Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काका काकींनी हळदीमध्ये सर्वांसमोर केला धम्माल डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

ह्या काका काकींनी हळदीमध्ये सर्वांसमोर केला धम्माल डान्स, व्हिडीओ पाहून तुम्हीदेखील कौतुक कराल

हा लेख लिहीत असताना मार्च महिन्याचे शेवटचे काही दिवस तेवढे राहिले आहेत. काहीच दिवसांपूर्वी होळी आणि रंगपंचमी संपन्न झाली असून आता आपल्या सगळ्यांना गुढी पाडव्याचे वेध लागले आहेत. त्यामुळे हा काळ तसा आनंदाचा आणि उत्साहाचाच गेला शर आणि यापुढे ही आनंदाचा जाणार आहे. अर्थात नेहमीप्रमाणे या आनंदात भर घालायला अनेक लग्न समारंभ ही असतीलच. आता उन्हाळा म्हंटला की शाळेच्या सुट्ट्या आणि लग्न सोहळे हे असतातच. त्यातही लग्न म्हणजे उत्साहाची परिसीमा असते.

या लग्न सोहळ्यांचा भाग व्हायला आपल्या सगळ्यांना आवडतं. कारण लग्न म्हंटलं की साखरपुडा, हळदी समारंभ ते अगदी लग्नाचे विविध विधी, संगीत कार्यक्रम आणि मग रिसेप्शन, बिदाई वगैरे अशा विविध कार्यक्रमांची मांदियाळी असते. त्यातील प्रत्येक कार्यक्रमाचं स्वतःच असं वैशिष्ट्य असतं हे काही वेगळं सांगायला नकोय. सगळ्यांत भावनात्मक कार्यक्रम असतो तो मुलगी सासरी जाण्याच्या वेळेचा ! सगळेच जण हळवे होतात. तर सगळ्यांत आनंदाचा क्षण असतो तो नवरा नवरीने एकमेकांना हार घालतानाचा क्षण होय. अतिशय महत्वाचा असा हा क्षण असतो. या खालोखाल कोणत्या समारंभाला मजेच्या दृष्टीने महत्व असेल तर तो असतो संगीत कार्यक्रम !

अर्थात आधीच्या काळी हा सगळा कार्यक्रम वरात येताना आणि जाताना नाचून होत असे. पण आजकालच्या बदललेल्या काळात यात संगीत कार्यक्रमाची भर पडली आहे. अर्थात प्रत्येक जण आपल्याला आवडीनिवडीनुसार या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. अगदीच काही नाही तरी निदान डीजेची सोय ही असतेच. त्यातही हळदीच्या वेळी तर डीजे असतातच असतात. आता एकदा डीजे असला की मग काय बघायला नको. आपली वऱ्हाडी मंडळी तयार असतातच. त्यातही काहींचा उत्साह हा वाखाणण्याजोगा असतो. कारण ही मंडळी स्वतः तर डान्स करतातच आणि आपल्यामुळे इतरांना ही डान्स करायला लावतात. त्यांचा डान्स बघून आपल्याला ही त्यांच्या सारखं नाचावं असं वाटायला लागतं. डान्सची हीच तर जादू असते. डान्स करणारी व्यक्ती एकदम मनापासून डान्स करत असेल तर आपसूक इतरांनाही आपण डान्स करावं असं वाटू लागतं. आता हीच बाब गाण्याच्या बाबतीत ही असते. पण आपला गळा नसून नरड आहे अशी अनेकांची उगाच समजूत असते. म्हंटल्यावर इतरांसमोर आपलं हसं होऊ नये म्हणून गाणं गायला लोकं कचरतात. याउलट डान्स बघून बघून एक क्षण असा येतो की आपल्याला राहवत नाही.

कोणी काही म्हणो, चला नाचूया एवढीच भावना मनात तयार होते आणि मग सगळ्यांत जबरदस्त डान्स बघायला मिळतो. त्यातही वर उल्लेख केल्याप्रमाणे उत्साहात नाचणारे असतील तर ही भावना अधिक प्रबळ होते. आता आज आपल्या टीमने पाहिलेल्या व्हिडियोच उदाहरण घ्या ना ! हा व्हिडियो काही दिवसांपूर्वीचा असावा असं वाटतं. पण तारीख निश्चितपणे सांगता येत नाही. असो.पण यातला डान्स आणि त्यापाठचा उत्साह हा आजही आनंद देणारा आहे आणि यापुढेही आनंद देणारा राहील हे नक्की ! कारण यात आपल्याला उत्साह ओसंडून वाहणारे एक दादा आणि ताई भेटतात. दोघेही एकमेकांचे अनुक्रमे भावोजी आणि मेव्हणी असावेत असं वाटतं. सोशल मीडियावर असलेल्या माहितीच्या आधारे हे येथे नमूद केलं आहे याची कृपया सुज्ञांनी नोंद घ्यावी. असो. या दोघांचा उत्साह आपल्याला एका डान्सच्या निमित्ताने दिसून येतो. बहुतेक एका ठिकाणी हळदीचा कार्यक्रम असावा तेथे हा डान्स चालू असतो. दादा आणि ताईंच्या स्टेप्स आपल्या नेहमीच्याच असतात. पण त्यांचा उत्साह मात्र इतका प्रचंड असतो की या नेहमीच्या स्टेप्स ही खास वाटून जातात. इतकंच नव्हे तर आजूबाजूला उभे असलेले अनेक जण स्वतः डान्स करायचा थांबून या ताई दादांचा डान्स बघत असतात. त्यांना प्रोत्साहन देत असतात.

अगदी हा व्हिडियो चित्रीत करणाऱ्याला ही या दोघांचा डान्स चित्रित करताना धमाल आली असणार हे नक्की ! कारण आमच्या टीमने हा व्हिडियो बघितला आणि काही वेळ आम्ही हा व्हिडियो वारंवार पाहत राहिलो. खरं तर आम्ही हे आजच्या लेखासाठी करणं आवश्यक होतं. पण यातील ऊर्जा एवढी जबरदस्त होती की आमचं मनोरंजन झालं. त्यात जबरदस्त डान्स बघितला की आमच्या टीमला तो व्हिडियो सहसा आवडतोच. अर्थात मग या व्हिडियोंबद्दल मग आम्हाला लिहिल्याशिवाय चैन पडत नाही. कारण आम्ही जे जे चांगलं आणि मनोरंजक असं बघतो त्याविषयी आपल्या वाचकांना कळावं अस आम्हाला मनापासून वाटतं.

यातूनच आजचा ही हा लेख लिहिला गेलेला आहे. आमच्या टीमला या ताई दादांचा उत्साह आवडून गेला. आपणही हा व्हिडियो बघितला तर आपल्याला ही आवडून जाईल हे नक्की ! चला तर मग आपण तो व्हिडियो बघा. आपल्यासाठी आमच्या टीमने तो व्हिडियो या लेखाच्या शेवटी शेअर केला आहे. तूर्तास आम्ही आपली रजा घेतो. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.