ‘उडजा काले कावां’ हे आनंद बक्षी लिखित लोकप्रिय गाणं. गदर ही १९४७ सालातली पार्श्वभूमी असलेली ही प्रेमकथा, या गाण्यामुळे चांगलीच लक्षात राहते.

उदित नारायण आणि अलका याग्नीक यांनी आपल्या सुरेल आवाजाने अजरामर केलेलं हे गीत. आज या काकांच्या वादनामुळे या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. हा व्हिडियो जेमतेम एका मिनिटाचा आहे. त्यातही हे काकाच आपल्याला बहुतांश वेळेस दिसतात. बरं त्यातही त्यांचं संपूर्ण लक्ष वादानावर आणि आपलं लक्ष त्यातून निघणाऱ्या सुरेल आवाजावर. आपण नाही म्हंटलं तरी तीन ते चार वेळेस हा व्हिडियो पाहतो. या व्हिडियोतुन जशी या काकांची कला ऐकायला मिळते तशीच रावण हट्टा विषयीचं कुतूहल ही वाढतं. आपल्या टीमला तर हा व्हिडियो खूप आवडला. आपल्यालाही हा व्हिडियो आवडला असेल यात शंका नाही.

तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेखही हमखास आवडला असणार यात शंका नाही. आपल्या टीमने लिहिलेले सगळेच लेख आपण आवडीने वाचता, शेअर करता हे अनुभवून आम्हाला आनंद मिळतो. आपल्या कमेंट्स मधून आम्हाला प्रोत्साहन देणाऱ्या बाबी वाचायला मिळतात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. या आपल्या प्रतिसादामुळे आम्हाला नवनवीन विषयांवर लेखन करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं एवढं नक्की. येत्या काळातही आपलं प्रोत्साहन आपल्या टीमला सतत मिळत राहील हे नक्की. आपला लोभ आमच्यावर कायम असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *