वय आणि उत्साह यांचा सहसा व्यस्त सहसंबंध असतो असे मानलं जातं. म्हणजेच की वय वाढत जातं तस तसा उत्साह हा कमी कमी होत जातो. पण आपण हेही पाहिलं असेल की ज्या व्यक्ती मनाने तरुण असतात त्यांच्या बाबतीत हीच बाब बऱ्याच अंशी खोडून निघते. कारण मनाने तरुण असणारी मंडळी ही आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने उपभोगत, उत्साहात जगत आणि मजेत जगत असतात. अशा व्यक्तींना जर त्यांचे आयुष्याचे साथीदार ही तसेच उत्साही मिळाले तर क्या कहने ! मजा येते. याचंच उदाहरण म्हणजे आपल्या टीमने पाहिलेला एक वायरल व्हिडियो. जवळपास साडेपाच लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेला असा हा व्हिडियो आहे. तसेच पाच वर्षे जुना आहे. पण मंडळी, यातला जो उत्साह आहे ना तो तुम्हाला फार कमी ठिकाणी सापडेल. आपल्या टीमला तर व्हिडियो आवडलाच आहे. म्हंटलं आपल्या वाचकांना याविषयी कळलं पाहिजेच. चला तर मग जाणून घेऊयात या व्हिडियोविषयी.
हा व्हिडियो एका जोडप्याचा आणि त्यांनी त्यांच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त केलेल्या डान्सचा आहे. त्यावेळी त्यांच्या लग्नाला २५ वर्षे पूर्ण झाली होती असे कळतं. पण मंडळी त्या दोघांमधील उत्साह आणि केमिस्ट्री एखाद्या नवपरिणीत जोडप्याला लाजवेल अशीच. व्हिडियो सुरू होतो ना, तेव्हा आपल्याला या जोडीतील काकू पहिल्यांदा दिसून येतात. मग काहीच क्षणांत त्यांच्या पाठी असलेले काका ही दिसतात. काकू अगदी हळूहळू डान्स करत असतात. कारण असतं ते त्या डान्स करत असलेलं गाणं. त्या, ‘मैं जहाँ चली जाती हुं वही चले आते हो, ये तो बताओ की तुम मेरे कौन हो’ या सदाबहार गाण्यावर डान्स करत असतात. गंमत अशी की त्या इथून तिथे जात असतात आणि काका खरंच या गाण्यातील ओळींनुसार त्यांच्या पाठी पाठी जाताना दिसतात. गोड क्षण असतात. जेव्हा दुसरं गाणं चालू होतं तेव्हा तर या क्षणांमध्ये अजून भर पडते. कारण, हे गाणं म्हणजे जणू पहिल्या गाण्याचं उत्तर असतं. या गाण्यावर काका एकदम बरोबर लिपसिंग करत डान्स करत असतात. त्यांच्या स्टेप्स ही धमाल आणतात. हे गाणं असतं, ‘हम तो तेरे आशिक हैं सदीयों पुराने, चाहे तू माने, या ना माने’.
जुन्या गाण्यांवर या चिरतरुण जोडप्याचा डान्स मजा आणतो. अजून मजा संपलेली नसते. आता गाणं लागतं त्याच्या आधी त्याचं म्युझिक ऐकू येतं. ते ऐकून काका ज्या उत्साहात नाचायला लागतात आणि कंबर हलवतात की काय विचारू नका. दोघेही मस्त मजा घेत असतात. हे गाणं असतं, ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबाँ पर, सब को मालूम हैं और सबको खबर हो गयी’. धमाल धमाल असच त्यांच्या या परफॉर्मन्सच वर्णन करावं लागेल. तिथे उपस्थित असलेली प्रत्येक व्यक्ती खुश असते. त्यांच्या आणि आपल्या आनंदात आता अजून वाढ होणार असते. आता शेवटच्या गाण्याचं म्युझिक वाजू लागतं. या वेळी तर काकांचा उत्साह अगदी ओसांडूनच वाहत असतो. ‘ओह मेरी जोहरजबी’ या गाण्याचे आता बोल ऐकू येऊ लागतात. काकांचा उत्साह आणि डान्स अगदी शिगेला पोहोचलेले असतात. आपणही त्यांचा या डान्सची मस्त मजा घेत असतो. तितक्यात दोन काकू कॅमेऱ्यामागून येतात आणि त्यांची ओवाळणी करतात. खरंच आपणही त्या वेळी असतो तर आपणही हेच केलं असतं अस पटकन वाटून जातं.
या जोडीला नजर नको लागायला असच मनात येतं. एव्हाना काकांनी आणि काकूंनी जवळच असलेल्या सगळ्या मुलामुलींना एकत्र बोलवत या डान्स मध्ये समाविष्ट केलेलं असतं. त्यामुळे उत्साहात अगदी भरच पडलेली असते. याच प्रसन्न वातावरणात हा व्हिडियो संपतो. अवघ्या सव्वा दोन मिनिटांचा असा हा व्हिडियो आहे. पण यात काका आणि काकू यांचा उत्साह, ऊर्जा पाहून त्यांच्याविषयी कौतुक दाटून येतं. तसेच लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी या दोघांच्या स्वभावातलं जे चिरतारुण्य दिसलं ते खरंच खूप काही शिकवून जातं. आपणही हा व्हिडियो पाहिला असेल तर आपल्यालाही असच वाटलं असणार हे निश्चित. जर आपण हा व्हिडियो नसेल पाहिला तर जरूर पहा. आपल्याला खूप आनंद होईल.
तसेच मंडळी आपण आपल्या टीमला जे प्रोत्साहन देत असता त्याबद्दल धन्यवाद. आपल्या प्रोत्साहनामुळे आम्हाला नवनव्या विषयांवर लेखन करण्यास ऊर्जा मिळते आणि उत्तमोत्तम लेख लिहिले जातात. तेव्हा यापुढेही आपला पाठिंबा आमच्या पाठीशी कायम राहू द्या. आम्हीही उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस आणत राहूच. लवकरच नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य न वाचलेले लेख वाचा, ते ही शेअर करा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :