Breaking News
Home / मनोरंजन / ह्या काकींनी शांताबाई गाण्यावर केला अतरंगी डान्स, डान्स बघून चाहते सुद्धा झाले घायाळ

ह्या काकींनी शांताबाई गाण्यावर केला अतरंगी डान्स, डान्स बघून चाहते सुद्धा झाले घायाळ

सध्या सगळीकडे उत्साहाला अगदी भरला होता. सुमारे दोन वर्षांनंतर यंदा होळी आणि रंगपंचमी लोकांनी नेहमीच्या ढंगात साजरी केली. यात अगदी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा समावेश आहे. इतकंच काय तर भारतीयांसमावेत अनेक परदेशी नागरिक ही या धुळवडीचा आनंद घेताना दिसले. एकूणच काय तर दोन वर्षांच्या ‘गॅप’ नंतर होळीचं अगदी दणक्यात आगमन झालंय. बरं अस असलं तरी सध्या परीक्षांचा ही काळ सुरू आहे. त्यामुळे हे एक दोन दिवस गेले की पुन्हा आपलं रहाटगाडगे असणारच आहे.

अर्थात या राहातगाडग्यातून सुटका होईल असे काही क्षण पुढील काळात येतीलच. गुढी पाडवा हा त्यातीलच एक महत्वाचा दिवस होय. आपल्यासाठी हे तर नववर्ष ! त्यामुळे आनंद अगदी गगनाला भिडलेला असणार यात काही शंका नाही. बरं त्यात आता लग्नाचा काळ सुरू होईल. त्यामुळे साखरपुडा, हळदी समारंभ आणि लग्न यांची विविध निमंत्रणे येतीलच. त्यामुळे या समारंभात जाऊन आल्याने आनंदात भर पडेल हे नक्की ! आता या समारंभाचा विषय निघालाच आहे तर एका व्हिडियो विषयी थोडक्यात सांगतो.

हा व्हिडियो एका हळदी समारंभाचा व्हिडियो असावा असं वाटतं. बहुतेकांनी यात पिवळ्या रंगाचे कपडे घातलेले असतात आणि अंगाला ही हळद लागलेली असते त्यामुळे अस वाटतं. असो. तर, सगळे आप्तेष्ट या व्हिडियोत एकत्र आलेले आपल्याला दिसून येतात. सगळ्यांच्या देहबोलीतून उत्साह ओसंडून वाहत असतो. यातील एक काकूंचा उत्साह तर अगदी वाखाणण्याजोगा असतो. व्हिडियो सुरू होतो आणि आपलं आवडतं गाणं वाजायला लागतं. ‘शांताबाई’ हे आपल्या सगळ्यांनी डोक्यावर घेतलेलं गाणं आहे हे काही वेगळं सांगायला नको. हे गाणं प्रसिद्ध झाल्यानंतर बराच काळ जवळपास प्रत्येक समारंभात हे गाणं वाजत असे. बरं त्याची क्रेझ एवढी होती की कितीही वेळा ऐकलं तरी ते ऐकतच राहावं वाटे. बरं यावर नाचावस ही वाटे. आपल्यापैकी काहींनी तर वेळ साधून अगदी अंग घुसळून घुसळून या मस्त गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहेच. कारण या गाण्यात एक जबरदस्त उत्साह आहे. हाच उत्साह आपल्याला या काकूंमध्ये आणि पर्यायाने या व्हिडियोत ही दिसून येतो. त्यात काकूंची डान्स करण्याची स्टाईलच हटके असते. सहसा मनसोक्तपणे नाचायचं म्हंटलं की लोकं लाजतात. सगळ्यांसमोर नाचणं म्हणजे त्यांना धाडस वाटतं. पण काहींना डान्स हा कलाप्रकार जबरदस्त आवडतो.

त्यामुळे मनापासून डान्स केला की तो चांगला होणार हे त्यांना माहिती असतं. या काकू ही याच पठडीतील असाव्यात. कारण त्या अतिशय जबरदस्त आत्मविश्वासाने नाचतात. पण त्या थोड्या विनोदी स्वभावाच्या ही असाव्यात. त्यांचं तुरुतुरु करत नाचणं आपल्याला हसवून सोडतं. काहींना डान्स करताना ही हसवंण जमतं. त्यामुळे हा व्हिडियो बघत असताना काकूंचा आत्मविश्वास, डान्स स्टेप्स यांचं आपल्याला कौतुक वाटल्यावाचून राहत नाही. तसेच त्यांच्यासारखं दिलखुलास होऊन नाचणं आपल्याला ही जमायला हवं असं वाटतं एवढा हा डान्स आवडून जातो. हा व्हिडियो बघून हा लेख लिहावा असं सुचलं. पण केवळ लेख लिहून आपल्या वाचकांना यातील मजा कळणार नाही हे ही लक्षात आलं होतंच. तेव्हा आपल्या टीमने सदर व्हिडियो या लेखानंतर शेअर केलेला आहे. आपण हा लेख वाचून झाल्यावर त्याचा आनंद जरूर घ्यावा.

बरं मग, चला तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *